Entertainment News Live Updates 10 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Amruta Fadnavis: गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांचे 'मूड बना लिया' (Mood Banaleya) हे गाणे चार दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमृता फडणवीस यांचे हे गाणं रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत, तरी देखील हे गाणे युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
Pathaan Trailer: बॉलिवूडमधील शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) अॅक्शननं तसेच दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण हा ट्रेलर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता रणवीर सिंहची (Ranveer Singh) झलक दिसत आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे.
Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली. सध्या उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Pathaan Trailer OUT: 'बॉलिवूडचा बादशाह' अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) आणि बेशरम रंग (Besharam Rang) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली. या गाण्यांनंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर (Pathaan Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. या चित्रपटात शाहरुख खान दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
Bigg Boss 16: बिग बॉस-16 (Bigg Boss 16) च्या चाहत्यांसाठी यंदाचा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात बिग बॉस-16 मधील स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्य बिग बॉसच्या घरात येणार आहेत. शिव ठाकरेची (Shiv Thakare) आई, एम. सी. स्टॅनची आई आणि साजिद खानची (Sajid Khan) बहीण फराह खान (Farah Khan) हे बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत. बिग बॉस-16 चा एक प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान ही साजिदला पाहून रडताना दिसत आहे.
Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं 'आज मैंने मूड बना लिया है' (Aaj Main Mood Bana Liya Ay)हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं काही लोक कौतुक करत आहेत, तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना नवं गाणं कसं वाटलं? असा देखील प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नांना अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.
Ruhanika Dhawan: अभिनेत्री रुहानिका धवन (Ruhanika Dhawan) ये है मोहब्बतें (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकानं या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली. रुहानिकानं काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या नव्या घराची माहिती दिली. रुहानिकाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले होते. आता रुहानिकाच्या पालकांना काही नेटकरी ट्रोल करत आहे. यावर रुहानिका आणि तिची आई डॉली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Happy Birthday Hrithik Roshan : पहिलाच सिनेमा सुपरहिट! वर्षात 100 पेक्षा जास्त पुरस्कार, जाणून घ्या हृतिक रोशनचा प्रवास...
Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हृतिकच्या नृत्याचे अनेक जण दिवाने आहेत. हृतिकचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
पहिलाच सिनेमा सुपरहिट!
हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' (Kaho Naa Pyaar Hai) हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. एकीकडे सिनेमाला यश मिळत असताना दुसरीकडे मात्र हृतिकला अश्रू अनावर झाले होते. सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर हृतिक त्याच्या रुममध्ये पाच दिवस रडत बसला होता. त्यावेळी त्याला आपण सिनेसृष्टीत पदार्पण करुन चूक केली असं त्याला वाटत होतं.
"माझी जाहीरपणे माफी माग, स्वतःचे गुन्हे कबुल कर"; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खानला थेट इशारा
Somy Ali on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि त्याचे अफेअर्स सर्वश्रुतच... त्याचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सलमानच्या अशाच एका गाजलेल्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चर्चा रंगल्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे. सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणजे, नव्वदीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री. एकेकाळी सोमी अली (Somy Ali) आणि सलमान खानच्या अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूड गाजवलं होतं. सध्या सोमी अली चर्चेत अली आहे ती तिनं पुन्हा एकदा सलमान खानवर केलेल्या आरोपांमुळे.
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं शूटिंग कसं झालं? जाणून घ्या एकाचवेळी कसं जमवलं अभिनय अन् दिग्दर्शन...
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)
आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -