Entertainment News Live Updates 19 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2022 04:21 PM
Aaryan Khan : एनसीबीकडून क्लीन चिट मिळालेला आर्यन खान मित्रांसोबत करतोय पार्टी; क्लबमधील व्हिडीओ व्हायरल

Aaryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aaryan Khan) ड्रग्ज प्रकरणातून सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. पण आता आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आर्यन खान पुन्हा चर्चेत आला आहे. आर्यन खानचा नाइटक्लबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 


वाचा सविस्तर बातमी

Tehran : जॉनच्या 'तेहरान'मध्ये मानुषी छिल्लरची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष

Tehran : सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात करणारी मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) आता लवकरच एका नव्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जॉन अब्राहमच्या (John Abraham) 'तेहरान' (Tehran) या चित्रपटामध्ये आता मानुषी छिल्लरची एन्ट्री झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी  'तेहरान' चित्रपटामधील मानुषीच्या लूकचे फोटो रिलीज केले आहेत. 'तेहरान' चित्रपटामध्ये मानुषी प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

Janhvi Kapoor : कुटुंबासोबत चित्रपट करायचाय, नावही ठरलं!; जान्हवी कपूरनं व्यक्त केली मनातील इच्छा

Janhvi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) 'गुडलक जेरी' (Goodluck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता.  जान्हवीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. जान्हवी सध्या तिच्या 'बवाल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेक वेळा जान्हवी कपूरला स्टारकिड असल्यानं ट्रोल केलं जातं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं तिच्या कुटुंबासोबत एक चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. 


वाचा सविस्तर बातमी

Hruta Durgule : हृता दुर्गुळेचा जबरा फॅन; दिली अनोखी भेट, गिफ्ट पाहून हृता म्हणते...

Hruta Durgule : रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). 'अनन्या' (Ananya) चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. हृताच्या अशाच एका चाहत्याने तिला एक अनोखी भेट दिली आहे. या चाहत्याने हृताला 'अनन्या' नावाची एक सुंदर अंगठी भेट देऊन तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

Kiccha Sudeep : साऊथ चित्रपटांच्या यशाबाबत अभिनेता किच्चा सुदीपनं मांडलं मत; म्हणाला, 'हा कंटेन्टचा विजय'

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता  किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) विक्रांत रोणा (Vikrant Rona) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जूनमध्ये रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या किच्चा सुदीप हा त्याच्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. किच्चा हा हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. आता एका मुलाखतीमध्ये त्यानं बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांबद्दल त्याची मतं व्यक्त केली. 


वाचा सविस्तर बातमी 

अदनान सामीचा सोशल मीडियाला अलविदा?

पद्मश्री विजेता लोकप्रिय गायक अदनान सामी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, अलविदा अशी एकाच पोस्ट केली आहे. त्याची अलविदा ही पोस्ट पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. त्याने सोशल मीडियाला अलविदा केला असावा, अशी अटकळ बांधली जात आहे.


 





'ख्वाडा', 'बबन' चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा 'टीडीएम' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

TDM Marathi Movie : 'ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेत यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Kahrade) यांचा 'बबन' (Baban) हा चित्रपटही सुपरहिट ठरला. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'हैद्राबाद कस्टडी' (Hyderabad Custody)  हा त्यांचा सिनेमाही 2023ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांचे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असले, तरी भाऊराव आता एका वेगळ्या धाटणीचा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत.


Sonalee Kulkarni : 'तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सोनालीचं मजेशीर उत्तर


मराठमोळ्या प्रियंका मोरेच्या नावाचा परदेशात डंका!

Ghasjomi : प्रियंका मोरे (Priyanka More) या मराठमोळ्या निर्मातीची 'घासजोमी' (Ghasjomi) ही फीचर फिल्म यंदाच्या 19व्या स्टुटगार्ड आंतरराष्ट्रीय महोत्सवात येत्या 23 जुलैला दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही फीचर फिल्म बंगाली भाषेत आहे. मराठमोळ्या प्रियंका मोरेची ही उत्तुंग भरारी पाहून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. प्रियांकाने आपल्या यशाने सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Sonalee Kulkarni : 'तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सोनालीचं मजेशीर उत्तर

Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) तमाशा लाईव्ह (Tamasha Live) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता सोनालीनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 


वाचा सविस्तर बातमी 

मराठी चित्रपटाचं पुढचं पाऊल, थ्रीडीमध्ये अवतरणार 'संत ज्ञानेश्वर महाराजां'ची महागाथा!

