Entertainment News Live Updates 15 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Aug 2022 04:39 PM
Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Laal Singh Chaddha : लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक ट्वीट शेअर केले या ट्विटमध्ये भगवंत मान यांनी लिहिलं, 'लाल सिंग चड्ढा हा चित्रपट मी पाहिला. हा चित्रपट बंधुभावाचे उदाहरण आहे. हा चित्रपट एकमेकांमध्ये द्वेष न करण्याचा संदेश देखील देतो. या अप्रतिम चित्रपटासाठी आमिर खान आणि त्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.' भगवंत मान यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 





अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

अनिल कपूर यांची पोस्ट



अमेरिकेत लैहराया परचम! 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीने परदेशात साजरा केला 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'

राणादा आणि पाठक बाईंचं केळवण!

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. टीव्हीवरची ही लोकप्रिय जोडी आता रिअल लाईफमध्येसुध्दा लग्नबंधनात अडकतेय



Sussanne Khan With Beau Arslan Goni: सुझान खानची बॉयफ्रेंड अर्सलान गोनी आणि भाऊ झायेदसोबत जंगी पार्टी!

सुजैन खान काही दिवसांपासून अर्सलान गोनीला डेट करत आहे. जेव्हापासून त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे, तेव्हापासून हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. 



Shabaash Mithu On Netflix: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण ओटीटीवर हिट; 'शाबास मिथू' यशावर तापसीची पन्नूची प्रतिक्रिया

Shabaash Mithu On Netflix : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या बॅक टू बॅक चित्रपट रिलीज होत आहेत. तापसीच्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी तापसीचा 'शाबास मिथू' हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट स्पोर्ट्स बायोपिक आहे. क्रिकेटपटू मिताली राज यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) या चित्रपटात तापसीनं प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता पण सध्या या चित्रपटानं ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. 'शाबास मिथू' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. सध्या हा चित्रपट भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.  


वाचा सविस्तर बातमी

निशा रावलच्या अडचणी वाढणार, करण मेहराच्या बाजूने उभी राहिली कश्मीरा शहा!

अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) प्रकरणी त्यांची मैत्रीण अभिनेत्री कश्मीरा शाहने (Kashmera Shah) प्रथमच मौन सोडले आहे. कश्मीरा शाहने या गोष्टी दिसतायत त्यापेक्षा किती वाईट आहेत, हे उघड केले. कश्मीरा शाह अभिनेत्री निशा रावल आणि करण मेहरा यांची जवळची मैत्रीण आहे. टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या प्रकरणात कश्मीरा शाहने उडी घेतली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Pippa : 'पिप्पा' चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

 Pippa : पाहा  'पिप्पा' चित्रपटाचा दमदार ट्रेलर 


Shyamchi Aai : 'श्यामची आई' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता साकारणार साने गुरुजींची भूमिका

Shyamchi Aai : मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबतच क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या आगामी मराठी चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं (Om Bhutkar) साने गुरुजींची भूमिका साकारली आहे.


पाहा पोस्टर

अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’च्या कमाईचे आकडे वाढले! पाहा किती झाले कलेक्शन...

रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 'रक्षा बंधन'च्या कमाईत काहीशी वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली होती. 'रक्षा बंधन'ने दुसऱ्या दिवशी 6-6.40 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी अक्षयच्या चित्रपटाने केवळ 6.80 कोटींची कमाई केली होती. मात्र, या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी एकूण 8.70 कोटींचा गल्ला जमवला आहे.


 





Ajay Devgn : अजयनं शेअर केला 'भोला' चित्रपटाच्या सेटवरील खास पोस्ट

अनन्या पांडेचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?

‘लाल सिंह चड्ढा’ला सुट्टीचा फायदा मात्र, तरीही कमाईचा आकडा कमीच!

गेल्या तीन दिवसांपासून आमिर खानच्या या चित्रपटाची कमाई सातत्याने घटत होती. अशा परिस्थितीत आमिर आणि त्याच्या चित्रपटासाठी रविवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला. रिलीजच्या चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, आमिर खानच्या या चित्रपटाने सुट्टीचा फायदा घेत देशभरात सुमारे 10 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आतापर्यंत देशभरात एकूण 37.96 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.


