एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 23 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 23 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Sheena Bora: देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडावर आता वेब सीरिज येणार

मुंबई: देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर आता वेब सीरिज बनणार आहे. शीना बोरा हत्याकांडांनंतर एका कुटुंबाच्या गुंतागुंतीच्या नात्याच्या जाळ्यात सारा देश अडकल्यासारखा वाटत होता. आता त्याच प्रकरणावर एक वेब सीरिज येणार असून 'एक थी शीना बोरा' या संजय सिंह यांच्या पुस्तकावर ती आधारित असणार आहे. सन 2015 साली घडलेल्या शीना बोरा हत्याकांडानंतर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या हत्याकांडातील आरोपींशी निगडीत असलेल्या राजकारमणी, पोलिस अधिकारी आणि नातेसंबंधाचे जाळे समोर आलं. हे प्रकरण संजय सिंह यांनी कव्हर केलं होतं. त्यांनी यावर पुस्तकही लिहिलं होतं. 

Bageshwar Dham : 'बागेश्वर धाम'वर सिनेमा येणार; उलगडणार चमत्कारिक रहस्ये

Bageshwar Dham Movie : मध्यप्रदेशातील 'बागेश्वर धाम' (Bageshwar Dham) हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या भाविकांचं मन वाचता येत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामची चमत्कारिक शक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आता या बागेश्वर धामवर (Bageshwar Dham Movie) सिनेमा येणार आहे. 

बागेश्वर धामवर सिनेमा येणार असल्याची घोषणा अभय प्रताप सिंहने (Abhay Pratap Singh) केली आहे. तसेच तेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे.

Taapsee Pannu : बोल्ड दिसण्याच्या नादात तापसीने केली ही चूक, नेटकरी म्हणाले... काहीतरी लाज बाळग

मुंबई: तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असते. अलीकडेच तापसीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तापसीच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

नुकत्याच झालेल्या 'लॅक्मे फॅशन वीक' (LFW) मध्ये, तापसी पन्नूने बोल्ड नेकलाइनसह हॉट रेड ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला. या ड्रेससोबत तिने हेवी डिझायनर नेकपीस घातला होता, ज्यावर लक्ष्मीची मूर्ती होती. हा फोटो शेअर करताना तापसीने लिहिले आहे की, 'हा लाल रंग मला कधी सोडेल? मात्र या फोटोमुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं दिसून येतंय.

 
 
14:51 PM (IST)  •  23 Mar 2023

Kangana Ranaut Birthday: 'धाकड गर्ल' कंगना बॅकफूटवर; वाढदिवसाला मागितली माफी; पण का? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'माझे शत्रू...'

Kangana Ranaut Birthday: बॉलिवूडची धाकड गर्ल  कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36 वा वाढदिवस आहे. कंगनाचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाला शुभेच्छा देत आहेत. कंगना ही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत कंगना ही बिंधास्तपणे मांडत असते. कंगनाच्या वक्तव्यांमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करत असतात. आज वाढदिवसानिमित्त कंगनानं एक खास व्हिडीओ शेअर करुन काही लोकांची माफी मागितली आहे. तिच्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडिया होत आहे. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

14:50 PM (IST)  •  23 Mar 2023

Sarja Movie Song: आदर्श शिंदेचं 'धड धड...' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस भेटीला; सर्जा 'या' दिवशी होणार रिलीज

Sarja Movie Song: 'सर्जा' (Sarja) या चित्रपटातील 'जीव तुझा झाला माझा...' हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना 'सर्जा'मधील 'धड धड...' (Dhad Dhad) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल. 

12:10 PM (IST)  •  23 Mar 2023

Pahile Mi Tula: अदिती पोहनकरच्या 'पाहिले मी तुला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Pahile Mi Tula: अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांच्या 'पाहिले मी तुला' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालं आहे. हा चित्रपट 4 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रतिभावान अभिनेत्री अदिती पोहनकर 'पाहिले मी तुला' (Pahile Mi Tula) या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे.अदितीला नेटफ्लिक्सच्या 'शी' या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhushan Nanasaheb Patil (@thebhushanpatil)

08:25 AM (IST)  •  23 Mar 2023

Kangana Ranaut: वयाच्या 16व्या वर्षी सोडलं घर, वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम असते चर्चेत; पंगा क्विन कंगना कोट्यवधींची मालकीण

Kangana Ranaut: राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री   कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज  36वा वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. शालेय शिक्षण कंगनाने तिथेच घेतले. कंगनाच्या वडिलांची इच्छा होती की, तिनं डॉक्टर व्हावं. पण कंगना 12 वीमध्ये फेल झाली. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget