Entertainment News Live Updates 2 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Jan 2023 06:07 PM
Rinku Rajguru: आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'एवढा पैसा आलाय तर...'

Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.



Uorfi Javed: उर्फी जावेद विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था झाल्या आक्रमक

Uorfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हीच्या विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. आज या महिला संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य  महिला आयोगाकडे  तक्रार दिली आहे. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहे. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर प्रभाव पडत आहे. तिच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी, महिला संघटनांनी आज  महिला आयोगाकडे निवेदन देत केली आहे. जर उर्फी वर कारवाई झाली नाही तर तिला रस्त्यावर चोपण्याचा इशारा देण्यात आला आहे.यामध्ये मराठा प्रतिष्ठान,गायत्री महिला सामाजिक विकास संस्था,पंचशील महिला सहकारी संस्था, संजीवनी महिला प्रतिष्ठान,साहियार महिला संस्था या संस्थानी ही तक्रार केली आहे.

Ved : बॉक्स ऑफिसवर रितेश अन् जिनिलियाचा बोलबाला

Ved Movie : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'वेड' सिनेमाचा समावेश झाला आहे. 

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'अज मैं मूड...'

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे जय लक्ष्मी माता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता अमृता फडणवीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज करणार आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.



Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बंद होणार? समीर चौघुलेने एबीपी माझाला दिली माहिती

Samir Choughule On Maharashtrachi Hasyajatra : समीर चौघुले म्हणाले,"महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बंद होणार ही अफवा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 5 जानेवारीपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बंद होणार ही अफवा आहे. तसेच समीर चौघुलेने हास्यजत्रेला रामराम ठोकलेला नाही". 

Alia Bhatt : आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही प्रश्चाताप होणार नाही : आलिया भट्ट

Alia Bhatt On Motherhood : आलिया भट्टने (Alia Bhatt) लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. 2022 हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरलं आहे. पण दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. आता या सर्व ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे. 





Tunisha Sharma : आजच्या जामिनावर आम्ही विरोध करणार आहोत.

Tunisha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी तिचे वकील म्हणाले,"सिजान च्या कुटुंबीयांनी केलेले आरोप या केस संबंधित नाहीत. जी केस चालू आहे ती तुनिषाच्या आत्महत्या विषयी सुरू आहे. तुनीषा आणि शिझान यांचे आत्महत्या विषयी असे काय संभाषण झाले होते की तुनीषाला आत्महत्या करावी लागली. या केस मध्ये तिचा मामा कोण, आई कोण, आई चे रिलेशन काय याचा काहीच संबंध नाही. पण कुणाच्या चारित्र्याविषयी संशय उपस्थित करून आरोप करणे हे चुकीचे आहे आणि आम्ही या आरोपावर 100 टक्के मानहणीचा दावा दाखल करणार असे तुनीषा चे वकील तरुण शर्मा यांनी सांगितले आहे. 

Prasad Oak : नव्या वर्षात प्रसाद ओकची मोठी घोषणा

Prasad Oak On Toch Mi Prabhakar Panshikar : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत आता त्याचा 'तोच मी प्रभाकर पणशीकर' (Toch Mi Prabhakar Panshikar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Yami Gautam: 'मी रिक्षामधून जात होते तेव्हा...'; यामी गौतमनं सांगितला 'तो' किस्सा

Yami Gautam:  यामीनं मुलाखतीमध्ये सांगितलं,  'मला व्हॅलेंटाईन डेचा दिवस अजिबात आवडत नाही. त्या दिवशी मी खूप अस्वस्थ व्हायचे. कारण बाबा अनेकदा कामानिमित्त शहराबाहेर असायचे. त्यामुळे आम्ही ट्यूशनला रिक्षानं जात होतो. पण मुलं बाईकवर जात होती. ती मुलं रिक्षाच्या मागे यायची. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. मला आठवते कीय मी त्यांच्याकडे ती मुलं टक लावून पाहायचे. मी पूर्णपणे दुर्लक्ष करायचे.' 



