एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 05 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 05 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Mithun Ramesh : मल्याळम अभिनेता मिथुन रमेश रुग्णालयात दाखल

Mithun Ramesh Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South) गाजवणारा मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला (Mithun Ramesh) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुनला 'बेल्स पाल्सी' हा दुर्मिळ आजार झाला असून सध्या त्याच्यावर केरळमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'बेल्स पाल्सी' (Bells Palsy) हा अर्धांगवायूचा एक प्रकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या काही भागात पॅरालिसिस होतो. 

सोनाली कुलकर्णी झळकणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या भूमिकेत

Sonalee Kulkarni Mogal Mardini Chatrapati Tararani : 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) मुख्य भूमिकेत असणार आहे. मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे. 

Hrithik Roshan Saba Azad : हृतिक-सबाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

Rakesh Roshan On Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. राकेश रोशन (Rakesh Roshan) म्हणाले की, "हृतिक-सबाच्या लग्नाबद्दल मला काही माहिती नाही, मी ऐकलेलं नाही. सध्या त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लग्न हा भातुकलीचा खेळ नव्हे. लग्न म्हटल्यावर जबाबदारी देखील येते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करुन हृतिक योग्य तो निर्णय घेईल". 

18:08 PM (IST)  •  05 Mar 2023

Pathaan Box Office Collection : शाहरुखचा 'पठाण' ठरला भारतातील नंबर 1 सिनेमा

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 39 व्या दिवशीही जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. भारतात 532.08 कोटींची कमाई करत हा सिनेमा 'नंबर 1' ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,028 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

17:06 PM (IST)  •  05 Mar 2023

Circuitt : 'सर्किट'च्या माध्यमातून मधुर भांडारकरांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!!

Madhur Bhandarkar On Circuitt : "चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन"   अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Madhur Bhandarkar (@imbhandarkar)

14:36 PM (IST)  •  05 Mar 2023

Nach Baliye : 'नच बलिए 10'मध्ये शहनाज गिल होणार सहभागी

Nach Baliye 10 : भारतीय प्रेक्षकांमध्ये रिअॅलिटी शोची चांगलीच क्रेझ आहे. 'नच बलिए' (Nach Baliye) या लोकप्रिय कार्यक्रमाचं दहावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नच बहिए 10' सध्या चर्चेत आहे. यंदाच्या पर्वाची निर्मिती बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार असल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

13:24 PM (IST)  •  05 Mar 2023

MC Stan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक 'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन!

Mc Stan : 'बस्ती का हस्ती' अशी ओळख असलेला एमसी स्टॅन (MC Stan) सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून एमसी स्टॅन घराघरांत पोहोचला आहे. रॅपर एमसी स्टॅन त्याच्या रॅपपेक्षा हटके स्टाइल आणि बोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे जास्त चर्चेत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

12:26 PM (IST)  •  05 Mar 2023

Sheezan Khan : अखेर 70 दिवसांनतर शीझान खानची तुरुंगातून सुटका

Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता.  24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाची आई वनिता शर्माने शिझानवर गुन्हा दाखल केला होता. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget