Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता
एमसी स्टॅन हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे.
![Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता bigg boss 16 winner mc stan bigg boss 16 grand finale bigg boss 16 winner prize money Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/b7c43e07e959842ddae89ea03d221b9b1676229304457259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss-16: बिग बॉस-16 (Bigg Boss-16) च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 चा विजेता ठरल्यानं आता त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे एमसी स्टॅनचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चे टॉप-5 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाटा या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली.
View this post on Instagram
बिग बॉस-16 च्या विजेता एमसी स्टॅनला कलर्सच्या आयकॉनची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीवर गोल्ड युनिकॉर्नचा लोगो आहे. तसेच विजेत्याला ग्रँड आय 10 निओस (Grand i10 Nios) ही गाडी देखील मिळणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
एमसी स्टॅन हा त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याचा '80 हजार के जूते' हा सोशल मीडियावर डायलॉग खूप व्हायरल झाला होता. एमसी स्टॅनचे शूज, टी-शर्ट आणि बेल्ट या वस्तू अनेकांचे लक्ष वेधतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)