Entertainment News Live Updates 11 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2022 04:59 PM
राजकुमार रावच्या आगामी 'हिट' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज

'बधाई दो', 'बरेली की बर्फी', 'स्त्री', 'द व्हाइट टायगर' सारख्या सिनेमामुळे राजकुमार राव (Rajkumar Rao) चर्चेत आहे. राजकुमारचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सध्या राजकुमार राव 'हिट' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. राजकुमारच्या आगामी सिनेमाचे नाव 'हिट- द फर्स्ट केस' (Hit The First Case) असे आहे.  नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 

Kon Honaar Crorepati : काजोल आईला का घाबरते? 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात होणार उलगडा

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या मायलेकीचा अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी त्या 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत. काजोल आईला का घाबरते? याचा उलगडा  'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात होणार आहे. 

‘अंधकार भी थर थर कांपे’, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील नागार्जुनचा जबरदस्त लूक पाहिलात का?

Brahmastra Nagarjuna Look : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. निर्माते सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्टारकास्टचा फर्स्ट लूक शेअर करत आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांचा लूक समोर आला होता. आता निर्माता करण जोहरने या चित्रपटातील नागार्जुनचा (Nagarjun Akkineni) फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात नागार्जुन एका जबरदस्त लूकमध्ये दिसला आहे. या चित्रपटातून नागार्जुन पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात दिसणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Sidhu Moose wala Birthday: शुभदीप सिंह सिद्धूचा सिद्धू मुसेवाला बनण्यापर्यंतचा प्रवास!

Sidhu Moose wala Birthday: प्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose wala) यांचा आज वाढदिवस आहे. आजचा दिवस तसा आनंदाचा, पण हा दिवस त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच, त्यांच्या सर्व प्रियजनांसाठी खूप दुःखाचा आहे. कारण, गेल्या 29 मे रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गायक सिद्धू मुसेवाला आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.


वाचा संपूर्ण प्रकरण

‘धाकड’च्या रिलीज कंगना रनौतने घेतली सुट्टी! कुटुंबासोबत लुटतेय फिरण्याचा आनंद

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाच्या अपयशानंतर आता कंगना रनौतने कामातून ब्रेक घेतला आहे. मागील बराच काल ती चित्रपटांच्या कामात व्यस्त होती. मात्र, आता कंगनाने स्वत:साठी वेळ काढला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटत आहे.


नुकतीच कंगना रनौत तिच्या कुटुंबासह पिकनिकला गेली होती, ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना तिची बहीण रंगोली आणि पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये कंगना या सुंदर ठिकाणी कॅमेऱ्यासाठी फोटो पोज देत आहे. एका छायाचित्रात कंगना तिचा पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. अशाच आणखी एका फोटोत कंगना आणि रंगोली निसर्गाचा आनंद लुटताना दिसते आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

‘माझी प्रतिष्ठा खराब झाली!’, ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन काय काय म्हणाला?

Aryan Khan Case: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aaryan Khan) ड्रग्ज प्रकरणातून सुटका झाली आहे. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्थात एनसीबी ऑक्टोबरमध्ये मुंबईबाहेर एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. चौकशी सुरू असल्याने त्याला सुमारे 26 दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. आर्यनला गेल्या महिन्यातच क्लीन चिट मिळाली होती. या प्रकरणी आर्यन खानकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्याचवेळी, आता एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्यन खानच्या अटकेनंतर दिलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे.

जस्टिन बीबरची भयंकर आजाराशी झुंज! भारतातील दौरा रद्द होणार

Justin Bieber : आपल्या ‘बेबी’ गाण्याने सर्वांना वेड लावणारा गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. जस्टिन बीबर जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जस्टिनने काही दिवसांसाठी आपला दौरा पुढे ढकलला आहे. ही बातमी कळताच जगभरात पसरलेल्या त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, त्याने एक व्हिडीओ शेअर करत यामागचे कारण देखील सांगितले आहे. यातच त्याने आपल्या आजाराचा खुलासा केला आहे.


या व्हिडीओमध्ये, जस्टिनने त्याच्या चेहऱ्याला अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला असल्याचे सांगितले आहे. जस्टिन बीबरने खुलासा केला की, तो रामसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

'विक्रम वेधा'चे शूटिंग पूर्ण, हृतिक रोशनने शेअर केला सैफ अली खानसोबतचा 'हा' खास फोटो!

हृतिक रोशन , सैफ अली खान आणि राधिका आपटे यांचा आगामी चित्रपट 'विक्रम वेधा'चे शूटिंग संपले आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित, चित्रपट ऑक्टोबर 2021मध्ये अबू धाबी, लखनौ आणि मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आला.


 





मुलगी झाली हो....

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाषने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने सोशल मीडियावर याची घोषणा केली असून, तिचे बाळासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. 10 जून 2022 रोजी, सुंदर अभिनेत्री प्रणिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या बाळाच्या जन्माची घोषणा करताना काही फोटो शेअर केले आहेत. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


गायिका सावनी रविंद्र साऊथ इंडस्ट्री गाजवणार!


आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हिनं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.


सावनी तेलुगू संगीत क्षेत्रातील पदार्पणाविषयी सांगते, ‘मी सावनी ओरीजनल सिरीजमधून अनेक भाषेत गाणी गायली आहेत. यापूर्वी मी तेलुगू भाषेतील गाणी आणि जिंगल्स गायली होती. यावेळेस मी पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. तेलुगू गाणं गाण्यासाठी मी तेलुगू भाषा शिकले. साऊथच्या कोणत्याही भाषा गाताना खूप चॅलेंजिंग असतं. या भाषा समजायला आणि बोलायला अवघड असतात. परंतु, मी याआधी तमिळ, मल्याळम गाणी गायली आहेत. ती गाणी रेकॉर्ड करण्याआधी मी साऊथमधील विविध गाणी सातत्याने ऐकली होती. त्यामुळे या चित्रपटातील तेलुगू गाणी गाताना मला थोडं सोप्पं गेलं. या गाण्यांमध्ये बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत.’


तेलुगू गाण्यांच्या रेकॉर्डिंगविषयी बोलताना ती सांगते, ‘संगीत दिग्दर्शकाने हैदराबादवरून मुंबईत येऊन तब्बल दोन दिवसांत माझ्याकडून या तेलुगू चित्रपटातील सर्व गाणी रेकॉर्ड करून घेतली. त्यातील एक गाणं अरमान मलिकचं आहे. एक गाणं माझं आहे. एका गाण्यात मी आणि शुभंकरने डुएट गायले आहे. या गाण्यातील सर्व इमोशन्स, ताल, सूर यांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. या गाण्यांचे रेकॉर्डींग खेळीमेळीच्या वातावरणात मुंबईमध्ये पार पडले.’

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.