एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 12 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 12 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

जॉन अब्राहमने सुरु केले ‘तेहरान’चे शूटिंग, चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता जॉनने त्याचा आगामी नवीन चित्रपट 'तेहरान'चे शूटिंग सुरू केले आहे. मॅडॉक फिल्म्स अंतर्गत बनणाऱ्या ‘तेहरान’ या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नुकताच याचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जॉन खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करत आहेत.

‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने चाहत्यांसोबत शेअर केली लेकाची पहिली झलक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री,  ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच आई-बाबा झाले असून सध्या ते त्यांच्या लाडक्या लेकासोबत म्हणजेच 'लक्ष्य' सोबत वेळ घालवत आहेत. मुलाबाबतचे सर्व अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता भारती आणि हर्षने लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'मी पुन्हा येईन' वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज येणार आहे.

'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज

'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे थिरकताना दिसत आहेत.

'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये मिकाच्या एक्स गर्लफ्रेंडची वाइल्ड कार्ड एन्ट्री

लोकप्रिय गायक मिका सिंहचा 'स्वयंवर मिका दी वोटी' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना आता या कार्यक्रमात मिकाची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

17:36 PM (IST)  •  12 Jul 2022

Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी तीन महिन्यांत चढणार बोहल्यावर; के एल राहुलसोबत अडकणार लग्नबंधनात

KL Rahul-Athiya Wedding : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के एल राहुल (Kl Rahul) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं जात आहे. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार, पुढल्या तीन महिन्यांत के एल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत. 

15:38 PM (IST)  •  12 Jul 2022

उर्फी जावेदचा अतरंगी लूक; ब्लेड्सपासून तयार केला ड्रेस

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Uorfi (@urf7i)

14:15 PM (IST)  •  12 Jul 2022

रणवीर सिंहने बेयर ग्रील्सवर केला चुंबनाचा वर्षाव, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

Ranveer Singh, Bear Grylls : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) नुकताच बेयर ग्रील्सच्या (Bear Grylls) शोमध्ये झळकला होता. या शोमधून रणवीरची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लीप बेयर ग्रील्सच्या शो मधली आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंह बेयर ग्रील्सवर चुंबनाचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

वाचा संपूर्ण बातमी

13:32 PM (IST)  •  12 Jul 2022

Khatron Ke Khiladi 12 : प्रतीक सहजपालवर भडकला रोहित शेट्टी

छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi 12) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनचं शूटिंग हे केपटाऊनमध्ये सुरु आहे. या सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेटवर मज्जा, मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. रिपोर्टनुसार या सिझनचा एक टास्क करताना स्पर्धक प्रतीक सहजपालनं (Pratik Sehajpal) गेमच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा प्रतीकवर भडकला होता. 

वाचा सविस्तर बातमी 

13:29 PM (IST)  •  12 Jul 2022

गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, ‘तू चाल पुढं’मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!

Tu Chal Pudha : अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab) हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये (Tu Chal Pudha) दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
Earthquake Tremors in Delhi: राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra NewsPrayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
Earthquake Tremors in Delhi: राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos: वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
new india cooperative bank: मॅनेजरवर दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली, स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण
मॅनेजरवर दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली, स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.