Entertainment News Live Updates 10 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Apr 2023 06:54 PM
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer: 'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं'; सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' जबरदस्त ट्रेलर रिलीज

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer:  बॉलिवूडचा भाईजान  सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला  'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं' हा सलमानचा डायलॉग ऐकू येत आहे.



Nawazuddin Siddiqui: नवाझऊद्दीन सिद्दीकी कौटुंबिक वाद प्रकरणी सुनावणी; नवाझच्या मुलांना लवकरच शिक्षणासाठी पुन्हा दुबईला पाठवलं जाईल

Nawazuddin Siddiqui:  बॉलिवूड अभिनेता नवाझऊद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादाचं प्रकरणी नवाझ आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात काही सामंज्याचे मुद्दे मान्य केले गेले होते. यावर आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या चेंबरमधील  सुनावणीत चर्चा झाली. ज्यात नवाझच्या मुलांना लवकरच शिक्षणासाठी पुन्हा दुबईला पाठवलं जाईल. आलियाही त्यांच्यासोबत दुबईत मुलांसोबत जाणार आहे. शूटिंग आटोपल्यावर नवाझही दुबईला मुलांकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आलिया मुलांसह दालनात सुनावणीसाठी हजर होती. 

Anil Kapoor Workout Video: अनिल कपूर यांचा 66 व्या वर्षी तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस; मायनस 110 डिग्री तापमानात केला वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल

Anil Kapoor Workout Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहेत.  66 वर्षाचे अनिस कपूर हे त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. अनिल हे त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ  व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वर्कआऊट करताना दिसत आहेत. 



Kushal Badrike: कुशल बद्रिके पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; साकारणार ‘रावरंभा’ चित्रपटातील 'कुरबतखान' ही भूमिका

Kushal Badrike:  आपल्या कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. येत्या 12 मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’  ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.   



Man Dhaga Dhaga Jodte Nava : माऊचं कमबॅक! 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत साकारणार आनंदीची भूमिका; प्रोमो आऊट

Man Dhaga Dhaga Jodte Nava Marathi Serial : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रसारित होत आहेत. 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकाचा प्रोमो आऊट झाला आहे. 



Chor Nikal Ke Bhaga Review : यामी गौतमचा 'चोर निकल के भागा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Chor Nikal Ke Bhaga Review : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि सनी कौशलचे (Sunny Kaushal) सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडत असले तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र धुमाकूळ घालत आहेत. यामीचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला चाहते पसंती दर्शवत आहेत. यामी गौतम आणि सनी कौशलचा 'चोर निकल के भागा' (Chor Nikal Ke Bhaga) हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 


Chor Nikal Ke Bhaga Review : यामी गौतमचा 'चोर निकल के भागा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Rhea Chakraborty: 'तुम्हाला काय वाटलं मी परत येणार नाही'; गँग लिडर होण्यासाठी रिया चक्रवर्ती सज्ज! ‘रोडीज 19’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Rhea Chakraborty: व्हीजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बराच काळ मनोरंजनक्षेत्रापासून दूर होती. रिया लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रिया एमटीव्ही शो 'रोडीज'  (Roadies Season 19) च्या 19 व्या सीझनमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.



Appi Amchi Collector : उज्वल निकम आणि विश्वास पाटील घेणार अप्पीची मुलाखत

Appi Amchi Collector Marathi Serial Latest Update : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असाच वेगळा विषय असलेली 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) ही मालिका गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेत उज्वल निकम (Ujjwal Nikam) आणि आयएएस (IAS) ऑफिसवर विश्वास पाटील (Vishwas Pati) यांची एन्ट्री होणार आहे. 





Kangana Ranaut : "आज माझ्यामुळे तुझं हिंदी सुधारलं"; कंगना रनौतने पुन्हा करण जोहरवर साधला निशाणा

kangana Ranaut Targeted Karan Johar : बॉलिवूड सिने-निर्माता करण जोहर (Karan Johar) सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं. या व्हिडीओमध्ये तो अनुष्का शर्माचं (Anushka Sharma) करिअर धोक्यात आणण्याबाबत भाष्य करताना दिसत आहे. आता करण जौहरच्या या वक्तव्यावर 'पंगाक्वीन'ने निशाणा साधला आहे. 

Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण

Gautami Patil Ghungroo Teaser Out : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) आता मोठा पडदा गाजवायला सज्ज आहे. तिच्या पहिल्या-वहिल्या 'घुंगरू' (Ghungroo) या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आहे. टीझरने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवली असून ते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 





Mukta Barve : लग्नाआधीच मुक्ता मागतेय डिव्होर्स; नेमकं प्रकरण काय?

Mukta Barve : मुक्ताने बर्वेने 'चारचौघी' या नाटकात विद्या ही भूमिका साकारली आहे. याआधी या नाटकात विद्याची भूमिका वंदना गुप्ते साकारत होत्या. आता या नाटकातील व्हायरल व्हिडीओमध्ये मुक्ता बर्वे म्हणतेय,"आम्ही बायका घटस्फोट या प्रकाराची एवढी भीती बाळगतो. तुमच्या त्या तसल्या प्रेमप्रकरणाची एवढी धास्ती घेऊन बसतो की, त्या दडपणाखाली सगळं सत्त्व झिजून जातं रे...आणि आमच्या सारख्या शिकलेल्यांची अवस्था अजूनच वाईट...शिक्षणामुळे आलेला आधुनिक दृष्टीकोण तरी नवऱ्याबद्दलचा हळवेपणा...खरंतर ना आम्ही ठामपणे निर्णय घ्यायला हवेत. हो.. आणि ऐक मी तो निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत मी घटस्फोट घेणार आहे". 





Priyanka Chopra : प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालती मेरीने यावर्षी तिचा पहिला इस्टर साजरा केला आहे.

Priyanka Chopra Easter Sunday : ग्लोबर स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. लाडकी लेक मालती मेरी चोप्राचे गोड फोटो ती अनेकदा शेअर करत असते. आता तिच्या लेकीने यावर्षी पहिला इस्टर साजरा केला आहे. 





Allu Arjun : अल्लू अर्जुनने 'Pushpa 2'साठी आकारले कोट्यवधी रुपये

Allu Arjun : टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते. आता या सिनेमाचा पुढचा भाग अर्थात 'पुष्पा द रुल' (Pushpa: The Rule) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतली आहे. 





Shah Rukh Khan : शाहरुखने अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची घेतली भेट

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' (Pathaan) या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं किंग खानच्या उपस्थितीत 'आयपीएल 2023'मध्ये (IPL 2023) कोलकाता संघाने (KKR) घरच्या मैदानावर आरसीबीवर (RCB) दणदणीत विजय मिळवला. शाहरुख खानचे विराट कोहलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान किंग खानने कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : 'किसी का भाई किसी का जान' सिनेमातील 'यंतम्मा' गाण्यावर टीका


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) 'किसी का भाई किसी का जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाच्या माध्यमातून दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. दबंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण रिलीजआधीच या सिनेमातील 'यंतम्मा' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दक्षिण भारतीयांनी या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.


Tejaswini Lonari : 'बिग बॉस'फेम तेजस्विनी लोणारी आता सिनेमात झळकणार


Tejaswini Lonari Upcoming Movie : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व गाजवणारी तसेच 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणाऱ्या तेजस्विनीचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. तेजस्विनीच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही. पण या सिनेमात ती मराठमोळे अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Anaspure) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 


Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद यांची माजी स्वीय सहाय्यका विरोधात पोलिसांत तक्रार


Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station Andheri) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांकडून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. तसेच सय्यद यांची दुबई, लंडनमध्ये मालमत्ता आहे, असा आरोप शिंदे यांनी केला होता. सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज शिंदे 2019 पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना 2019 मध्ये कामावरुन काढले होते. आता याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.