Tunisha Sharma Case : अल्बम सॉन्गसाठी तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली; शिझानच्या कुटुंबियांचा प्रोडक्शन हाऊसवर मोठा आरोप

Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी शिझानची (Sheezan Khan) चौकशी सुरुच आहे. आज शिझानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तुनिषा शर्मा आणि शिझानच्या कुटुंबियांचं खूपच चांगलं नातं होतं. तिच्या आयुष्यासंबंधी सर्व गोष्टी ती शिझानच्या कुटुंबियांसोबत शेअर करत होती. अशातच आता पत्रकार परिषदेत शिझानच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की,"अल्बम सॉंगसाठी तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली गेली".

Anita Pointer: ग्रॅमी विजेत्या अनिता पॅाइंटर यांचे निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Anita Pointer: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार अनिता पॉइंटर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Tripti Dimri-Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Tripti Dimri-Karnesh Sharma:  कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नुकताच  तृप्ती आणि कर्णेश शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये  तृप्ती आणि कर्णेश यांचा रोमँटिक अंदाज दिसला. चित्रपट निर्माता सौरभ मल्होत्रानं हा फोटो काढला होता. फोटोवर हार्टचे इमोजी देखील दिसत आहे. तृप्ती आणि कर्णेश यांचा हा फोटो सध्या  व्हायरल होत आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तृप्ती आणि कर्णेश यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 



Sheezan Khan : शिझानच्या जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज

Tunisha Sharma Suiccide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Ruhanika Dhawan: वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्रीनं घेतलं आलिशान घर; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आईनं पैसे केले डबल..'

Ruhanika Dhawan: रुहानिका धवन (Ruhanika Dhawan)  ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ये है मोहब्बतें (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकानं या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली. रुहानिका ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. रुहानिकानं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या नव्या घराची माहिती दिली. रुहानिकाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 



Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील प्रसाद जवादेचा प्रवास संपला

Prasad Jawade On Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) शेवटच्या टप्प्यात आल्याने चाहत्यांमध्ये आता या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. अशातच आता या स्पर्धेतलं शेवटचं एलिमेनेश कार्य पार पडलं असून यातून प्रसाद जवादेला (Prasad Jawade) घराबाहेर पडावं लागलं आहे. 





Manasi Naik: 'दे तू घटस्फोट, तुझ्यासारख्या मुली...'; नेटकऱ्यानं केलं ट्रोल, मानसीचं सडेतोड उत्तर

Manasi Naik: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.  मानसीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. काही दिवसांपूर्वी मानसीच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली. या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधलं. या कमेंटला मानसीनं रिप्लाय दिला.  


Manasi Naik: 'दे तू घटस्फोट, तुझ्यासारख्या मुली...'; नेटकऱ्यानं केलं ट्रोल, मानसीचं सडेतोड उत्तर

Kaleidoscope : नेटफ्लिक्सचा 'कॅलिडोस्कोप' सत्य घटनेवर आधारित?

Kaleidoscope Netflix : गेल्या काही दिवसांत सत्य घटनेवर आधारित मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजची निर्मिती करण्यात येत आहे. सत्य घटनांवर आधारित कलाकृती प्रेक्षकांना भावत असल्याने अशाच कलाकृतींची निर्मिती करण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. आता नेटफ्लिक्सची (Netflix) 'कॅलिडोस्कोप' (Kaleidoscope) ही वेबसीरिज सत्य घटनांवर आधारित आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. 



Tunisha Sharma Suicide Case: "मी निर्दोष... न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास" : शिझान खान

Tunisha Sharma Suicide Case: काही दिवसांपूर्वी तुनिषा शर्मा (Actress Tunisha Sharma) हिनं शुटिंगच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तुनिषाचा मित्र आणि कोअॅक्टर शीझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली होती.  सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी शनिवारी सांगितलं की, शीझान निर्दोष आहे आणि त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. 


Tunisha Sharma Suicide Case: "मी निर्दोष... न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास"; तुनिषा शर्मा प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खानची प्रतिक्रिया

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shubhvivah: कुंजिका काळविंट करणार नव्या वर्षाची दमदार सुरुवात


Shubhvivah: मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच प्रेक्षकांची दुपारही मनोरंजनाने परिपूर्ण करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिकांना मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कुंजिकाची नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. 


Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन


Sudhir Nandgaonkar Passed Away : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर (Sudhir Nandgaonkar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्या कारणाने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर नांदगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला. 


महेश बाबूचा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढणार बोहल्यावर?


अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मालिकाविश्वात पुनरागमन


गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe), असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.