Entertainment News Live Updates 22 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Apr 2023 03:49 PM
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' रिलीज होताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस; नेटकरी म्हणतायत, 'चित्रपट बघू नका, पैसे वाचवा'

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काल (21 एप्रिल)प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.  'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी काही मजेशीर मिम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन

Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा कार्यक्रम सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होणार असल्याने या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी शिव ठाकरेने तगडं मानधन घेतलं आहे. 


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन; आपल्या माणसाची स्टंट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगल करणार गौरीची मदत'; पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' महाएपिसोडचा प्रोमो

Sukh Mhanje Nakki Kay Asta:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका   प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकाचा महाएपिसोड प्रेकांच्या भेटीस येणार आहे. या महाएपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


पाहा प्रोमो: 





Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका रोमॅंटिक वळणावर; अरुंधती आशुतोषला म्हणणार का 'आय लव्ह यू'?

Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा समावेश करण्यात आला आहे. अरुंधती आणि आषुतोष नुकतेच लग्नबंधनात अडकले असून आता या मालिकेत रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. अरुंधती आशुतोषला 'आय लव्ह यू' बोलणार का याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 





Mazhi Tuzhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री चुलीवर भाजतीये भाकऱ्या; व्हिडीओ व्हायरल

Sheetal Kshirsagar: अभिनेत्री शीतल क्षीरसागरने (Sheetal Kshirsagar) छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं काही निगेटिव्ह भूमिका देखील साकारल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे शीतल क्षीरसागरला विशेष लोकप्रियता मिळाली. शीतल क्षीरसागर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर (Social Media) शेअर करते. शीतलच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतात शीतलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : शाहरुखच्या 'पठाण' पुढे फिका पडला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. 





Bollywood Stars Eid Wishes : ईद मुबारक! सलमान ते आमिर; सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

Bollywood Stars Eid Wishes : आज जगभरात रमजान ईद (Eid 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सेलिब्रिटीदेखील ईद साजरी करत आहेत. आता बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानपासून (Salman Khan) ते महेश बाबूपर्यंत (Mahesh Babu) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 





Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकरची कमाल! स्वत:ला कूल ठेवण्यासाठी 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती काय करते?

Madhurani Prabhulkar Post : 'आई कुठे करते' (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) सध्या चर्चेत आहे. मधुराने उष्णतेच्या काळात स्वत:ला कूल कसं ठेवायचं हे सांगणारी खास पोस्ट लिहिली आहे. 



Adipurush: 'जब न जा पाओ सारे धाम,तो बस ले लो प्रभु का नाम'; आदिपुरुष चित्रपटाचं लिरिकल मोशन पोस्टर

Adipurushआदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आज अक्षय्य तृतीयेला दिग्दर्शक ओम राऊतच्या (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे.  जय श्रीराम या गाण्याचं हे लिरिकल मोशन पोस्टर आहे. 



Salman Khan : सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' HD प्रिंटमध्ये लीक

Salman Khan Movie : सलमान खानचा  'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असून आता हा सिनेमा ऑनलाईन लिक झाला आहे. 

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या नृत्यामुळे तमाशा कलावंत अडचणीत

Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्यामुळे सध्या तमाशा कलावंत हैराण झाले आहेत. गौतमी पाटील जसा डान्स आणि हावभाव करते तसंच आम्ही देखील करावं,  अशी मागणी तमाशाची सुपारी घेऊन येणाऱ्यांकडून तमाशा कलावंतांकडे केली जात आहे. 

Mumbai : मुंबईत वेश्याव्यवसाय प्रकरणी भोजपुरी अभिनेत्री अटक, जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Mumbai : सुमन कुमारी अनेक सिनेमांत झळकली आहे. भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील सुमन कुमारी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने लैला 'मजनू' आणि 'बाप नंबरी, बेटा दस नंबरी' सारख्या अनेक भोजपुरी सिनेमांत काम केलं आहे. सुमन अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे. तिने भोजपुरी, हिंदीसह पंजाबी भाषेतील गाणी गायली आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरही आता मधुमास बहरणार; 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची टीम शोमध्ये लावणार हजेरी


Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावरील  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाची टीम 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये हजेरी लावणार आहे.


Kiran Mane: 'फुले, शाहू, आंबेडकरांच्या आयुष्यातल्या संघर्षाची उदाहरणं द्यायचो. पण...'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत


किरण माने यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरमाधील एक घटना सांगितली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, "बिगबाॅसचं घर... राखी किचनमध्ये होती. मी लिव्हींग एरीयातनं राखीला आवाज दिला, "राखीS... आज 6 डिसेंबर... जयभीम !" राखीनंही जोरदार नारा दिला, "जयभीSSSम" ! .'बिगबाॅस'मधल्या माझ्या लै लै लै नादखुळा, भन्नाट आठवणी आहेत. मैत्रीच्या, दुश्मनीच्या, शड्डू ठोकून आव्हान देत जिंकलेल्या टास्कच्या, 'डोक्यॅलिटी' वापरुन आखलेल्या स्ट्रॅटेजीजच्या, वादविवादांच्या, हास्यविनोदांच्या, सुत्रसंचालन, डान्सपासून अभिनयापर्यन्त अनेक गोष्टींमध्ये 'चमकण्याच्या' सुद्धा. पण त्या सगळ्यात, माझ्या काळजाच्या कप्प्यात 'स्पेशल' स्थान आहे ते मी आणि राखी सावंतनं ज्ञानसुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली त्या आठवणीला !"


Honey Singh: अपहरण आणि मारहाण केल्याच्या आरोपांवर हनी सिंहची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप...'


Honey Singh: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) त्याच्या गाण्यांनी नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. हनी सिंह हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विवेक रवी रामन नावाच्या कार्यक्रमाच्या आयोजकानं नुकताच  हनी सिंह  आणि  त्याच्या टीमवर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी  विवेक रवी रामननं बुधवारी (19 एप्रिल) मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. आता या प्रकरणावर हनी सिंहने मौन सोडले आहे. नुकतीच हनी सिंहने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून हनी सिंहनं त्याची बाजू मांडली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.