Entertainment News Live Updates 25 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Apr 2023 07:06 PM
Kiran Mane: 'केदार मला 'या' सिनेमात एक भूमिकाही देणार होता, पण...'; किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Kiran Mane:   किरण माने (Kiran Mane) हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.  बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमध्ये किरण माने यांनी सहभाग घेतला होता. किरण माने हे विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या 'महाराष्ट्र शाहीर'  (Maharashtra Shahir)  या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.


Manasi Naik : "माझं खरं खोटं देवालाच ठाऊक"; मानसी नाईकची लक्षवेधी पोस्ट

Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. मानसीचा नुकताच घटस्फोट झाला असून आता तिने नवीन घरदेखील घेतलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने आयुष्यात पुढे जात असल्याचं सांगितलं आहे. 





Dancing On The Grave: डान्सिंग ऑन द ग्रेव्ह सीरिज अडकली वादाच्या भोवऱ्यात; बंदी घालण्याची मागणी

Dancing On The Grave: काही दिवसांपूर्वी  डान्सिंग ऑन द ग्रेव्ह (Dancing On The Grave) ही डॉक्युमेंट्री सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता या डॉक्युमेंट्री सीरीजवर बंदी घालण्याची मागणी मुरली मनोहर मिश्राच्या वकिलांनी केली आहे. डान्सिंग ऑन द ग्रेव्ह या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्याची मागणी करत मुरली मनोहर मिश्रानं म्हटले आहे की,  ही डॉक्युमेंट्री त्यांच्या कायदेशीर अधिकारांवर  विपरित परिणाम करते. 

Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती

Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Maza) या अंगावर शहारे आणणाऱ्या गीताची आता पुननिर्मिती करण्यात आली आहे. या गीताचं लॉन्चिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते पार पडलं. 

Priyanka Chahar : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर चोरीचा आरोप; गुन्हा दाखल होण्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?

Priyanka Chahar Choudhary Controversy : 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) सध्या अडचणीत आहे. अभिनेत्रीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लवकरच तिच्या गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Happy Birthday Arijit Singh : संगीताचा जादूगार; 'कबीरा' ते 'तुम ही हो' अरिजित सिंहची 'Top 10' गाणी तुमच्या प्ले लिस्टमध्ये हवीच!

Arijit Singh : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंहचा (Arijit Singh) आज वाढदिवस आहे. अरिजितची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट गायकांच्या यादीत होत असते. अरिजित आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘मर्डर 2’च्या ‘फिर मोहब्बत’ या गाण्याच्या माध्यमातून अरिजितने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून तो रातोरात स्टार झाला. अरिजितच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांबद्दल...


Happy Birthday Arijit Singh : संगीताचा जादूगार; 'कबीरा' ते 'तुम ही हो' अरिजित सिंहची 'Top 10' गाणी तुमच्या प्ले लिस्टमध्ये हवीच!

Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर 2023'मध्ये आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'ला सर्वाधिक नामांकन; जाणून घ्या संपूर्ण यादी...

Filmfare Awards Full List Of Nominations : भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा 68'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा' (Filmfare Awards 2023) लवकरच पार पडणार आहे. 68 व्या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात आलिया भट्टच्या (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) आणि विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. 

Lata Deenanath Mangeshkar Award 2023 : आशा भोसले यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान

Lata Deenanath Mangeshkar Award 2023 : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लता दीदींच्या आठवणीत आशा भोसले भावूक झालेल्या दिसून आल्या. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Prashant Damle: 'ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची'; प्रशांत दामले यांची खास पोस्ट


Prashant Damle : मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या प्रशांत दामले (Prashant Damle) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ते सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतात. सध्या प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’  या नाटकाचे प्रयोग विविध ठिकाणी होत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच प्रशांत दामले यांनी ‘नियम व अटी लागू’  या नाटकाच्या  प्रयोगाबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


प्रशांत दामले यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअरल केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग- महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी'. प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नाटकाच्या तिकीट काऊंटच्या इथे लोकांनी रांग केलेली दिसत आहे. 


Mazhi Tuzhi Reshimgath : रेशीमगाठ तुटणार नाही! 'माझी तुझी रेशीमगाठ'चा दुसरा भाग येणार?


Mazhi Tuzhi Reshimgath Marathi Serial Latest Update : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या वर्षी अचानक निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांना ही मालिका पुन्हा सुरू करावी लागली. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल ठरली होती. पण अचानक काही कारणाने निर्मात्यांनी ही मालिक बंद करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला आणि टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी पुन्हा एकदा ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. 


ऑटोग्राफचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'या' दिवशी होणार


Autograph: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अंकुशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या ‘ऑटोग्राफ’ (Autograph) या चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर  होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पहायला मिळणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.