Entertainment News Live Updates 21 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jul 2022 02:02 PM
'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरेचा घायाळ करणारा अंदाज!

ऑनस्क्रीन सासू-सुनांची पुन्हा एकदा भेट!

नुकतीच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या ऑनस्क्रीन सासूबाई अर्थात अभिनेत्री निवेदिता सराफ यांची भेट घेऊन, त्यांच्याशी गप्पा मारल्या.


 





‘हे कधी ठरलं?’, लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री नित्या मेननने सोडलं मौन!

साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आणि ‘मिशन मंगल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री नित्या मेनन (Nithya Menen) लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. इतकंच नाही, तर अभिनेत्री एका लोकप्रिय मल्याळम अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही या चर्चांमधून समोर आलं आहे. नुकतेच मल्याळम एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना नित्या मेननने तिच्या लग्नाच्या या चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्रीने या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.


 





फुलांचा वर्षाव करत राखीने केलं आदिलचं स्वागत!

राखी सावंत सध्या तिच्या प्रियकर आदिलमुळे चर्चेत आहे. दोघेही सध्या सोबतच दिसत आहेत. नुकताच काही कामानिमित्त आदिल परदेशी गेला होता. बुधवारी. जेव्हा तो बऱ्याच दिवसांनी मुंबईत परतला, तेव्हा त्याला घ्यायला राखी सावंत विमानतळावर पोहोचली होती. यावेळी राखीने चक्क फुलांची उधळण करत आदिलचं स्वागत केलं. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.


 





Abhangwari : 'अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती!

Abhangwari : कोरोना काळाआधी म्हणजेच 2018 ते 2019मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. 23 जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे (Rahul Deshpande) आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

De Dhakka 2 Trailer : 'काय झाडी, काय हाटेल, ओक्केमध्ये एकदम...'; ‘दे धक्का 2’चा भन्नाट ट्रेलर रिलीज

De Dhakka 2 Trailer : 2008 मध्ये दिग्दर्शित झालेला‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. आता 14 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. दे धक्का-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंब हे लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहे. 


पाहा ट्रेलर: 


Liger Trailer : विजय देवरकोंडाची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; लायगरचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Liger Trailer  : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याचा ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील विजयच्या अॅक्शननं आणि अनन्या पांडेच्या (Ananya Panday) ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


 पाहा ट्रेलर: 


Nidhi Bhanushali : भिडे मास्तरांची लेक ओळखूही येईना! ‘तारक मेहता...’ फेम निधी भानुशालीचा भन्नाट मेकओव्हर

Nidhi Bhanushali : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू आत्माराम भिडे’ ही व्यक्तिरेखा साकारत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. निधी सध्या अभिनय विश्वाला रामराम ठोकून, भटकंतीचा आनंद लुटत आहे. मात्र, सध्या ती तिच्या नव्या लूकमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून निधी केव्हाच बाहेर पडली असली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र कधीच कमी झाली नाही.


वाचा संपूर्ण बातमी

पंजाबी गायक-गीतकार जानी उंच्या गाडीला जबर अपघात

पंजाबी गीतकार आणि गायक जानी यांच्या फॉर्च्युनर कारचा मंगळवारी संध्याकाळी मोहालीच्या सेक्टर-76मध्ये अपघात झाला आहे. मात्र, या अपघातात कारमध्ये असलेले पंजाबी गीतकार आणि गायक जानी, त्यांचा ड्रायव्हर यांच्यासह आणखी एक जण असे तिघेही बचावले आहेत. त्यांना तातडीने फेज-आठ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



Sushmita Sen : एकीकडे रिलेशनशिपची चर्चा, तर दुसरीकडे ट्रोलर्सचा हंगामा! सुष्मिता सेन फोटो शेअर करत म्हणतेय...

