Entertainment News Live Updates 13 February : नय्यो लगदा गाण्यामुळे सलमान खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Feb 2023 09:50 PM
केजीएफ मधील यश आणि कांतारा फेम ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; शेअर केले फोटो

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 12 फेब्रुवारी रोजी 'एरो इंडिया 2023' चे उद्घाटन करण्यासाठी बेंगळुरू  (Bengaluru) येथे गेले होते. यावेळी राजभवनात त्यांनी साऊथ चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांची भेट घेतली.  ‘केजीएफ’ (KGF) फेम यश (Yash) आणि  'कांतारा' फेम  ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांची भेट नरेंद्र मोदी यांनी घेतली.  ऋषभ शेट्टी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



Shreyas Talpade: चित्रपटामधील एका सीनमुळे श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. सध्या श्रेयसनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रेयसचा कमाल धमाल मालामाल (Kamaal Dhamaal Malamaal) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनच्या व्हिडीओला रिप्लाय करत श्रेयसनं माफी मागितली आहे. 

Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही".

Salman Khan: कुणी म्हणतंय, 'पीटी टीचर' तर कुणी म्हणतंय, 'मुर्गी वाली डान्स स्टेप'; 'नय्यो लगदा' गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

Salman Khan Trolled For Naiyo Lagda Song: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं काल (12 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आलं. 'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 'नय्यो लगदा' गाणं सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गाण्यामधील सलमानच्या एका डान्स स्टेपला नेटकरी ट्रोल करत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या पसंतीने अविवाहित नाही". 

Arpit Kapoor : सी. आय.डी फेम अभिनेत्याच्या पत्नीचं चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण शोधण्यात सोलापूर पोलिसांना यश

Arpit Kapoor : 'सीआयडी' या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणारा अभिनेता अर्पित कपूर (Arpit Kapoor) याच्या पत्नीचे चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण सोलापूर (Solapur) पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढलं आहे. अर्पित एका लग्नासाठी त्याच्या पत्नीसोबत सोलापुरला गेला होता. त्यावेळी त्याच्या पत्नीचं गंठण चोरीला गेलं होतं. 





Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' वादाच्या भोवऱ्यात

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) आता संपला असून रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) या पर्वाचा विजेता ठरला आहे. 'बिग बॉस' या वादग्रस्त कार्यक्रमात दररोज काही ना काही वाद पाहायला मिळाले आहेत. आता या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतरही हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विजेतेपदावरुन चाहते नाराज झाले आहेत. 

Shiv Thakare : शिव ठाकरेने उपविजेतेपदावर मानलं समाधान

Shiv Thakare On Shiv Thakare : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून एमसी स्टॅन (MC Stan) या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर 'आपला माणूस' शिव ठाकरेला (Shiv Thakare) उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देत शिव ठाकरे म्हणाला,"अमरावती ते 'बिग बॉस 16'पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या





Bigg Boss 16 Winner: 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅनची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्या...

MC Stan : एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एमसी स्टॅन म्हणाला,"बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकल्याचा खूप आनंद आहे. 'बिग बॉस 16' जिंकावं अशी खरतरं माझ्या भावाची म्हणजेच शिवची  इच्छा होती. पण आता तो मला समजून घेईल अशी आशा आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलो आहे. पुण्यात मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे पुणेकरांसह माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. खूप खूप प्रेम". 

Ghar Bandook Biryani : "आशेच्या भांगेची नशा भारी"; नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिरयानी'ची रिलीज डेट पुढे ढकलली

Ghar Bandook Biryani Release Date : नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Bandook Biryani) या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा सिनेमा 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





पुणेकर एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस 16'चा विजेता, विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर म्हणाला,"आईचं स्वप्न पूर्ण केलं"

Bigg Boss 16 Winner MC Stan Post : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या बहुचर्चित कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून यात एमसी स्टॅनने (MC Stan) बाजी मारली आहे. विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅन म्हणाला,"आईचं स्वप्न अखेर पूर्ण केलं". 





MC Stan :'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे?

Bigg Boss 16 Winner MC Stan : 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) विजेतेपदावर एमसी स्टॅनचं (MC Stan) नाव कोरलं आहे. पुणेकर असलेल्या एमसी स्टॅनचं (Bigg Boss 16 Winner MC Stan) खरं नाव अल्ताफ शेख (Altaf Shaikh) असं आहे. त्याला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. पण 'वाता' या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर 21 मिलियन व्हू्यूज मिळाले आहेत. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता


Bigg Boss-16: बिग बॉस-16  (Bigg Boss-16)  च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 चा विजेता ठरल्यानं आता त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे एमसी स्टॅनचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. 


'किसी का भाई किसी की जान' मधील पहिलं गाणं रिलीज


हिंदी चित्रपटसृष्टीतील भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) या गाण्याचा टीझर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर सलमानचे चाहते उत्सुकतेने या गाण्याची वाट बघत होते. आता हे पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 


Gautami Patil Apology : 'मी आता सुधारले तरी जुने व्हिडीओ लावून का बदनाम करता?', गौतमी पाटीलने पुन्हा मागितली माफी


Gautami Patil Apology : 'मी पूर्वी चुकले आणि त्यासाठी वारंवार माफी मागितली. आता ती चूक मी परत करणार नाही. आतातरी मला माफ करा, अशी विनंती लावणी क्वीन गौतमी पाटीलने (Gautami Patil) केली आहे. आज मोडलिंब येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ती असं म्हणाली आहे.


Masuta: सामाजिक संदेश देणारा 'मसुटा' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Masuta: वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित 'मसुटा' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा 'मसुटा'(Masuta) हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.