 

'नौदलातील शूर सैनिकांसोबत एक दिवस'; कार्तिक आर्यननं शेअर केली खास पोस्ट

पाकिस्तानचा सर्वात महागडा चित्रपट! 'फवाद आणि माहिरा खान अभिनित 'मौला जट्ट'चा ट्रेलर रिलीज

पाकिस्तानचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं बोललं जात असलेल्या 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान ही सुपरहिट जोडी पाहायला मिळणार आहे.


 


राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूची नस दबली, लाडक्या कॉमेडियनच्या प्रकृतीसाठी चाहते करतायत प्रार्थना!

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी नवी अपडेट समोर येत आहे. नव्या अपडेटनुसार, राजू यांचा एमआरआय रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार त्यांच्या मेंदूतील नस दबल्याची माहिती समोर आली आहे.


 





Happy Birthday Adnan Sami : कधी वाढलेलं वजन तर कधी चार लग्न, अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला अदनान सामी!

लोकप्रिय गायक अदनान सामी (Adnan Sami) आज (15 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अदनान बराच काळ पाकिस्तानात राहत होता आणि आता त्याने भारतीय नागरिकत्व स्वीकारले असून, तो भारतात स्थायिक झाला आहे.


 





शाहरुखच्या ‘मन्नत’वर डौलाने फडकला तिरंगा!

शाहरुख खानने पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुले आर्यन खान (Aryan Khan) आणि अबराम खान (Abram Khan) यांच्यासह त्यांच्या घरी अर्थात 'मन्नत' वर तिरंगा फडकावला आणि 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग नोंदवला.


 





शाहरुखच्या ‘मन्नत’वर डौलाने फडकला तिरंगा!

शाहरुख खानने पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुले आर्यन खान (Aryan Khan) आणि अबराम खान (Abram Khan) यांच्यासह त्यांच्या घरी अर्थात 'मन्नत' वर तिरंगा फडकावला आणि 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग नोंदवला.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘पुढचा नंबर तुमचा’, सलमान रश्दींना पाठिंबा देणाऱ्या ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांना धमकी!


भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने स्टेजवर चढून त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. अनेक सेलिब्रिटींनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘हॅरी पॉटर’च्या (Harry Potter) लेखिका जेके रोलिंग (JK Rowling) यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला होता. त्यांनी सलमान रश्दींच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. तेव्हापासून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.


आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, तिसऱ्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!


चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर (Kareena Kapoor-Khan) मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने सुरुवातीचे दोन दिवस फारच कमी कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. शनिवारी देखील या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे.


अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला! पाहा कलेक्शनचा आकडा


बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या वर्षात रिलीज झालेले दोन चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अक्षयच्या नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची निराशाच केली आहे. अक्षयच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, हा चित्रपट सपाटून आपटल्याचे कळते आहे. अक्षयचा हा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही.


‘आपल्या प्रार्थनांना यश मिळतंय’, अभिनेता सुनील पाल यांनी दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट


कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे कुटुंबीय चाहत्यांना सातत्याने माहिती देत ​​आहेत. दरम्यान, कॉमेडियन आणि राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र सुनील पाल (Sunil Pal) यांनी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे सध्या एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, व्हेंटिलेटरवर आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झालेली नाही. गेल्या आठवड्यात राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.


'समायरा'तील 'आला रे हरी आला रे' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला; 26 ऑगस्टला सिनेमा होणार प्रदर्शित


पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्थान आणि विठोबाच्या दर्शनाची आस, जिथे एकत्र येते ती म्हणजे पंढरीची वारी. याच वारीचा आभास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे, वारकऱ्यांमध्ये आणि विठ्ठलामध्ये असणाऱ्या जिव्हाळ्यावर भाष्य करणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' (Samaira) सिनेमातील 'आला रे हरी आला रे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.