Entertainment News Live Updates 23 February : अभिनेत्री मुमताज यांचा वर्क आऊटचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Musandi Marathi Movie: यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं, हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ (Musandi) या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी' हा मराठी चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mrs Chatterjee Vs Norway Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही गेली अनेक वर्ष अभिनयक्षेत्रात काम करत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील आधारित चित्रपटांमध्ये राणीनं काम केलं. सध्या राणी तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. राणीच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच, अनेकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राणीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, देविका चॅटर्जी ही तिच्या दोन मुलांसाठी लढा देत आहे.
पाहा ट्रेलर
RRR: दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं. आता हा चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स (Variance Films) नं घेतला आहे. वेरिएंस फिल्म्सनं एक ट्वीट शेअर करुन ही माहिती दिली आहे.
Mumtaz Workout Video : 60-70 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली. मुमताज या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्नीलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी देखील स्वप्नीलची ओळख आहे. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या माध्यमातून स्वप्नील प्रेक्षकांच्या भेटीस येतो. सध्या स्वप्नील सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. स्वप्नीलच्या एका चाहत्यानं त्याला ट्विटरवर ट्वीट शेअर करुन एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला स्वप्निलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Prakash Raj: काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा (Dadasaheb Phalke Awards 2023) दिमाखात पार पडला. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
Master Chef India : सध्या रिॲलिटी शोपैकी एक असणारा 'मास्टर शेफ इंडिया' (Master Chef India) शो इंटरेस्टिंग वळणावर आहे. या शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांसमोर नवनवीन आव्हानं येतात. यामध्ये स्पर्धकांची कसोटी पणाला लागते. कदाचित यामुळेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आवश्यक असलेला मसाला मास्टर शेफ इंडियाच्या किचनमधून टेलिव्हिजनवर झळकत आहे. पण ही झाली या शोची एक बाजू. या शोची दुसरी बाजू पाहिली तर, सोशल मीडियावर नेटकरी या शोला एक स्क्रिप्टेड रिॲलिटी शो असल्याचं बोलत आहेत. एवढंच नव्हे तर आता मास्टर शेफ इंडिया रिॲलिटी शो कमी आणि डेलीसोप झाल्याचा आरोपही नेटकऱ्यांकडून केला जातोय. तर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, मास्टर शेफ इंडिया आता बिग बॉस (Bigg Boss) आणि इंडियन आयडलच्या (Indian Idol) पावलावर पाऊल ठेवत आहे. कारण आता शोमधील कंटेंट भावनिक आणि कौटुंबिक असल्याचं जाणवू लागलं आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sachin Shroff Wedding : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन श्रॉफ येत्या 25 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. याआधी तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जूही परमारसोबत (Juhi Parmar) लग्नबंधनात अडकला होता. 15 जानेवारी 2009 साली त्यांचं लग्न झालं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या नऊ वर्षांनंतर जानेवारी 2018 साली त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना समायरा नावाची मुलगी आहे.
9 Hours Web Series Review : फूल धमाल, तगडे क्लायमॅक्स आणि भन्नाट स्टोरी; दरोड्याची गोष्ट सांगणारी '9 Hours'
9 Hours Web Series Review : भारतीय सिने-प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे. हीच बाब लक्षात घेऊन डिस्ने प्लस हॉटस्टारने दाक्षिणात्य वेबसीरिजची निर्मिती करण्याची मालिकाच सुरु केली आहे. हॉटस्टारची '9 Hours' ही वेबसीरिज त्यापैकीच एक असून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, थरार-नाट्य पाहायला मिळत आहे. निरंजन कौशिक आणि जैकब वर्घेसने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'9 Hours' या वेबसीरिजमध्ये (9 Hours Web Series Cast) लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता तारका रत्न, अजय विनोद कुमार आणि रवी वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तसेच मधू शालिनी, प्रीती असरानी, मोनिका रेड्डी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज हिंदी, तामिळ, कन्नड, मराठी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेली आहे.
Alia Bhatt : आलिया भट्टच्या घरातून लीक झालेल्या फोटोप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शनमोडमध्ये; अभिनेत्रीशी साधला संपर्क
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -