Entertainment News Live Updates 1 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर
Ranbir Kapoor Animal First Look : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षीत आगामी सिनेमा 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. याबरोबरच, निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे चित्रपटाचा फर्स्ट लूक 31 डिसेंबरला मध्यरात्री प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती आहे.
Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळेंचा बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिर्याणी' लवकरच येणार भेटीला
Ghar Banduk Biryani : 'घर बंदुक बिर्याणी' (Ghar Banduk Biryani) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'घर बंदुक बिर्याणी' या सिनेमाची निर्मिती नागराज मंजुळे (Nagraj Manjule) करत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जंगल अवताडेने सांभाळली आहे. या सिनेमात नागराज मंजुळे दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यासोबत या सिनेमात अभिनयदेखील केला आहे.
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अडचणीत; फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल
Ankur Wadhave : फेसबुक (Facebook) हॅक होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टी संबंधित अनेक कलाकारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. अशातच आता 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) फेम अंकुर वाढवेचं (Ankur Wadhave) फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे.
अभिनेता अंकुर वाढवेच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच त्याने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अंकुरने सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे,"मित्रांनो माझं फेसबुक काही दिवसांपासून हॅक झालं आहे. त्यावर जे पोस्ट होणाऱ्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी माझ्याशी संपर्क साधत चिंता व्यक्त केली आहे".
Urfi Javed: 'मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे, फक्त तुम्ही सांगा की....'; चित्रा वाघ यांच्यावर भडकली उर्फी जावेद
Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed) निशाणा साधला होता. 'एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' असं ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 'उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली. आता उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रा वाघ यांनी केलेल्या या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
— Uorfi (@uorfi_) January 1, 2023
महेश बाबूचा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? नरेशनं शेअर केली खास पोस्ट
Naresh Babu: अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
New Year ✨
— H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) December 31, 2022
New Beginnings 💖
Need all your blessings 🙏
From us to all of you #HappyNewYear ❤️
- Mee #PavitraNaresh pic.twitter.com/JiEbWY4qTQ
Sana Saeed: 'कुछ कुछ होता है' फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं केलं 'फिल्मी स्टाईल' प्रपोज; व्हिडीओ व्हायरल
Sana Saeed: कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) या हिट चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटातील अंजली आणि राहुल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अंजली ही भूमिका काजोलनं साकारली तर राहुल ही भूमिका शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) साकारली. कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुलच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सना सईदनं (Sana Saeed) साकारली. नुकताच सनानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनाच बॉयफ्रेंड हा तिला फिल्मी स्टाईलनं प्रपोज करत आहे.
View this post on Instagram
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीनं गुडन्यूज देऊन केलं नवं वर्षाचं स्वागत; अप्सरेच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा असं सोनालीला म्हटलं जातं. सोनाली तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता सोनालीनं तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोनालीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. सोनालीनं मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता सोनाली मल्याळम भाषेतील चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची माहिती सोनालीनं सोशल मीडियावर दिली.
View this post on Instagram
Makarand Anaspure : अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मालिकाविश्वात पुनरागमन; प्रेक्षकांसाठी पर्वणी
Makarand Anaspure : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe), असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत.
View this post on Instagram