Entertainment News Live Updates 19 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Mar 2023 04:26 PM
Neha Pendse : नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई

Neha Pendse : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांत काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहीत नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे. 

Pathaan : शाहरुख-दीपिका नव्हे तर 'हे' आहेत 'पठाण'चे खरे चेहरे

Pathaan BTS Photo : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने एकाहून एक स्टंट आणि अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसून आले आहेत. पण हे सीन्स करण्यासाठी दोघांनाही बॉडी डबलचा वापर केला आहे. सध्या 'पठाण' सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण बॉडी डबल्ससह पोज देताना दिसत आहेत.





Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या 'नियम व अटी लागू' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदडं प्रतिसाद

Prashant Damle :  नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल तर निर्माते प्रशांत दामले यांचं भन्नाट नियम व मजेशीर अटींसह रंगभूमीवर आलेलं ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक नक्की पाहा. गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच पार पडला असून या प्रयोगाला नाट्यरसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Kartik Aryan : कार्तिक आर्यन चढणार बोहल्यावर

Kartik Aryan Wedding : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. कार्तिकच्या सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत असतात. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतचं एका कार्यक्रमात कार्तिकने लग्नासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यामुळे आता कार्तिक आर्यन लवकरच बोहल्यावर चढणार (Kartik Aryan Wedding) असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 





Shalin Bhanot : शालिन भानोत 'बेकाबू' मालिकेच्या सेटवर जखमी

Shalin Bhanot Injured : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिनेता शालिन भानोत (Shalin Bhanot) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शालिनची 'बेकाबू' (Bekabu) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या शरीरार अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं समोर आलं आहे. 





Aaliya Siddiqui : आलिया सिद्दीकीच्या अडचणीत वाढ

Aaliya Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने (Aaliya Siddiqui) त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर नवाजने हे आरोप फेटाळून लावले होते. आता आलियाच्या एका जवळच्या मैत्रिणीनेदेखील तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Vedat Marathe Veer Daudale Saat: महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला, गंभीर जखमी

Vedat Marathe Veer Daudale Saat: दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) च्या सेटवरील कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला आहे. हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. नागेश खोबरे असं तटबंदीवरुन कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे.

Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'

Sonali Kulkarni Instagram Post : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसली. 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. सोनालीनं आता याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान झळकणार 'या' बिग बजेट सिनेमात; जाणून घ्या अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल...


Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या सिनेमांसह सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. लवकरच तिचा 'गॅसलाइट' (Gaslight) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 31 मार्चला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा पाठोपाठ सारा आणखी एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. सारा लवकरच 'गुंजन सक्सेना'चा दिग्दर्शक शरण शर्माच्या (Sharan Sharma) आगामी सिनेमात दिसणार आहे.














Rajinikanth : अभिनेते रजनीकांत उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर; राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याची माहिती


Rajinikanth Uddhav Thackeray Meet : मूळचा मराठी असलेल्या, दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree) जाऊन भेट घेतली आहे. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरेंची राजकीय भेट घेतली नसून सदिच्छा भेट घेतली आहे. 


Mrs Chatterjee VS Norway : राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; जाणून घ्या कलेक्शन...














Mrs Chatterjee Vs Norway Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची (Rani Mukerji) मुख्य भूमिका असलेला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.














Sukh Mhanje Nakki Kay Asta: स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीपच्या आईची होणार एन्ट्री; अतिशा नाईक साकारणार ‘मंगल’ ही भूमिका








 






Sukh Mhanje Nakki Kay Asta:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta)  मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. जवळपास 30 वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झालीय. सुटका होताच जयदीपची भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. मंगल म्हणजे जयदीपची आई. 30 वर्ष मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचं ठरवलं आहे. मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की. 















































- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.