Entertainment News Live Updates 15 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 May 2023 03:17 PM
Zara Hatke Zara Bachke: प्रेम, लग्न अन् घटस्फोट, कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी; 'जरा हटके जरा बचके' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Zara Hatke Zara Bachke: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या  'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला  'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर विकी आणि सारानं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्याची हटके स्टोरी दाखवण्यात आलं आहे. कपिल सौम्याच्या आयुष्यात काय घडतं? हे प्रेक्षकांना  'जरा हटके जरा बचके'  या चित्रपटात बघायला मिळणार आहे.


Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला उद्यापासून सुरुवात

Cannes 2023 Live Streaming : जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. यंदाचा फेस्टिव्हल फ्रान्समध्ये 16 मे ते 27 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय होणार आहे.

FTII Recruitment 2023 : FTII मध्ये अनेक पदांवर भरती; सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजच करा अर्ज

FTII Recruitment 2023 : फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे येथे शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी एफटीआयआयमधून शिक्षण घेतले आहे. आता या एफटीआयआयमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. एफटीआयआयमध्ये गट ब आणि क या श्रेणीच्या पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 

Aai Kuthe Kay Karte: डान्स आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा; पाहा 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो

Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्या सोहळा सुरु आहे. ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा देशमुखांच्या घरीच पार पडत आहेत. डान्स आणि गाण्यांनी  ईशा आणि अनिषचा साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यश हा ईशाचं कौतुक करताना दिसत आहे. 



Amitabh Bachchan: बिग बींची बाईक राईड; अनोळखी व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हणले, 'धन्यवाद मित्रा...'

Amitabh Bachchan:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हार्ड वर्किंग अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी कोणत्याही चित्रपट किंवा कार्यक्रमाच्या सेटवर वेळेवर पोहचत असतात. नुकताच अमिताभ यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन हे एका अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसलेले दिसत आहेत.  बिग बींना त्या  व्यक्तीनं लिफ्ट  दिली. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्या अनोळखी व्यक्तीचे आभार मानले आहेत. 





Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी' गाजवण्याआधी शिव ठाकरेने आईच्या आठवणींना दिला उजाळा

Shiv Thakare In Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) गाजवण्यासाठी शिव ठाकरे (Shiv Thakare) सज्ज झाला आहे. 'बिग बॉस मराठी'चा विजेता आणि 'बिग बॉस 16'चा पहिला रनर-अप शिव ठाकरेने (Shiv Thakare) आता 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्याआधी आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


वाचा सविस्तर

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा हा फॅमिली शो नाही राहिला' नेटकऱ्याची टीका; पृथ्वीक प्रतापनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, 'पॉर्न बघणाऱ्यांनी...'

Maharashtrachi Hasyajatra:    'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण आता एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमावर टीका केली आहे. या नेटकऱ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधील कलाकार पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) सडेतोड उत्तर दिलं आहे. 



Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळी' उत्कंठावर्धक वळणावर; कार्तिक घेणार दीपाचा जीव?

Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कार्तिक-दीपाच्या नात्याची आता नव्याने सुरुवात होणार ती तो तिचा जीव घेणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 





The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची छप्परफाड कमाई! दहा दिवसांत जमवला 135.99 कोटींचा गल्ला

The Kerala Story Box Office Collection Day 10 : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. रिलीजआधी अनेकांनी या सिनेमाला विरोध केला. पण दुसरीकडे रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. दोन्ही वीकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. 


वाचा सविस्तर

Santosh Chaudhari : 'बिग बॉस'फेम दादूसचा हळदी कार्यक्रमात हवेत गोळीबार

Santosh Chaudhari : आगरी कोळी गीतांचा बादशाह, 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम संतोष चौधरी (Santosh Chaudhari) उर्फ दादूस सध्या चर्चेत आहेत. नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमात त्यांनी हवेत गोळीबार केला आहे. त्यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 


वाचा सविस्तर

Gautami Patil : सोलापुरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजकांना पडला महागात; गुन्हा दाखल

Gautami Patil : सोलापुरात (Solapur) गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकांना चांगलच महागात पडलं आहे. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाचा सविस्तर

Adah Sharma Health Update : 'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

Adah Sharma Health Update : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) चर्चेत आली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.


वाचा सविस्तर

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Aaichya Maghari: आई आणि लेकीचं नातं; 'आईच्या माघारी' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस


Aaichya Maghari: देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आई घडवली असं म्हणतात. देव कोणी पाहिलेला नाही, पण त्याचं रूप असलेली आई प्रत्येकाच्या मागे सावलीप्रमाणे उभी असते कितीही धन-दौलत असेल आणि आई नसेल तर तो एक प्रकारे भिकारीच असतो. म्हणूनच 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' असं समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय. 14 मे हा सर्वत्र मातृदिन म्हणून साजरा केला जातो.  या दिवसाच औचित्य द्विगुणीत करण्यासाठी पिकल म्युझिकचे 'आईच्या माघारी' (Aaichya Maghari) हे नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे.


Chala Hawa Yeu Dya: मोठ्यांनाही लाजवेल अशी बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; ‘चला हवा येऊ द्या’चा प्रोमो पाहून खळखळून हसाल


Chala Hawa Yeu Dya:  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. सध्या  'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाच्या लहान तोंडी मोठा घास या स्पेशल एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये बच्चे कंपनी एक विनोदी स्किट सादर करताना दिसत आहे.  


Parineeti Chopra Raghav Chadha : राघव आणि परिणीती यांचा साखरपुड्यातील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल


Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा काल साखरपुडा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राघव आणि  परिणीती यांचा  साखरपुडा दिल्ली येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हजेरी लावली होती. राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील राघव आणि परिणीती यांच्यामधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.