Sant Dnyaneshwar Maharaj : महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं महान संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रानं संतपरंपरेचा वारसा जपला आहे. वारकरी संप्रदायातील थोर संतांच्या आध्यात्मिक वचनांनी परदेशीय नागरिकांच्या मनावरही गारुड केलं आहे. एकीकडे लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून संतांच्या शिकवणूकीची जपणूक करत आहेत, तर दुसरीकडे याच महान संतांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी नागरिक भारतात येऊन वास्तव्य करत आहेत. 'ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।' या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी (Sant Dnyaneshwar Maharaj) संतरूपी इमारतीचा पाया रचला. आईप्रमाणे सर्वांवर मायेची पाखर घालणारे संत ज्ञानेश्वर आज माऊली म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात. या माऊलींची गाथा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साथीनं लवकरच थ्रीडी रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Jai Bhim Controversy : सूर्या आणि त्याची टीम विरोधात कोणतीही कडक कारवाई नाही, ‘जय भीम’ वादावर मद्रास हायकोर्टाचा आदेश!

Jai Bhim : सध्या सगळीकडे साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता सूर्याचा चित्रपट ‘जय भीम’ने (Jai Bhim) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाला जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकाच तो वादातही अडकला होता. ‘जय भीम’ हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे, तर ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. प्रंचड लोकप्रियता मिळवलेला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. एका समाजाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी या चित्रपटाचा अभिनेता सूर्या (Suriya), दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि अभिनेत्री ज्योतिका (Jyothika) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मद्रास हायकोर्टात सुरु होते. या प्रकरणावर आता कोर्टाचा निर्णय आला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'किसी नजर को तेरा इंतजार…' गीत गाणारे गजल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन


Singer Bhupendra Singh: सोमवारी रात्री मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. भूपिंदर सिंह हे प्रसिद्ध संगीतकार आणि प्रामुख्याने गझल गायक होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन देखील केले आहे.


Puja Sarkar : 21 वर्षाच्या मॉडेलनं संपवलं आयुष्य; राहत्या घरात आढळला मृतदेह


Kolkata Model Puja Sarkar Suicide : कोलकाता  (Kolkata) चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येंच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली आहे.  मे महिन्यामध्ये जवळपास चार अभिनेत्रींनी आत्महत्या केली. या अभिनेत्रींच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे? तसेच बंगाली चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या वाढत का आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. आता दक्षिण कोलकाता (Kolkata) येथील बांसद्रोणी भागामध्ये राहणाऱ्या पूजा सरकार (Puja Sarkar) नावाच्या मॉडेलनं आत्महत्या केली आहे.


Hit-The First Case : बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'हिट'ची जादू; पहिल्या वीकेंडमध्ये केली कोट्यवधींची कमाई


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  राजकुमार रावचा (Rajkummar Rao)  हिट-द फर्स्ट (Hit-The First Case) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये कोट्यवधींची कमाई केलेली आहे. तरण आदर्शनं या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईबाबत सांगितलं.


Ranbir Alia : रणबीर-आलियाकडे एक नव्हे, दोन चिमुकले पाहुणे येणार? अभिनेत्याच्या उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष!


सध्या सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे. नुकतीच या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणबीरने दिलेल्या एका उत्तरामुळे आता त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधू लागले आहेत.


‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत विशाखा सुभेदारची एन्ट्री होणार! अप्पू-शशांक आता तरी एकत्र येणार?


स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा आणि शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ‘दमयंती दुधखुळे’ असं या पात्राचं नाव असून, ती एक विवाह सल्लागार असणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार दमयंती दुधखुळे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.