Entertainment News Live Updates 24 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Aug 2022 05:02 PM
Boyz 3 : 'बॉईज 3' सिनेमाचा ट्रेलर आऊट

Boyz 3 Movie Trailer Out : बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या त्रिकूटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. 'बॉईज' आणि 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर 'बॉईज 3' (Boyz 3) काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच 'बॉईज 3' या सिनेमाचा  ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.


ट्रेलर पाहा : 


Modi Ji Ki Beti : 'मोदी जी की बेटी' सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट

Modi Ji Ki Beti Motion Poster : 'मोदी जी की बेटी' (Modi Ji Ki Beti) या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झालं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पित्तोबाश त्रिपाठी, अवनी मोदी आणि विक्रम कोच्चर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 



Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा

Raju Srivastava Health Update : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने एबीपी न्यूजला दिली आहे. 

शिवरायांच्या आग्रा भेटीचा थरार, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शिवप्रताप गरुडझेप’!

रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.


 





हृतिक रोशन-सैफ अली खानचा दमदार अभिनय, 'विक्रम वेधा'चा धमाकेदार टीझर रिलीज

PHOTO : ‘आर्ची’ रमली निसर्गाच्या सानिध्यात, फोटो पाहून चाहतेही म्हणतात ‘सैराट झालं जी....’

Happy Birthday Nagraj Manjule : लोकांच्या कपड्यांना इस्त्री करण्यापासून ते अमिताभ बच्चन यांचा चित्रपट दिग्दर्शित करण्यापर्यंतचा नागराज मंजुळे यांचा प्रवास!

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तुफान प्रसिद्धी मिळवलीच, परंतु या चित्रपटाच्या नमित्ताने नागराज मंजुळे हे प्रत्येकाच्या ओठी असलेलं नाव झालं. अर्थात या चित्रपटाने त्यांना एका यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र, नागराज मंजुळे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. आज (24 ऑगस्ट) नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे.


 





रकुलप्रीतच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर संतापली स्वरा भास्कर

मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे. 'जहां चार यार' या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान अभिनेत्री आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. यावेळी एका मुलाखतीत तिला बॉयकॉट बॉलिवूड या सध्या सुरु असलेल्या ट्रेंड विषयी प्रश्न विचारण्यात आला. स्वरानेही या प्रश्नाला अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले आहे. मात्र, यावेळी तिने याचे कारण अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

तारक मेहता’ची मालिकेत एन्ट्री होणार! शैलेश लोढा नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका!

अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता या भूमिकेत नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केल्याने मालिकेचा ट्रॅक देखील बदलण्यात आला होता. आता या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निर्मात्यांना या भूमिकेसाठी नवा चेहरा मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये तारक मेहताच्या भूमिकेत अभिनेते जयनीरज राजपुरोहित (Jaineeraj Rajpurohit) दिसणार आहेत. 


 


 





कॉमेडियन कृष्णा अभिषेकचाही ‘द कपिल शर्मा शो’ला गुडबाय! कारण देताना म्हणाला..

नुकतीच कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून, नवीन सीझन लवकर सुरू होणार असल्याचो घोषणा केली होती. मात्र, आता या शोबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध अभिनेता कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) कपिल शर्मा शोला अलविदा केला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची प्लॅनिंग सुरु? ‘डॅडी’ सुनील शेट्टी म्हणतात...

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

बॉलिवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.  अमिताभ यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे," मी नुकतीच कोरोना चाचणी केली असून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी'. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती


बॉलिवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.  अमिताभ यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे," मी नुकतीच कोरोना चाचणी केली असून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी'.


टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे आज (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या या निवडणुकीत पराभूत झाल्या. 2019च्या निवडणुकीत आदमपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई विरुद्ध सोनाली फोगाट असा सामना होता. यात कुलदीप बिश्नोई यांचा विजय झाला. यानंतर भाजपच्या हरियाणा युनिटने त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.


'अवतार : द वे ऑफ वॉटर' सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; लवकरच सिनेमा होणार रिलीज


'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar : The Way Of Water) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा नवा ट्रेलर आऊट झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जेम्स कॅमेरूनने (James Cameron) सांभाळली आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला 'अवतार' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 23 सप्टेंबरला 'अवतार' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे.


'हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनच्या फर्स्ट लुकने वेधलं लक्ष; ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार अभिनेता


नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या आगामी 'हड्डी' (Haddi) सिनेमामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी सिनेमाची घोषणा करत नवाजुद्दीनचा 'हड्डी' सिनेमातील फर्स्ट लुक आऊट केला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हड्डी' सिनेमाच्या मोशन पोस्टरमधील नवाजुद्दीन लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.


राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट आयसीयूत घुसला चाहता


हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना एम्सच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना लवकरात लवकर शुद्ध यावी यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. या सगळ्यादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक अज्ञात व्यक्ती राजू श्रीवास्तव यांना ठेवण्यात आलेल्या आयसीयूमध्ये घुसली आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. मात्र, सुरक्षारक्षकांच्या नजर पडताच त्या व्यक्तीला तिथून हटवण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सदर प्रकरणामुळे त त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षेची काळजी वाटत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.