Entertainment News Live Updates 24 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Apr 2023 03:17 PM
Autograph: 'प्रेम एकवेळ संपेल पण नातं...' अंकुश आणि अमृताचा रोमान्स, ऑटोग्राफचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'या' दिवशी होणार

Autograph: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अंकुशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या ‘ऑटोग्राफ’ (Autograph) या चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर  होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पहायला मिळणार आहे.



Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं स्विमसूटमधील फोटो केले शेअर; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'साऊथ इंडियन कलाकारांकडून शिका...'

Prarthana Behere : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.  ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील तिच्या नेहा या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. नुकतेच प्रार्थनानं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.  या फोटोमधील तिच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. प्रार्थनाच्या फोटोमधील या  लूकला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 



Dream Girl Release Date : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट जाहीर

Ayushmann Khurrana Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) या सिनेमाचा समावेश आहे. त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 





Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत स्वराजने घालवला मल्हारचा राग; नियती आणेल का स्वराज आणि मंजुळाला एकत्र?






Ponniyin Selvan 2 : रिलीज डेट, अ‍ॅडव्हान्स बुकींग आणि कलाकार; जाणून घ्या 'पोन्नियिन सेल्वन 2' बद्दल सर्वकाही...

Ponniyin Selvan 2 Release Date : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा चांगलाच गाजल्याने प्रेक्षक आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन 2 ('Ponniyin Selvan 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


Ponniyin Selvan 2 : रिलीज डेट, अ‍ॅडव्हान्स बुकींग आणि कलाकार; जाणून घ्या 'पोन्नियिन सेल्वन 2' बद्दल सर्वकाही...

Sampath J : दाक्षिणात्य अभिनेता संपत जे रामचे निधन

Kannada Actor Sampath J Ram Passes Away : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामचे (Sampath J Ram) निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 





Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्वीस्ट; सौंदर्याला समजणार श्वेता-कार्तिकचा डाव?

Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपासून श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहेत. पण आता मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं सत्य सौंदर्यासमोर येणार आहे. 

Salman Khan : 'किसी का भाई किसी की जान'च्या यशाने सलमान भारावला

Salman Khan Social Media Post : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा 21 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. दोन दिवसांत सिनेमाने 40 कोटींची कमाई केल्याने सलमान भारावला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 



Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची फसवणूक? ट्वीट करत म्हणाले..

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,"ज्यांचे ट्विटरवर 1 मिलिअनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांना मोफत ब्लू टिक मिळालं आहे. माझे तर 48.4 मिलिअन फॉलोअर्स आहेत. तरीदेखील मला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागले आहेत". अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांनी पैसे घेऊन ब्लू टिक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीने वाढदिवशी चाहत्यांना दिलं खास सरप्राईज; आगामी सिनेमाची पहिली झलक समोर


Manoj Bajpayee : हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्यांच्या यादीत मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) नावाचा समावेश होतो. आज मनोज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. त्याने त्याच्या आगामी 'बंदा' या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. मनोज वाजपेयीने वाढदिवशी (Manoj Bajpayee Birthday) त्याच्या आगामी 'बंदा' (Bandaa) या सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाची घोषणा करत त्याने या सिनेमाचं पोस्टरदेखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये मनोजचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.


सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!


Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan OTT Release : सलमान खानचे (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची प्रतीक्षा करत असून आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता सिनेप्रेमी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला पसंती दर्शवतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ओटीटीवर या सिनेमाला सुगीचे दिवस येतील अशी शक्यता आहे. लवकरच हा सिनेमा झी 5 (Zee5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. 


'रावरंभा' सिनेमात संतोष जुवेकरची वर्णी; पोस्टर शेअर करत म्हणाला,"जय भवानी जय शिवाजी"


मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता पहिल्यांदाच एका ऐतिहासिक सिनेमात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी 'रावरंभा' (Ravrambha) सिनेमात 'जालिंदर' या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची जालिंदर ही  भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे 'रावरंभा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.