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या ललित मोदींसोबतच्या (Lalit Modi) नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच ललित मोदी यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. त्याआधी या दोघांच्या नात्याबद्दल कोणालाच माहितीही नव्हती. ललित मोदींनी ट्विट करताच सोशल मीडियावर मीम्स बनायला सुरुवात झाली. अभिनेत्री सुष्मिता सेनला सतत ट्रोल केले जाऊ लागले. एकीकडे तिच्या रिलेशनशिपची चर्चा होती, तर दुसरीकडे ट्रोलर्स तिला प्रचंड ट्रोल करत होते. मात्र यावर आता सुष्मिताने सडेतोड उत्तर दिले आहे. सुष्मिताने स्वतःचा एक फोटो शेअर करून, एक खास मेसेजही दिला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Autograph : एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी 'ऑटोग्राफ’, अभिनेता अंकुश चौधरी झळकणार मुख्य भूमिकेत!

Autograph : दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन असलेली, एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी 'ऑटोग्राफ' (Autograph) या चित्रपटामधून अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), उर्मिला कोठारे (Urmila Kothare), मानसी मोघे (Manasi Moghe) हे मराठीतील आघाडीचे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘ऑटोग्राफ’ ही कथा आहे प्रेम आणि प्रेमभंगाची व वर्षानुवर्षे जपलेल्या त्यांच्या आठवणींची. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. एका अनोख्या अशा दृष्टिकोनाची ही प्रेमकथा 'ऑटोग्राफ' 30 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'टकाटक 2'चा धमाकेदार टीझर रसिकांच्या भेटीला


काही सिनेमे केवळ बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे 'टकाटक'. पहिल्या सिनेमाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्यानं 'टकाटक 2'च्या रूपात या सिनेमाचा पुढील भाग 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरनंतर आता 'टकाटक 2'चा टीझरही लाँच करण्यात आला आहे.


'संगीत देवबाभळी'चा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या संगीत देवबाभळी या मराठी रंगभूमीवरील नाटकाचा या वर्षीपासून मुंबई विद्यापीठीच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या मराठी विषयात समावेश करण्यात आला आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्राजक्त देशमुखने सांभाळली आहे. या नाटकाचा बी ए अभ्यासक्रमात समावेश होणं ही मराठी नाट्यसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.


 महेश टिळेकर देणार निराधार महिलेच्या डोक्यावर छप्पर


पुण्यातील अप्पर इंदिरा नगरमधील ओटा वसाहतीत राहणाऱ्या 65 वर्षांच्या रंभा पवार यांच्यावर नियतीने बालपणापासूनच आघात केले. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठी असलेल्या संघर्षामुळे आता उतार वयात त्या हतबल झालेल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात रंभा बाईंचा एक डोळा कायमचा निकामी झाला. घरच्या गरिबीमुळे काबाडकष्ट करत आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर वर्षभरात पतीने त्यांना वाऱ्यावर सोडून देत दुसरे लग्न केले. एकट्या पडलेल्या रंभा पवार माहेरी आश्रयाला आल्या. आई वडिलांचा आणि भावाचा आधार मिळाला तरी दारोदार जाऊन जुने कपडे गोळा करून त्या बदली छोटी भांडी देण्याचा व्यवसाय करू लागल्या.एकेदिवशी डोक्यावर ओझं घेऊन ट्रेनमध्ये चढत असताना पाय घसरून त्या खाली पडल्या सुदैवानं जीव वाचला पण शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे 3 वर्ष त्या चालू शकल्या नाहीत. त्यावेळी भावानं त्यांना खूप जपलं.


'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू


'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळत असते. 2016 मध्ये कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो'ला सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.


जस्टिन बीबरची 'वर्ल्ड टूर'


प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर यानं काही दिवसांपूर्वी त्याला झालेल्या ‘रामसे हंट सिंड्रोम’या आजारची माहिती चाहत्यांना दिली होती. या आजारामुळे जस्टिनला त्याचे अनेक शो रद्द करावे लागले. आता त्याच्या 'जस्टिस वर्ल्ड टूर' ला पुन्हा सुरुवात होणार आहे. या टूरमध्ये इंडिया टूरचा देखील समावेश होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.