Entertainment News Live Updates 15 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Harry Potter: 'हॅरी पॉटर' आता ओटीटीवर; घरबसल्या पाहता येणार जादूई दुनिया, केव्हा होणार रिलीज? जाणून घ्या
Harry Potter: हॅरी पॉटरचे (Harry Potter) चाहते जगभरात आहेत. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती. या कथांनी सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकली. लोक जेव्हा या कथा पाहतात तेव्हा त्यात हरवून जातात. आजही हॅरी पॉटर या चित्रपटांची सीरिज लोक आवडीनं बघतात. आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी एचबीओ मॅक्स (HBO Max) या ओटीटी प्लॅटफॉर्मनं दिली आहे. एचबीओ मॅक्सनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हॅरी पॉटरच्या टेलिव्हिजन सीरिजची माहिती दिली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून हॅरी पॉटरचे चाहते खूश झाले आहेत.
Jogira Sara Ra Ra Teaser Out: 'जोगी का जुगाड कभी फेल नहीं होता' ; नवाजुद्दीनच्या ‘जोगीरा सारा रा रा’ चा टीझर रिलीज
Jogira Sara Ra Ra Teaser Out : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.अशातच नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नवाजुद्दीनचा ‘जोगीरा सारा रा रा’ (Jogira Sara Ra Ra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनचा कॉमेडी अंदाज बघायला मिळत आहे.
Abhijit Bichukale : बिचुकले 'भाईजान'ला पाहून नेटकरी बिचकले; म्हणाले"आम्ही याचा निषेध करतो..."
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Poster Abhijit Bichukale : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे पोस्टर आऊट झाल्यानंतर एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Milind Gawali: 'आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये...'; 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. ते या मालिकेमध्ये अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंग हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. विविध विषयांवरील पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच त्यांनी कॅमेरा आणि फोटो याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांनी काही आठवणींना उजाळा दिला आहे.
View this post on Instagram
Anupamaa 5 Year Leap: अनुपमा मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट; 'या' अभिनेत्रीची होणार मालिकेमधून एक्झिट?
Anupamaa 5 Year Leap: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकेत पाच वर्षांचा लीप होणार आहे. या लीपमुळे मालिकेच्या कथानकामध्ये रंजक वळण येणार आहे.
View this post on Instagram
Hemant Kher: 'स्कॅम 1992' मधील अभिनेता हेमंत खेरनं ट्वीट शेअर करत मागितलं काम; म्हणाला, ‘काम मंगाने में कैसी शर्म !’
Hemant Kher: मनोरंजनसृष्टीमध्ये काम करण्यासाठी अनेकांना स्ट्रगल करावा लागतो. चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम मिळण्यासाठी अनेक कलाकारांना ऑडिशन द्यावे लागते. तसेच काही कलकारांना ऑडिशन राऊंडनंतर रिजेक्ट देखील केलं जातं. सध्या एका अभिनेत्यानं चक्क सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रपट, वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम मागितलं आहे. स्कॅम 1992 फेम अभिनेता हेमंत खेरनं (Hemant Kher) नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यानं कास्टिंग डायरेक्टर आणि क्रिएटर्सकडे काम मागितलं आहे.
A humble request to all the writers, directors, casting directors and creators, kindly consider me to play parts in your stories/movies/series/short films. I am full of zeal & enthusiasm to explore as an actor 🙏#casting #movies #OTT #Bollywood #actor
— Hemant Kher (@hemantgkher) April 13, 2023
Riteish Deshmukh: राजकारणात एन्ट्री करणार? रितेश देशमुख म्हणाला...
Riteish Deshmukh: 'रितेशचं प्रेम कशावर आहे, राजकारण की सिनेमा?'असा प्रश्न नुकत्याच एका कार्यक्रमात रितेशला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत रितेश म्हणाला, राजकारण. पुढे रितेशला मुलाखतीत विचारण्यात आलं की, तुला राजकारणात एन्ट्री करायची आहे का? यावर रितेश म्हणाला, 'राजकारणात यायचंय असं मी म्हणालो नाही पण राजकारण हे माझं पहिलं प्रेम आहे. राजकारणा विषयी माझी आवड आणि आपुलकी आहे. ' रितेशला पुढे विचारण्यात आलं, 'म्हणजे तू कधी राजकारणात जाणार नाही?' या प्रश्नाचं उत्तर देत रितेश म्हणाला, 'भविष्यात काय होईल काहीच माहित नसतं.'
View this post on Instagram
Shaakuntalam Box Office Collection Day 1: समंथाच्या ‘शाकुंतलम’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
Shaakuntalam Box Office Collection Day 1: समंथा रुथ प्रभुची ‘शाकुंतलम' ही एक पीरियड ड्रामा फिल्म आहे. या चित्रपटाची समंथाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. एका रिपोर्टनुसार, समंथाच्या ‘शाकुंतलम' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट वीकेंडला चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.