Entertainment News Live Updates 26 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
पाहा तमाराची पोस्ट:
छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) 'राडा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे.
पाहा गाणं:
साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या पती विग्नेश शिवनसोबत परदेश दौऱ्यावर आहे. दोघेही बार्सिलोनामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा 'लायगर' (Liger) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची हवा होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट साऊथ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती होती. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘दिल्ली क्राईम सीझन 2’ (Delhi Crime season 2) ही बहुचर्चित वेब सीरिज आज (26 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 2019मध्ये आलेली नेटफ्लिक्सची सीरिज 'दिल्ली क्राईम' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तेव्हापासून प्रेक्षक सीरिजच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत होते. आता चाहत्याची प्रतीक्षा संपली आहे.
‘बाल भारती’ची (Bal Bharti) संकल्पना नाविन्य पूर्ण आणि रंजक तर आहेच, पण चित्रपट त्या पलीकडे जाऊन मराठी हृदयाला ही भिडतो. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारा एक कल्पक मुलगा आणि त्याच्या भविष्याबद्दल कळकळ असणारे आईवडील यांची ही कथा. पण जेव्हा वडील ठरवतात की, इंग्रजी येणे हेच बुद्धिमत्तेचे एकमेव परिमाण आहे आणि इंग्रजी आलेच पाहिजे, तेव्हा गोष्टी रंजक होतात. प्रेक्षकांना त्यांचा आवडता अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याला हटके भूमिकेत बघायला नक्की आवडेल.
आमिर आणि संजीदा यांनी त्यांच्या घटस्फोटावर आतापर्यंत मौन बाळगले होते. मात्र, नुकतीच अभिनेता आमिर अलीने (Aamir Ali) आपली व्यथा मांडली आहे. सध्या तो आपल्या कुटुंबावर आणि कामावर लक्ष केंद्रित करत आहे. आपली मुलगी आयराबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, त्याला त्यांच्या मुलीला भेटण्याची परवानगी नाही.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते सावन कुमार टाक यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एबीपी न्यूजला याबाबत माहिती देताना सावन कुमार यांचे पुतणे आणि चित्रपट निर्माते नवीन टाक यांनी सांगितले की, "डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका आणि अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले."
तब्बल 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर, कॉमेडियनच्या सेक्रेटरीने दिली हेल्थ अपडेट
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना तब्बल 15 दिवसांनी आज (25 ऑगस्ट) शुद्ध आली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे सेक्रेटरी गर्वित नारंग यांनी माहिती देताना सांगितले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना छातीत दुखू लागल्याने आणि बेशुद्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिकटॉकस्टार सोनाली फोगटचा मृत्यू नसून हत्याच, कुटुंबियांचा आरोप; गोवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा
टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोव्यतील सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
'मिस नेशन 2022'मध्ये नागपूरच्या सिद्धी, मुस्कानचा जलवा
अलिकडे फॅशन क्षेत्रात करिअर घडविण्याकडे तरुणींचा कल वाढला आहे. यामध्येच विदर्भातील तरुणींना या क्षेत्रातील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होऊन या क्षेत्रात करिअरच्या नव्या दिशा मिळाव्या या उद्देशाने 'मिस नेशन 2022'या (Miss Nation 2022) सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील 8 राज्यातून सुमारे 65 तरुणींनी सहभाग नोंदविला होता. सहभागींपैकी टॉप 14 मुलींची निवड अंतिम फेरीसाठी (final round) करण्यात आली. यांची अंतिम फेरी नुकतीच नागपुरात (Nagpur) झाली. गुजरातची परेवी ब्राम्हभट्ट (Parevi Brahmbhatt) 'मिस नेशन 2022' ठरली तर नागपूर शहरातील दोन्ही सौंदर्यवतींनी द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले. सिद्धी मनिष त्रिवेदी (Siddhi Trivedi) ही फर्स्ट रनरअप ठरली तर मुस्कान शर्माने (Muskan Sharma) सेकंड रनरअपचा टायटल मिळवला.
‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडले स्क्रिनिंग!
जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित - दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 'बनी'चे स्क्रिनिंग येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी, सायंकाळी टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्या. त्यातून 137 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील 'गुठली लड्डू' आणि मराठीतील 'बनी' या दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -