Entertainment News Live Updates 21 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Netflix Plan : नेटफ्लिक्सकडून गिफ्ट! 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट; भारताचं काय?
Netflix Plan : लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नेटफ्लिक्सने एकाच वेळी 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने हा निर्णय भारतातील आपल्या स्वस्तातील सब्सक्रिप्शन योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर घेतला आहे. भारतात सब्सक्रिप्शन दर कमी केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या एंगजमेंटमध्ये 30 टक्के आणि महसूलात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सने 2021 मध्ये भारतातील सब्सक्रिप्शन दर कमी केले होते.
पहिल्यांदाच 'नेटफ्लिक्स'ने भारतीय बाजारपेठेत 20-60 टक्क्यांनी आपले प्लॅन स्वस्त केले होते. नेटफ्लिक्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या जाहिरातीआधारीत सब्सक्रिप्शन प्लाननंतर ग्राहकांची संख्या अपेक्षेहून अधिक वाढली आहे. अपेक्षेप्रमाणे, आम्ही आमच्या मानक आणि प्रीमियम प्लॅनमधून लक्षणीयरीत्या कमी स्विच केलेले पाहिले आहे. नेटफ्लिक्सने कोणत्या 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट केलीय, याची माहिती समोर आली नाही.
Yash Chopra Wife Death: यश चोप्रांची पहिली पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन
Yash Chopra Wife Death: दिग्दर्शक यश चोप्रा यांची पहिली पत्नी आणि आदित्य चोप्रा यांची आई पामेला चोप्रा यांचे 20 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. पामेला चोप्रा एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका होत्या. यासोबतच त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पामेला चोप्रा या गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. यानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Aaradhya Bachchan : फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात धाव
Aaradhya Bachchan: बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन ( (Aaradhya Bachchan). आराध्या कायमच चर्चेत असते. सध्या आराध्या चर्चेत आली आहे ते तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे. युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Varun Dhawan : वरुण धवनचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत.
Varun Dhawan Movies IMDB Rating : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) वैयक्तिक आयुष्यासह त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. येत्या 24 एप्रिलला वरुण त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. यंदाचा त्याचा वाढदिवस खूपच खास आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याचे 'भेडिया' (Bhediya) आणि 'जुग जुग जिओ' (Jugjugg Jeeyo) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वरुणच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या आयएमडीबी रेटिंगमधल्या (IMDB Rating) वरुणच्या सर्वाधिक रेटिंग असलेल्या सहा सिनेमांबद्दल...
Kisi ka Bhai Kisi Ki Jaan Review : डोकं बाजूला ठेवून बघावा असा चित्रपट; वाचा 'किसी का भाई किसी की जान'चा रिव्ह्यू...
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review : सिनेमांचे तीन प्रकार असतात. चांगला, वाईट आणि सलमानचा (Salman Khan) सिनेमा. 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा 'सलमानचा सिनेमा' या कॅटेगरीत मोडणारा चित्रपट आहे. भाईजानचा सिनेमा चांगला असो किंवा वाईट पण त्याचे सिनेमे चाहते पाहतातच. त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Kisi ka Bhai Kisi Ki Jaan Review : डोकं बाजूला ठेवून बघावा असा चित्रपट; वाचा 'किसी का भाई किसी की जान'चा रिव्ह्यू...
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्वीस्ट
Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली असून आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
View this post on Instagram
Nagraj Manjule Movie : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे
Nagraj Manjule Announce New Marathi Movie Khashaba : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या त्यांच्या आगामी 'खाशाबा' (Khashaba) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी या सिनेमाची घोषणा केली असून आता या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
Dream Girl 2: पूजामुळे सलमान खान अजूनही आहे बॅचलर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
Dream Girl 2: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) चाहता वर्ग मोठा आहे. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ड्रीम गर्ल या चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ आयुष्माननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'किसी का भाई किसी का जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधील अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आवाज ऐकू येत आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram