Entertainment News Live Updates 16 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Milind Gawali: 'आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये...'; 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. ते या मालिकेमध्ये अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंग हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. विविध विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच त्यांनी कॅमेरा आणि फोटो याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांनी काही आठवणींना उजाळा दिला आहे.
Anupamaa 5 Year Leap: अनुपमा मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट; 'या' अभिनेत्रीची होणार मालिकेमधून एक्झिट?
Anupamaa 5 Year Leap: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकेत पाच वर्षांचा लीप होणार आहे. या लीपमुळे मालिकेच्या कथानकामध्ये रंजक वळण येणार आहे.
Hemant Kher: 'स्कॅम 1992' मधील अभिनेता हेमंत खेरनं ट्वीट शेअर करत मागितलं काम; म्हणाला, ‘काम मंगाने में कैसी शर्म !’
Hemant Kher: मनोरंजनसृष्टीमध्ये काम करण्यासाठी अनेकांना स्ट्रगल करावा लागतो. चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम मिळण्यासाठी अनेक कलाकारांना ऑडिशन द्यावे लागते. तसेच काही कलकारांना ऑडिशन राऊंडनंतर रिजेक्ट देखील केलं जातं. सध्या एका अभिनेत्यानं चक्क सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रपट, वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम मागितलं आहे. स्कॅम 1992 फेम अभिनेता हेमंत खेरनं (Hemant Kher) नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यानं कास्टिंग डायरेक्टर आणि क्रिएटर्सकडे काम मागितलं आहे.
Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाल्या, 'मोस्ट फेव्हरेट...'
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
धुळे: नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी 30-35 वर्षानंतर पार पडली मतदान प्रक्रिया
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियमक मंडळासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली, धुळे जिल्ह्यातूनही प्रतिनिधी निवडले जाणार असून जिल्ह्यातून एका जागेसाठी दोन उमेदवार ही निवडणूक लढवीत आहेत. तब्बल तीस ते पस्तीस वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात मतदान होत असून नटराज पॅनल रंगकर्मी समूहाचे चंद्रशेखर पाटील आणि भाजपचे यशवंत येवलेकर यांच्यात ही लढत होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियमक मंडळाची पाच वर्षांत निवडणूक होते प्रत्येक जिल्ह्यातून नियमक मंडळावर सदस्य निवडले जातात त्यानुसार धुळे जिल्ह्यातून एक सदस्य निवडला जाणारा असून गेल्या 30 ते 35 वर्षांपासून नाट्य परिषदेचे कार्य जिल्ह्यात सुरू आहे मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यातून नियमक मंडळाच्या प्रतिनिधीची बिनविरोध निवड होत होती, ही परंपरा यंदा खंडित झाली असून सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली नटराज पॅनल रंगकर्मी समूहातर्फे चंद्रशेखर पाटील आणि त्यांच्या विरोधात भाजपाचे यशवंत येवलेकर यांच्यात ही निवडणूक होत आहे जिल्ह्यातून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेत चंद्रशेखर पाटील यांना पाठिंबा दिला असून जिल्ह्यात नाट्य परिषदेचे 339 सदस्य आहेत...
Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवा ट्वीस्ट; नेटकरी म्हणाले, 'चला आता तरी ...'
Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत लवकरच एक नवा ट्वीस्ट. मल्हार आणि स्वरा यांच्या आयुष्यात लवकरच मंजुळाची एन्ट्री होणार आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मंजुळा ही भूमिका अभिनेत्री उर्मिला कानेटकर ही साकारणार आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये स्वरा उर्फ स्वराज आणि मंजुळा हे दिसत आहेत. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
Mrunmayee Deshpande : 'ढाप अजून...'; मृण्मयी देशपांडेच्या फोटोला गौतमीनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष
Mrunmayee Deshpande : मृण्मयीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. 'मी पोचले महाबळेश्वर ला...' असं कॅप्शन मृण्मयीनं तिच्या फोटोला दिलं. या फोटोमध्ये मृण्मयी ही नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. मृण्मयीच्या फोटोला गौतमीनं कमेंट केली, 'ढाप अजून माझे कपडे आणि म्हण मी गेल्या दोन वर्षात एक नवीन कपडा नाही घेतला.' गौतमीच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
Swara Bhaskar: "ही अराजकता..."; अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करचं ट्वीट
Swara Bhaskar: गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आता या प्रकरणाबद्दल अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhaskar) देखील एक ट्वीट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. स्वरानं या ट्वीटच्या माध्यमातून प्रशासनावर निशाणा साधला आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
An extra judicial killing or an encounter is not something to be celebrated. It signals a state of lawlessness. It signals that the State agencies have depleted credibility because they are acting like or enabling criminals. This is not strong governance, this is anarchy.
— Swara Bhasker (@ReallySwara) April 15, 2023