Entertainment News Live Updates 20 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचे निधन झालेय. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांचं निधन झालं. तबस्सुम यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले होते. 1947 मध्ये मेरा सुहाग या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती. त्यांनी त्यांनी अनेक चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तबस्सुम यांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव अयोध्यानाथ सचदेव आणि आईचं नाव असगरी बेगम होतं. तबस्सुम यांचा विवाह विजय गोविल यांच्याशी झाला होता. विजय गोविल रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारमारे अरुण गोविल यांचे बंधू आहेत.
बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे. देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. गोव्यातील प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) म्हणजेच 'इफ्फी'ची (IFFI) चर्चा आहे. आजपासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
Shraddha Walker: श्रद्धा वालकर प्रकरणावर चित्रपट, नावही ठरलं
दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं (Aftab) गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. आता श्रद्धा वालकर प्रकरणावर एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचं कथानक हे श्रद्धा वालकर प्रकरणावर आधारित असणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंह (Manish F Singh) हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचं नाव देखील ठरलं आहे.
Drishyam 2 : अजयच्या 'दृश्यम 2'मध्ये झळकतोय मराठमोळा चेहरा
Siddharth Bodke On Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांचं त्यांच्या दमदार अभिनयासाठी कौतुक होत आहे. पण दुसरीकडे या सिनेमातील एका मराठमोळ्या चेहऱ्याने सिने-प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चेवर सुनील शेट्टीनं सोडलं मौन
सुनील शेट्टी सध्या 'धारावी बॅंक' या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला,"अथिया आणि केएलचं लग्न लवकरच होईल". सुनीलच्या उत्तरामुळे अथिया आणि केएल लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Akshaya Naik : "माझी नावडती व्यक्ती"; लतिकाकडून अभ्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
Akshaya Naik : 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अक्षया नाईक (Akshaya Naik) आणि समीर परांजपे (Sameer Paranjapee) मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची लतिका-अभिमन्यूची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. आज समीरच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने हटके पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
Aamir Khan : मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आमिर
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानचा (Ira Khan) नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेकीच्या साखरपुड्यात परफेक्शनिस्ट खूप आनंदी दिसून आला. त्याचा डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
Arijit Singh: कोमामध्ये गेलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला अरिजित सिंह; सोशल मीडियावर होतंय कौतुक
Arijit Singh: बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची (Aindrila Sharma) प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. एंड्रिला ही कोमात असून तिच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाने आतापर्यंत 12 लाखांचा खर्च केला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) आता एंड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी पोस्ट शेअर करुन अरिजित सिंहचं कौतुक करत आहेत.
We know who is #ArijitSingh
— ⓈⒶⒾⓀⒶⓉ ⒹⒺⓎ (@SAIKATD19929805) November 19, 2022
The king of heart ❤️
Blessings for #oindrilasharma 🙏 pic.twitter.com/qFTl2sCAGW