Entertainment News Live Updates 17 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Marathi Movie : वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: मराठी चित्रपट दर्जेदार असूनही त्यांना आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार मराठी निर्मात्यांची असते. अलिकडच्या काही घटनांवरुन ही गोष्ट अधिक ठळकपणे समोर आली आहे. त्यावर आता राज्याच्या सांस्कृतिक खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या चित्रपटगृहाने वर्षातून जर चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर त्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोटे उस्ताद गाणार, सुरांची जादू होणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' (Me Honar Superstar Chhote Ustaad) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad 2) या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Adipurush: 'मंगलमय हर भक्त होगा, जब आदिपुरुष का स्वागत होगा'; आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष
Adipurush: 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अभिनेता प्रभासनं (Prabhas) या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रभासनं या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
Prashant Damle : निकाल लागला! अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले
Natya Parishad Election : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची निवड झाली आहे.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजने मल्हारसाठी गायलं गाणं; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीस्ट आला आहे. या मालिकेमधील स्वराज ऊर्फ स्वराचा आवाज परत आला आहे. गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे. मल्हार हाच स्वराजचा बाबा आहे, हे आता स्वराजला सर्वांना सांगायचं आहे. स्वराज गेल्या काही दिवसांपासून हे मल्हारला सांगायचा प्रयत्न करत आहे. आता स्वराजनं मल्हारला एक गाणं गाऊन दाखवलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर मल्हारला खूप आनंद होतो.
View this post on Instagram
Natya Parishad : मराठी नाट्य परीषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले शरद पवारांची भेट घेणार
Natya Parishad : मराठी नाट्य परीषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले शरद पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहेत.
Khatron ke khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पुन्हा दिसणार शिव ठाकरे अन् अब्दू रोजिकची जोडी? निर्मात्यांची 'छोटा भाईजान'ला विचारणा
Shiv Thakare Abdu Rozik On Khatron Ke Khiladi : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाची सध्या चर्चा आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू असून असून या पर्वात सहभागी होणारे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिकची (Abdu Rozik) जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
Khatron ke khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पुन्हा दिसणार शिव ठाकरे अन् अब्दू रोजिकची जोडी? निर्मात्यांची 'छोटा भाईजान'ला विचारणा
Pune FTII : पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण
Pune FTII : पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (Film and Television Institute of India) या संस्थेत सिनेसृष्टीशी संबंधित अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. आता या शिक्षण संस्थेतील मुलं कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. संस्थेने एका विद्यार्थाला बॅचमधून काढून टाकल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे.
Aai Kuthe Kay Karte : वीणा अरुंधतीला म्हणाली,"तू तीन मुलांची आई, अनिरुद्धसोबत 25 वर्षांचा संसार..."
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस यावी साठी निर्माते सतत नव-नवे ट्वीस्ट आणत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात वीणा अरुंधतीला तिच्या लव्हस्टोरीबद्दल विचारताना दिसणार आहे.
View this post on Instagram