Entertainment News Live Updates 11 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला 'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं' हा सलमानचा डायलॉग ऐकू येत आहे.
राखी सावंत चुंबन प्रकरणी मिका सिंहची मुंबई उच्च न्यायालयात धाव; एफआयआर रद्द करण्याची याचिकेतून मागणी
बॉलिवूड गायक मिका सिंहनं (Mika Singh)) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. अभिनेत्री राखी सावंतचं (Rakhi Sawant) बळजबरीनं चुंबन घेतल्याप्रकरणी मिका सिंहविरोधात (Singer Mika Singh) गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 वर्षे जुना हा एफआयआर रद्द करण्याची मागणी मिकानं याचिकेतून केली आहे. या संपूर्ण प्रकरणी राखी सावंतला आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली भूमिका मांडण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
कुशल बद्रिके पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; साकारणार ‘रावरंभा’ चित्रपटातील 'कुरबतखान' ही भूमिका
आपल्या कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. येत्या 12 मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. ‘बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे’, असं कुशल सांगतो.
Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर
Thipkyanchi Rangoli Marathi Serial Latest Update : 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या अप्पू आणि प्राचीची परीक्षा सुरू असल्याचं दिसत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात अप्पूला परीक्षा न देता यावी यासाठी प्राची खास प्लॅन बनवणार आहे.
View this post on Instagram
Salman Khan: भर कार्यक्रमात सलमाननं दाखवले सिक्स पॅक्स; म्हणाला, 'तुम्हाला वाटतं वीएफएक्स आहे...'
Salman Khan Six- Pack Abs: अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान हा वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल (10 एप्रिल) रिलीज झाला. या ट्रेलरमधील सलमानच्या सिक्स पॅक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमाननं त्याचे सिक्स पॅक्स दाखवले.
Latest: #SalmanKhan goes shirtless 🔥🔥#KisiKaBhaiKisiKiJaanTrailer pic.twitter.com/NWbUI9nqnj
— Legend BALLU⚡ (@LegendSKFan) April 10, 2023
'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची खास पोस्ट; म्हणाली, 'आजच्या काळात पार्टी ...'
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे आणि कथानकामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
Sukh Mhanje Nakki Kay Asta: लक्ष्मीवर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून काय पाऊल उचलेल जयदीप? 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच मालिकेतील चिमुकली लक्ष्मी ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. नुकताच या मालिकेच्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये जयदीप हा लक्ष्मीवर चिडलेला दिसत आहे.
View this post on Instagram
Allu Arjun : शाहरुखच्या 'Jawan'मध्ये अल्लू अर्जुनची एन्ट्री!
Allu Arjun Completes Jawan Shoot : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने जगभरातील सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. आता त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या शाहरुख या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. किंग खानच्या या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे.