Entertainment News Live Updates 06 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sara Ali Khan Vikrant Massey Release Date : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 'गॅसलाइट' (Gaslight) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Urfi Javed : आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीने आता 'एसयूवी' (SUV) ही नवीन कार खरेदी केली आहे. उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. कार खरेदी करतानाचा उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ajay Devgn Bholaa Trailer Released : बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत सुपरस्टार अजय देवगणची (Ajay Devgn) गणना होते. अजयचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
Raundal Review : शेतकरी, त्यांच्या व्यथा, भांडवलशाही आणि कारखानदारी विरुद्धचा त्यांचा लढा हा या सिनेमाचा विषय असला तरी त्याची मांडणी खिळवून ठेवणारी आहे. मुळात आम्ही प्रश्न मांडतो आहे हा आव न आणता हा सारा डोलारा उभा केल्यानं मनोरंजन या मूळ हेतूला कुठेही धक्का लागलेला नाही. अर्थात याचं श्रेय दिग्दर्शकालाच द्यायला हवं.
Raundal Review : भाऊसाहेब शिंदेचा 'रौंदळ' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. पत्नी आलियाने (Aaliya Siddhiqui) त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अखेर या आरोपांवर आता नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्वीट करत मौन सोडलं आहे.
MC Stan Concert: प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) हा गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस-16 (Bigg Boss 16) या शोमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला. गेल्या काही महिन्यांपासून एमसी स्टॅनचे चाहते त्याच्या कॉन्सर्टची वाट बघत होते. रविवारी (5 मार्च) मुंबईमध्ये एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टला बिग बॉस-16 ची मंडली म्हणजेच शिव ठाकरे (Shiv Thakare), सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan), निम्रित कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) यांनी हजेरी लावली. यावेळी शिव, निम्रित आणि सुंबुल यांनी एमसी स्टॅनला सपोर्ट केला.
Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या चर्चेत आहे. आपल्या अभिनयासोबत नृत्याने सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आता सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. एक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
जान्हवी कपूर आणि ज्युनियर NTR च्या 'NTR 30'चा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. नव्या पोस्टरने आता सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
Sheezan Khan On Tunisha Sharma Suicide Case : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) तुरुंगातून सुटका झाली आहे. 70 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझान खान म्हणाला,"आज तुनिषा असती तर माझ्यासाठी लढली असती, तिची खूप आठवण येत आहे".
Piyush Mishra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पियुष मिश्रा (Piyush Mishra) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांनी गायलेल्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. पियुष मिश्रा यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सला लोक गर्दी करतात. सध्या पियुष मिश्रा हे त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' (Tumhari Auqaat Kya Hai Piyush Mishra) या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. या पुस्तकानं पियुष यांनी त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये पियुष यांनी एका अत्यंत धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे. पियुष यांनी पुस्तकात लिहिलं की, ते इयत्ता सातवीमध्ये असताना एका महिला नातेवाईकाने त्यांचे लैंगिक शोषण केले.
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना वेगवेगळे किस्से सांगत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांना शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. त्यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी बच्चन अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत आहेत. शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी बिग बींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन (A. R. Ameen) हा देखील संगीत क्षेत्रात काम करतो. नुकतीच ए. आर. अमीनसोबत एक घटना घडली. ए. आर. अमीन हा एका शूटिंग सेटवर गाण्याचे शूटिंग करत होता. त्या शूटिंग सेटमध्ये क्रेनवर एक झुंबर लावले होते. ते झुंबर अचानक कोसळले. अमीननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या संपूर्ण घटनेबद्दल चाहत्यांना माहिती दिली.
Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिताला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मितानं सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दल माहिती दिली होती. 'मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली.' असं सुष्मितानं पोस्टमध्ये लिहिलं होतं. आता सुष्मितानं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सुष्मितानं या पोस्टच्या माध्यमातून तिच्या हेल्थबाबत अपडेट देखील दिली आहे.
Kangana Ranaut Javed Akhtar Defamation Case: प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्यामुळे तिच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण गेली कित्येक दिवस न्यायालयात सुरू आहे. आता नुकतीच जावेद अख्तर यांनी या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती याचिका कोर्टानं मंजूर केली आहे. आता या प्रकरणातील सुनावणी 23 मार्चला होणार आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
शाहरुखचा 'पठाण' ठरला भारतातील नंबर 1 सिनेमा; बॉक्स ऑफिसवर जमवला कोट्यवधींचा गल्ला
Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 39 व्या दिवशीही जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. भारतात 532.08 कोटींची कमाई करत हा सिनेमा 'नंबर 1' ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,028 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं 'तोडी मिल फॅन्टसी'
Circuitt : वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळेचा 'सर्किट' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मधुर भांडारकरांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
Madhur Bhandarkar On Circuitt : "चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
आकाश पेंढारकर दिग्दर्शित 'सर्किट' (Circuitt) या मराठी सिनेमाची निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली आहे. वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या सिनेमात झळकणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर आऊट झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -