एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 13 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 13 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Juhi Chawla:  ड्रग्स प्रकरणादरम्यान जुही चावलानं केली होती आर्यन खानची मदत

अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) ही शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणावेळी खान कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली. आर्यन खानच्या सुटकेसाठी जुही चावला ही जामीनदार म्हणून कोर्टात दाखल झाली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी जुहीनं एक लाख रुपयांच्या बाँडवर सही केली. त्यानंतर आर्यन खान तुरुंगातून सुटला. एका मुलाखतीत जुहीनं आर्यनला केलेल्या मदतीबाबत सांगितलं. एका मुलाखतीमध्ये जुहीनं आर्यन आणि शाहरुखला केलेल्या मदतीबद्दल सांगितलं, 'हे सर्व घडणार आहे हे आम्हाला माहित नव्हते पण जेव्हा ते घडले तेव्हा मला वाटले की, मी मदत करू शकते. मला वाटले की मी तेव्हा त्याच्याबरोबर असणे योग्य आहे.'

Salman Khan : सलमान खानच्या 'किसी का भाई किसी जान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात!

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Advance Booking : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. ईदच्या मुहूर्तावर त्याचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. 

Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं बर्थडे सेलिब्रेशन

Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : देशातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी (Ambani) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) शाही उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे. 

14:37 PM (IST)  •  13 Apr 2023

Shah Rukh Khan : आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पुन्हा झळकण्यासाठी शाहरुख खान सज्ज

Shah Rukh Khan Dunki Movie Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्याचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 'डंकी' या सिनेमात किंग खान आर्मी ऑफिरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

13:53 PM (IST)  •  13 Apr 2023

Shahid Kapoor : नाकावर जखम, डोळ्यात आग; शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी'चं पोस्टर आऊट

Shahid Kapoor Bloody Daddy First Look Poster Out : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' (Bloody Daddy) या सिनेमाचं पोस्टर आता आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

13:13 PM (IST)  •  13 Apr 2023

Appi Aamchi Collector : मेहेनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली! 16 एप्रिलला रंगणार एक तासाचा विशेष भाग

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका सुरू झाल्यापासून अप्पी कधी कलेक्टर होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर आता तो दिवस जवळ आला आहे. मालिकेच्या आगामी भागात अप्पी कलेक्टर झालेली दिसणार आहे. अप्पीचा निकाल येत्या 16 एप्रिलला लागणार असून तिची मेहनत फळास येणार आहे आणि मालिकेच्या आगामी भागात ती कलेक्टर झालेली दिसून येईल. त्यानिमित्ताने अर्जुन, छकुली, दिप्या आणि गर्व गावकरी मिळून तिची मिरवणूक काढणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

12:09 PM (IST)  •  13 Apr 2023

Sanjay Dutt : संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले

Sanjay Dutt On Injured : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) 'केडी' (KD) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावर संजय दत्तची ही बातमी चांगलीच  व्हायरल झाली होती. संजय दत्तला गंभीर दुखापत झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत होते. पण अभिनेत्याने आता ट्वीट करत या वृत्तावर खुलासा केला आहे. संजय दत्त म्हणाला,"मी ठीक आणि निरोगी आहे". 

11:01 AM (IST)  •  13 Apr 2023

Satish Kaushik Birth Anniversary : खास मित्राचा वाढदिवस अनुपम खेर धुमधडाक्यात साजरा करणार

Satish Kaushik Birth Anniversary : लोकप्रिय अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खास मित्र अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget