Dancing On The Grave Trailer: 'तो माणूस नसून प्राणी आहे!'; 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
डान्सिंग ऑन द ग्रेव्ह (Dancing On The Grave) ही डॉक्युमेंट्री सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या डॉक्युमेंट्री सीरीज ट्रेलर रिलीज झाला आहे.
Dancing On The Grave Trailer: ओटीटी प्लेटफॉर्मवरील (OTT Platform) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांची पसंती मिळते. वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात. नवीन चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीझ होण्याची प्रेक्षक वाट बघत असतात. आता लवकरच डान्सिंग ऑन द ग्रेव्ह (Dancing On The Grave) ही डॉक्युमेंट्री सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचं पोस्टर रिलीज करण्यात आले होते, त्यानंतर सोशल मीडियावर या डॉक्युमेंट्री सीरीजबाबत चर्चा सुरु झाली. आता या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजची कथा म्हैसूर राजघराण्यातील माजी दिवाण यांची नात शकीरा खलीलीच्या हत्येवर आधारित आहे.
'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह'च्या ट्रेलरमध्ये 90 च्या दशकात शकीरा खलीलीची हत्या झाल्याचे दिसत आहे.शकीरा खलीलीचा पती स्वामी श्रद्धानंदने शकीराला जमिनीत गाडले. या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या हायप्रोफाईल प्रकरणात अनेकांनी आपले जबाब नोंदवला होता, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये स्वामी श्रद्धानंद म्हणताना दिसतो, 'मला सांगायचे आहे की, माझ्याबद्दल जे काही बोलले गेले ते खोटे आहे.' तर ट्रेलरमध्ये एक व्यक्ती म्हणताना दिसते, 'तो माणूस नसून प्राणी आहे!'
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
काय आहे प्रकरण?
1994 मध्ये, कर्नाटक पोलिसांना शकीरा खलीलीचा मृतदेह तिच्या घराखाली पुरलेला आढळला. शकीराला जेव्हा पुरले जात होते तेव्हाही ती जिवंत होती, असं म्हटलं गेलं. शकीराला जिवंत पुरल्यानंतर तिचा पती स्वामी श्रद्धानंदने त्याच ठिकाणी पार्टी केली होती, असंही म्हटलं जातं.
कुठे आणि कधी पाहता येणार डान्सिंग ऑन द ग्रेव्ह सीरिज?
डान्सिंग ऑन द ग्रेव्ह ही डॉक्युमेंट्री सीरीज 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. प्रेक्षक या डॉक्युमेंट्री सीरीजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.