Entertainment News Live Updates 15 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Deepika Padukone : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone) नावाचा समावेश झाला आहे. दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंना पाहून नेटकरी देखील अवाक् झाले आहेत.
Koffee With Karan 7: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की, रश्मिका ही प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. रश्मिका आणि विजय यांनी अजून त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. आता ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) मध्ये अभिनेत्री सारा अली खाननं (Sara Ali Khan) रश्मिका आणि विजयच्या नात्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.
Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकांचा बोलबाला आहे. या मालिकांच्या कथानाकांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, सध्या या मालिकांच्या सेटवर भीतीचं वातवरण पसरलं आहे. या मालिकांच्या सेटवर भूताचा वावर असल्याची चर्चा सुरु आली आहे. या भूताने ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजनाची आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘शालिनी’ची झोप उडवली आहे.
Rang Majha Vegla : स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल क्रमांक मिळवला आहे. या मालिकेच्या कथानकात सध्या अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या मालिकेत सध्या अनेक घडमोडी घडत असून, कथेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य आता दीपाला कळलं आहे. त्यामुळे ती आता आपल्या मुलीला मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहे.
2022 Movies IMDB Rating : 2022 हे वर्ष सिनेप्रमींसाठी अत्यंत चांगले वर्ष होते. कारण या वर्षी अनेक चित्रपट रिलीज झाले. 2022 मध्ये रिलीज झालेल्या काही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली तर काही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शन असणारे चित्रपट प्रेक्षक आवडीनं पाहतात. पाहूयात IMDB वरील बॉलिवूड चित्रपटांच्या रेटिंग्स...
Pratap Pothen : प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या प्रताप पोथेन (Pratap Pothen) यांचे निधन झाले आहे. चेन्नईमधील (Chennai) राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) स्टारर 'इमर्जन्सी' (Emergency) या आगामी चित्रपटाचा टीझर 14 जुलै रोजी रिलीज झाला. कंगनाचा हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. या टीझरने चाहत्यांवर जादू केली आहे. चित्रपटाचा हा टीझर रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंग आहे. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीवर आधारित आहे. कंगनाच्या ‘इंदिरा गांधीं’ लूकने याआधीच खूप वाहवा मिळवली आहे. तिच्या या भूमिकेसाठी सेलिब्रिटींपासून चाहत्यांनी सर्वांनी तिचे कौतुक केले. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील टीझर शेअर करत तिचे कौतुक केले आहे.
Nayanthara, Vignesh Shivan : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. नयनतारा आणि विग्नेश यांचा विवाह सोहळा चैन्नई येथे पार पडला. रजनीकांत, शाहरुख खान, मणिरत्नम, दिग्दर्शक बोनी कपूर, सूर्या, ए आर रहमान, एटली, कार्थी, वसंत रवी यांसारख्या सेलिब्रिटींनी नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. लग्न सोहळ्यातील नयनताराच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्नसोहळ्याचा अल्बम नेटफ्लिक्सवर रिलीज होणार होता. नेटफ्लिक्ससोबत नयनतारा आणि विघ्नेश यांनी 25 कोटींची डील केली होती. पण रिपोर्टनुसार, नयनतारा आणि निघ्नेश यांच्यासोबतची ही डील रद्द करण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे.
Bollywood Industry: बॉलिवूड विश्वातील ‘किंग’ आणि ‘सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या नावाची चर्चा अनेकदा होत असते. सलमान आणि शाहरुख त्यांच्या गेल्या काही चित्रपटांमधून आपली छाप सोडू शकले नसले तरी, त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्विट करत बॉलिवूडचा ‘किंग’ आणि ‘सुलतान’ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Lalit Modi, Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय. मात्र, या पोस्टनंतर आता नेटकऱ्यांनी या विषयावर धमाल मीम्स शेअर केले आहे.
Koffee With Karan 7, Gauri Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याचा लोकप्रिय शो कॉफी विथ करणचा 7वा सीझन (Koffee With Karan 7) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, करण हा शो होस्ट करत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहे. अनेकदा कलाकार आपल्या मनातील भावना आणि आयुष्यातील रहस्यांचा उलगडा या मंचावरच करतात. यावेळीही असेच काहीसे घडणार आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी आणि इंटिरियर डिझायनर गौरी (Gauri Khan) अनेक खुलासे पाहायला मिळणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या शोमध्ये गौरी खान पहिल्यांदाच तिचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणावर उघडपणे बोलताना दिसणार आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kon Honar Crorepati : डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ
'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि प्रसिद्ध लेखक, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सहभागी होणार आहेत.
Takatak 2 : 'टकाटक'चा येणार सिक्वेल; मोशन पोस्टर रिलीज
बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' (Takatak) या मराठी सिनेमाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक 2'ची (Takatak 2) रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. 18 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2'चं मोशन पोस्टर आता रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक 2'च्या मोशन पोस्टरमध्ये कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे.लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं अनोखं मोशन पोस्टर रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच 'टकाटक 2'च्या मोशन पोस्टरनं लक्षवेधी लाईक्स मिळवले असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या भागात आमिर खान होणार सहभागी; हॉट सीटवर बसून देणार उत्तर
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानातदेखील भर घातलो. त्यामुळेच या कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता असते. 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात आमिर खान (Aamir Khan) सहभागी होणार आहे. तसेच हॉट सीटवरबसून प्रश्नांचे उत्तर देताना दिसणार आहे.
ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो
अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी(Lalit Modi) यांच्या प्रेमाचा अध्याय सुरु झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत काही फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय. तसेच सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Ananya : 'होऊ दे चर्चा' रविवारी रंगणार 'अनन्या' स्पेशल भाग; हास्यवीरांचे विनोद कार्यक्रमाला हास्याचे रंग चढवणार
प्रेक्षकांना येत्या रविवारी एक खास कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल' (Hou De Charcha Ananya Special) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. 'अनन्या' सिनेमाचा संपूर्ण चमू या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. दरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. 'अनन्या' या सिनेमाची पहिल्या पोस्टरपासून चर्चा आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि लेखन आपल्या खुमासदार शैलीत समीर चौघुले यांनी केले असून वनिता खरात, प्रभाकर मोरे, शिवाली परब, गौरव मोरे, चेतना भट, ओंकार भोजने हे कलाकार गावकऱ्यांच्या भूमिकेत धमाल उडवणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -