Entertainment News Live Updates 19 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kartik Aaryan: 'शहजादा'ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, मुंबई पोलिसांनी कापले कार्तिक आर्यनचे चलान
Kartik Aaryan: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या 'शहजादा' (Shehzada) चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. कार्तिक आणि क्रितीच्या या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर गर्दी जमवण्यास सुरुवात केली आहे. दोघेही 'शेहजादा'साठी खूप उत्सुक आहेत आणि त्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या तेलुगु हिट 'अला वैकुंठापुरमुलू'चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात पूजा हेगडेचीही भूमिका होती. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कार्तिक (Kartik Aaryan) त्याच्या चित्रपटाच्या रिलीजनंतर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. एकीकडे कार्तिक मंदिरात दर्शन घेत असताना दुसरीकडे त्याच्या लॅम्बोर्गिनी कारचे पोलिसांनी चलान कापले.
Jawan Movie : 'जवान' चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका
Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पठाणने आतापर्यंत 508.35 कोटींची कमाई केली आहे. आता शाहरुख खानने त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दिग्दर्शक ॲटलीच्या जवान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी शाहरुख खान चेन्नईला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात किंग खानबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट
Project K Release Date Out : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.
Nawazuddin Siddiqui: 'अन्न नाही आणि पैसेही नाहीत...' दुबईमध्ये अडकली नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण, व्हिडीओ व्हायरल
Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. त्यातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईमधील (Dubai) मोलकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत आहे.
The video & my statement speaks for itself. Govt authorities are requested to urgently rescue the house help of @Nawazuddin_S from Dubai where the girl is in a state of Solitary Confinement@cgidubai @UAEembassyIndia @LabourMinistry @HRDMinistry@MEAIndia @CPVIndia @OIA_MEA pic.twitter.com/EyQ8DiHPG2
— Advocate Rizwan Siddiquee (@RizwanSiddiquee) February 19, 2023
Celebrity Cricket League 2023: क्रिकेटच्या मैदानावर बालिका वधु फेम अविकाचा ग्लॅमरस अंदाज; व्हिडीओनं वेधलं लक्ष
Celebrity Cricket League 2023 : सेलिब्रिटी क्रिकेट लीगला (Celebrity Cricket League 2023) सुरुवात झाली आहे. या क्रिकेट लीगमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये मुंबई हिरोज, कर्नाटक बुलडोझर्स, चेन्नई रायनोज, तेलगू वॉरियर्स, केरळ स्ट्रायकर्स, बंगाल टायगर्स, पंजाब दे शेर आणि भोजपुरी दबंग या टीम्समध्ये एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत, असं म्हटलं जात आहे. सुनील शेट्टी (Suniel Shetty), बॉबी देओल (Bobby Deol) यासारखे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेणार आहेत. आता या क्रिकेट लीगच्या सामन्याला अभिनेत्री अविका गौरनं (Avika Gaur) हजेरी लावली. अविकानं क्रिकेटच्या मैदानावरील एक व्हिडीओ शेअर केला.
View this post on Instagram
Sonu Sood Special Thali: भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव; अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट
Sonu Sood Special Thali Pics : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो. तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्टही शेअर करतो. नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे नाव देण्यात आलं. यावर त्यानं पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
Vastraharan : मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक 'वस्त्रहरण'
Vastraharan Marathi Drama : 'वस्त्रहरण' (Vastraharan) हे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक (Marathi Natak) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाटकाचे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आतापर्यंत या नाटकाचे 5254 प्रयोग झाले असून लवकरच या नाटकाचा 5255 वा प्रयोग रंगणार आहे. 'वस्त्रहरण' हे अजरामर मराठी नाटक रंगभूमीवर दाखल झाल्याने नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
View this post on Instagram
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' बोगस सिनेमा"; प्रकाश राजचं वक्तव्य,अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर
Prakash Raj On The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकतच केरळ चित्रपट महोत्सवात अभिनेता प्रकाश राजने (Prakash Raj) या सिनेमावर भाष्य केलं आहे.