Entertainment News Live Updates 15 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Mar 2023 06:01 PM
Naatu Naatu Song : जगभरात 'नाटू नाटू'चा डंका

RRR Movie Naatu Naatu Song : 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीने इतिहास रचला आहे. 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमधील पुरस्कारावर नाव कोरलं आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार,'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर गूगलवर या गाण्याचं सर्चिंग 1,105 पटीने वाढलं आहे. 





Honey Singh : हनी सिंहवर येणार डॉक्युमेंट्री

Honey Singh Documentary : लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





Salman Khan : सलमानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता

Salman Khan : एबीपी माझाने लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi) मुलाखत दाखवल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोईने एबीपीच्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Raavrambha : ओम आणि मोनालिसा उलगडणार 'रावरंभा'ची प्रेमकहाणी

Raavrambha Marathi Movie : इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचीत आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मुळशी पॅटर्न'च्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर (Om Bhutkar) आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागलची (Monalisa Bagal) जोडी 'रावरंभा' (Raavrambha) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.





Masterchef India : 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या विजेत्याचा फोटो लीक

Masterchef India : 'मास्टरशेफ इंडिया' (Masterchef India) हा लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. 'मास्टरशेफ इंडिया'च्या सातव्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या पर्वातील विजेत्याचं नाव समोर आलं आहे. 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान या पर्वातील विजेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 





RRR 2 : 'आरआरआर 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

RRR : 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दरम्यान या सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) बेस्ट ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला आहे. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर राजामौलींनी लगेचच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. 





Ananya Panday: बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात सिगारेट ओढली; अनन्याचा व्हायरल फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

Ananya Panday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या तिच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे. अनन्यानं तिची चुलत बहीण अलाना पांडेच्या (Alanna Panday) मेहंदी सोहळ्या हजेरी लावली. अलाना ही इवोर मॅकक्रेसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. अलानाच्या मेहंदी सोहळ्यातील अनन्याचा  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनन्या ही सिगारेत ओढताना दिसत आहे. अनन्याचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 








 








Jawan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट पुढे ढकलली;

Shah Rukh Khan Jawan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. देशासह परदेशात या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे. दरम्यान चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे. 





Oscar 2023 After Party: ऑस्कर जिंकल्यानंतर RRR चित्रपटाच्या टीमची जंगी पार्टी; एस.एस राजामौली यांच्या घरातील सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

Oscar 2023 After Party'आरआरआर' (RRR) या दाक्षिणात्य चित्रपटामधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याने ऑस्कर-2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग कॅटेरगरीमधील पुरस्कार जिंकला. 'आरआरआर' या चित्रपटाने भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता ऑस्कर पुरस्कार जिंकल्याने जगभरातील लोक आरआरआर या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत आहेत. ऑस्कर जिंकल्यानंतर आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी त्यांच्या लॉस एंजेलिस येथील घरी एका पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला आरआरआर चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. 


पाहा फोटो 












 



Alia Bhatt Birthday : वयाच्या सहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण; बॉलिवूड गाजवणारी आलिया आहे कोट्यवधींची मालकीण

Alia Bhatt Birthday :  प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज 30 वा वाढदिवस आहे. आलिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. गंगूबाई काठियावाडीमधील गंगू ते हायवेमधील वीरा, आलियाच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झाला. आलियाचे वडील महेश भट्ट हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. तिची बहीण पूजा भट्ट देखील अभिनेत्री आहे. आलिया ही अभिनयाबरोबरच व्यावसाय देखील करते. तिची स्वत:ची एड-ए-मम्मा (Ed-e-Mamma) नावाची कपड्यांची कंपनी आहे



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Lawrence Bishnoi Exclusive : माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी गायक सिद्धू मूसेवालाला मारलं; लॉरेन्स बिश्नोईचा तुरुंगातून गौप्यस्फोट


Sidhu Moosewala Murder Case Exclusive : पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोपी आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) एबीपी न्यूजच्या ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा केला आहे. भाऊ विक्की मिद्दुखेराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्धू मूसेवालाला मारल्याचे लॉरेन्सने सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून एबीपी न्यूजसाठी मुलाखत दिली. त्यावेळी हा गौप्यस्फोट केला.














Subhedar : शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प 'सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; मोशन पोस्टर आऊट


Subhedar Movie : शिवराज अष्कातील पाचवे चित्रपुष्प अर्थात 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 'सुभेदार' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) सांभाळली आहे. 


Hunter : अन्ना इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर'चा ट्रेलर रिलीज, पुन्हा दिसणार अॅक्शन मोडमध्ये


Suniel Shetty Hunter Web Series : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत आहे. पण आता आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीच्या आगामी 'हंटर' (Hunter) या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'हंटर'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. थरार-नाट्य आणि अॅक्शनचा तडका असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमध्ये सुनील शेट्टी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'हंटर' या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. 


'हंटर' या वेबसीरिजमध्ये सुनील शेट्टी, राहुल देव आणि ईशा देओल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये ईशा देओलच्या भूमिकेची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. 'हंटर-टूटेगा नहीं तोडेगा' असे ट्रेलरमधील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर 22 मार्चपासून पाहता येणार आहे.













- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.