एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 27 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 27 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Unlock Zindagi: 'अनलॉक जिंदगी' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा प्रमुख भूमिकेत

Unlock Zindagi: एक ड्राइव्हर, एक व्यावसायिक, दोन हतबल स्त्रिया आणि एक शव. हे चित्र आहे दोन वर्षांपूर्वीचे म्हणजेच लॉकडाऊनमधील. हीच परिस्थिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'अनलॉक जिंदगी' (Unlock Zindagi) या हिंदी चित्रपटातून. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता (Rajesh Gupta), देविका दफ्तरदार (Devika Daftardar), शिवानी सुर्वे (Shivani Surve), इंदिरा कृष्णा (Indira Krihnan), हेमल देव या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. 

Dahaad Teaser Release: सोनाक्षी सिन्हाची ‘दहाड’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा अंगावर शहारे आणणारा टीझर

Dahaad Teaser Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाक्षीनं सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे तिची दहाड ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. 

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Day 2023) विशेष भाग रंगणार आहे. 

Viral Video : किली पॉलचा मराठमोळा अंदाज, बहिणीसोबत थिरकला 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर; नेटकरी म्हणाले, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना...'

Viral Video :  सध्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir)  या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. आता किली आणि त्याची बहीण नीमा पॉल हे 'बहरला हा मधुमास नवा' या मराठी गाण्यावर थिरकले आहेत. त्यांचा 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

18:23 PM (IST)  •  27 Apr 2023

Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi: सूरज पांचोलीचे काय होणार? अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआय कोर्ट सुनावणार निकाल

Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi:  अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिने 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्येनंतर जिया खानच्या (Jiah khan) आईनं अभिनेता सूरज पांचोलीवर (Sooraj Pancholi) गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावर आता उद्या (28 एप्रिल)  स्पेशल सीबीआय कोर्ट हे अंतिम निकाल देणार आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोली  काही काळ तुरुंगात होता. त्यानंतर त्याची सुटका झाली. आता या 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणातून सूरज पांचोलीची सुटका होईल की, त्याच्या अडचणीत वाढ होईल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे.

13:53 PM (IST)  •  27 Apr 2023

Ananya Pandey: अनन्या पांडे म्हणते, "यंदा आयपीएलमध्ये 'हा' खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप"; अभिनेत्रीनं केलेली भविष्यवाणी खरी ठरेल?

Ananya Pandey On Virat Kohliआयपीएलची (IPL 2023) क्रेझ संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आयपीएलची मॅच पाहण्यासाठी जात आहेत. काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आयपीएलमधील आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Pandey) एका मुलाखतीमध्ये 'यंदा आयपीएलमध्ये कोणता खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणार?' या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

13:00 PM (IST)  •  27 Apr 2023

Filmfare Award: 'भ्रष्ट, अनैतिक आणि...'; विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करत फिल्मफेअर अवॉर्ड्सवर साधला निशाणा

Vivek Agnihotri On Film Fare Award 2023: फिल्मफेअर पुरस्कार 2023 (Filmfare Awards 2023) हा सोहळा लवकरच पार पडणार आहे. या पुरस्कारसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री हे फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023  बॉयकॉट करणार आहेत.  फिल्मफेअर  पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नाही, असं विवेक यांनी ट्वीट शेअर करुन चाहत्यांना सांगितलं. 

12:15 PM (IST)  •  27 Apr 2023

Sara Ali Khan Travels In Metro: सारा अली खाननं लग्झरी कार सोडून मुंबई मेट्रोमध्ये केला प्रवास; म्हणाली, 'मुंबई मेरी जान'

Sara Ali Khan Travels In Metro: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) प्रवासाची खूप आवड आहे. ती अनेकदा तिच्या कामातून ब्रेक घेऊन विविध ठिकाणी ट्रीपला जात असते.सारा ही सोशल मीडियावर तिच्या ट्रीपचे फोटो शेअर करत असते. सध्या साराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) प्रवास करताना दिसत आहे. सारा अली खानने  तिचा मेट्रोमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन खास कॅप्शन दिलं आहे.

11:35 AM (IST)  •  27 Apr 2023

KKBKKJ Box Office Collection Day 6: सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' च्या कमाईत घसरण; जाणून घ्या सहाव्या दिवसाचं कलेक्शन

'किसी का भाई किसी की जान' चे कलेक्शन 

पहिला दिवस : 15.81 कोटी
दुसरा दिवस : 25.75 कोटी
तिसरा दिवस : 26.61 कोटी
चौथा दिवस : 10.17 कोटी
पाचवा दिवस : 7.50 कोटी
सहावा दिवस : 5 कोटी
एकूण कमाई : 90.84  कोटी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget