Entertainment News Live Updates 14 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 May 2023 01:57 PM
Madhuri Dixit : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग

Madhuri Dixit Top 10 IMDB Rated Movies : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्यासोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांत तिने काम केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्याने आजही ती चाहत्यांना थक्क करत असते. माधुरी दीक्षितच्या वाढदिवशी जाणून घ्या अभिनेत्रीच्या लोकप्रिय सिनेमांबद्दल...


Madhuri Dixit : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग

Chala Hawa Yeu Dya: मोठ्यांनाही लाजवेल अशी बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; ‘चला हवा येऊ द्या’चा प्रोमो पाहुन खळखळून हसाल

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. सध्या  'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाच्या लहान तोंडी मोठा घास या स्पेशल एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये बच्चे कंपनी एक विनोदी स्किट सादर करताना दिसत आहे.  



The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची एक्सप्रेस सुसाट; बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई

The Kerala Story Box Office Collection : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. ओपनिंग डेपासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता रिलीजच्या दुसऱ्याच आठवड्यात हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला आहे. 



Raghav Chadha Net Worth : परिणीती आणि राघव यांच्यात कोण सर्वात जास्त श्रीमंत? जाणून घ्या कपलच्या संपत्तीबद्दल...

Raghav Chadha Net Worth : राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबत एक चार्टर्ड अकाउंटंटदेखील आहेत. त्यांनी डेलॉइट, श्याम मालपाणी आणि ग्रँट थॉर्नटन यांसारख्या अकाउंटन्सी फर्ममध्ये काम केलं आहे. डिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 50 लाख आहे. राघव 2012 साली आपमध्ये सामील झाले आणि सर्वात तरुण राज्यसभा सदस्य म्हणून ते ओळखले जातात. राघवकडे मारुती स्विफ्ट डिझायर आणि 90 ग्रॅमचे दागिने आहेत. याची किंमत सुमारे 4,95,000 रुपये आहे. त्यांच्याकडे 37 लाख रुपयांचं घरही आहे.

Cannes Film Festival 2023 : तिकीटाची किंमत ते ड्रेस कोड; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'बद्दल जाणून घ्या सर्वकाही...

Cannes Film Festival 2023 Details : जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची गणना होते. भारताची मान उंचवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'च्या (Cannes Film Festival 2023) रेड कार्पेट उतरणार आहेत. तसेच अनेक सिनेमेदेखील या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 


Cannes Film Festival 2023 : तिकीटाची किंमत ते ड्रेस कोड; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'बद्दल जाणून घ्या सर्वकाही...

Aai Kuthe Kay Karte : आईच्या साडीत सुद्धा ईशाला जाणवते मायेची ऊब; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच ईशा आणि अनिशचा साखरपुडा पार पडणार आहे. दरम्यान अरुंधतीजवळ ईशा थोडी भावूक झाली आहे. आईच्या साडीत सुद्धा ईशाला मायेची ऊब जाणवत आहे.





Amol Kolhe: पिंपरीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या फ्री पाससाठी पोलिसांची धमकी

Pune: पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. नाटकाचे पास दिले नाही तर सादरीकरण कसं होतं ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची माहिती त्यांनी देत खंत व्यक्त केली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबंधित पोलिसांना समज द्यावी,असं आवाहनही त्यांनी केलं. 


Amol Kolhe: पिंपरीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या फ्री पाससाठी पोलिसांची धमकी; महानाट्याच्या मंचावरून डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, फडणवीसांनी....

Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. गेले काही दिवस मौन बाळगून एकत्र दिसणारे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो टाकून चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सया आणि रेवाच्या लग्नाचा बार उडणार; शेतकरी मुलाला नवरी मिळणार!


Shetkarich Navra Hava : 'शेतकरीच नवरा हवा' (Shetkarich Navra Hava) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. या मालिकेत आता सया आणि रेवाच्या लग्नाचा बार उडणार आहे. 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेचा आता एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागात प्रेक्षकांना सया आणि रेवाचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 14 मे 2023 रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना सया आणि रेवाचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. 


Khatron Ke Khiladi 13: 'खतरों के खिलाडी'मध्ये कोणाचं मानधन सर्वात जास्त?


Khatron Ke Khiladi 13:  'खतरों के खिलाडी' (Khatron Ke khiladi) हा छोट्या पडद्यावरील धमाकेदार रिअॅलिटी शो आहे. खतरों के खिलाडीचे 13 वे (Season 13) पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. 'जय हो' आणि 'रेस 3' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री 'डेजी शाहा' ही देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच ती या स्पर्धेतील सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक असल्यांच म्हटलं जात आहे. 


Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत साजरा केला 'मदर्स डे'


Pratishodh Zunj Astitvachi Mother's Day 2023 Special : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही मालिका आई आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. आता या मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे' (Mothers Day 2023) साजरा केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.