Entertainment News Live Updates 24 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Dec 2022 03:02 PM
Sargam Koushal Exclusive : मिसेस वर्ल्ड सरगम कौशलचं मायदेशी धुमधडाक्यात स्वागत

Sargam Koushal : भारताच्या सरगम कौशलने (Sargam Koushal)  अमेरिकेत आयोजित केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मिसेस वर्ल्ड सरगम ​​कौशल ही अमेरिकेतील लास वेगसमधून आज भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर सरगमने तिच्या विजयाचा आनंद एबीपी न्यूजबरोबर शेअर केला आहे.


Sargam Koushal Exclusive : मिसेस वर्ल्ड सरगम कौशलचं मायदेशी धुमधडाक्यात स्वागत; भारतात परतल्यानंतर एबीपी न्यूजशी साधला संवाद

Bamboo : ‘बांबू’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Bamboo : टीझरमध्ये  अभिनयच्या खांद्यावर अनेक मुली येऊन रडत आहेत. डोळे, नाक, कान पुसत आहेत. मात्र त्याच्या आयुष्यात अजून कोणीच मुलगी आलेली दिसत नाही. आता त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी येणार की, त्याचेही ‘बांबू’ लागणार. हे 26 जानेवारीला कळणार आहे. या टीझरमध्ये सर्वात लक्षवेधी ठरत आहेत, त्या टीझरच्या शेवटी असलेल्या संस्कृत ओळी. आता याचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘बांबू’ची खासियत म्हणजे यात अभिनय बेर्डे नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनयचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 


Abdu Rozik Fees : 'बिग बॉस'च्या शोसाठी अब्दु रोजिकला मिळालं 'इतकं' मानधन

Abdu Rozik Fees For Bigg Boss 16 : अब्दु रोजिक हा तजाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक आहे. याशिवाय तो एक प्रसिद्ध सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. दुबईत अब्दुचा प्रचंड दबदबा आहे. अब्दु हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस 16' मधील पहिल्या दिवसापासून तो प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यात यशस्वी झाला आहे. तो दर आठवड्याला मोठी रक्कम घेतो. रिपोर्टनुसार, अब्दू रोजिक एका आठवड्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये घेतो. अब्दु शोमध्ये एकूण 11 आठवडे राहिला. या दरम्यान त्याने सुमारे 30 ते 33 लाख रुपये कमावले होते.



Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Shahir : मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील साने गुरुजींचा लूक आज आऊट झाला आहे. 





Rakul Preet Singh : कामासाठी काहीही करायला तयार... शूटिंगसाठी तब्बल 11 तास पाण्यात राहिली 'ही' अभिनेत्री

Rakul Preet Singh : रंगभूमीवरील कलाकारापासून रुपेरी पडद्यावरील कलाकारापर्यंत प्रत्येक जण आपल्या भूमिकेसाठी 100 % देत असतो. भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकारमंडळी खूप मेहनत घेत असतात. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहदेखील (Rakul Preet Singh) आपली भूमिका चोख पार पाडताना दिसून आली आहे.

Sajid Khan : साजिद खानवरवर पुन्हा एकदा लैंगिक छळाचा आरोप

Sajid Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शिक साजिद खान (Sajid Khan) सध्या भाईजानच्या बिग बॉसमुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. साजिद बिग बॉसममध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. गेल्या काही दिवसांत साजिदवर गंभीर आरोप केले जात आहेत. 

Avatar 2 Box Office Collection : 'अवतार 2' रिलीजच्या आठव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Avatar 2 Collection : हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा (James Cameron) 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 





Anil Kapoor Birthday Special : एव्हर ग्रीन अभिनेते अनिल कपूर

Anil Kapoor Birthday : 'एव्हर ग्रीन' अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयासह फिटनेटमुळे ते आजही तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ते एक उत्तम अभिनेते असण्यासोबत निर्मातेदेखील आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांचे टॉप 10 सिनेमे...


Anil Kapoor Birthday Special : एव्हर ग्रीन अभिनेते अनिल कपूर; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या टॉप 10 सिनेमे...

Aamir Khan Dangal : म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? आमिर खानच्या 'दंगल'ची सहा वर्षे

Aamir Khan Dangal Six Years : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'दंगल' (Dangal) हा सिनेमा जगभरात गाजला. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमाला आज सहा वर्षे झाली आहेत. 2016 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा 'दंगल' सिनेमा होता. 



Mohammed Rafi Birth Anniversary : आवाजाचा जादूगार; स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी!

Mohammed Rafi Birth Anniversary : मोहम्मद रफी (Mohammed Rafi) हे स्वर्गीय आवाजाची देणगी दाभलेले लोकप्रिय पार्श्वगायक होते. त्यांच्या निधनाला आज अनेक वर्षे झाली आहेत. पण तरीही त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Kerala International Film Festival : 27 वा केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल उत्साहात संपन्न


Kerala International Film Festival 2022 : 27 वा केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल नुकताच पार पडला. इराणची दिग्दर्शिका महनाझ मोहम्मदी तिच्या देशात सुरु असलेल्या हिजाब विरोधी आंदोलनाविरोधात केलेला यल्गार आणि हंगेरीयन दिग्दर्शक बेला थार यांचा मास्टरक्लास यांनी केरळा फेस्टिव्हल गाजवला. 


Pune PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला


Piff Festival :  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Pune international film festival) अर्थात पिफ (Piff) पुढे ढकलण्यात आला आहे.  12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यात हा चित्रपट महोत्सव होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हा चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याचं पुणे फिल्म फौंडेशनचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी सांगितलं आहे.


Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन


Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते. 


The Legend of Maula Jatt: पाकिस्तानी चित्रपट 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' आता भारतात होणार प्रदर्शित?


The Legend of Maula Jatt: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan) चित्रपट 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट'  (The Legend of Maula Jatt) हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनंतर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली.  'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे असं म्हटलं जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.