Bigg Boss 16 Live Updates : सलमानच्या ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर; जाणून घ्या बिग बॉस संबंधित सर्व अपडेट्स एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Oct 2022 12:06 AM
Bigg Boss 16 : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान गाजवणार 'बिग बॉस 16'

Bigg Boss 16 : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान 'बिग बॉस 16' गाजवणार आहे. 

Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्तानंतर श्रीजिता डेने घेतली 'बिग बॉस 16'मध्ये एन्ट्री

Bigg Boss 16 :  'उतरन' फेम टिना दत्तानंतर श्रीजिता डेने 'बिग बॉस 16'मध्ये एन्ट्री घेतली आहे. श्रीजीता डेने सलमानबद्दलच्या भावना बिग बॉसच्या मंचावर व्यक्त केल्या आहेत. टिना दत्ता आणि श्रीजिता डे दोघीही एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत. 

Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्ता 'बिग बॉस 16' गाजवणार

Bigg Boss 16 : 'उतरन' फेम टिना दत्ता 'बिग बॉस 16' गाजवण्यास सज्ज झाली आहे. टीना सलमानसाठी खास बंगाली मिठाई घेऊन आली होती. 

Bigg Boss 16 : राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी; भाईजानला केलं घायाळ

Bigg Boss 16 :  राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाली आहे. तिने आपल्या नृत्याने भाईजानलादेखील घायाळ केलं आहे. 

Bigg Boss 16 : रिक्षावाल्याची मुलगी ते 'मिस इंडिया रनर अप' मान्या सिंह 'बिग बॉस 16'मध्ये

Bigg Boss 16 : मान्या सिंह 'मिस इंडिया 2020'ची रनर अप ठरली होती. उत्तर प्रदेशातील मान्याचे वडील रिक्षा चालवतात. आता मान्या 'बिग बॉस 16' हे पर्व गाजवायला सज्ज झाली आहे. 

Bigg Boss 16 : अठरा वर्षीय सुंबुल 'बिग बॉस 16' गाजवणार; सलमान खानला केलं नि:शब्द

Bigg Boss 16 : सुंबुलने वयाच्या सातव्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुंबुलच्या एन्ट्रीने सलमान खानदेखील नि:शब्द झाला आहे. 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे दबंग खानचा बिग बॉस गाजवायला सज्ज

Bigg Boss 16 : 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेचा शिव ठाकरे आता 'बिग बॉस 16' गाजवायला सज्ज झाला आहे. आपल्या मराठमोळ्या स्वॅगने प्रेक्षकांची मनं जिंकायला शिव ठाकरे सज्ज आहे. 

Bigg Boss 16 : भोजपुरी अभिनेत्री सौंदर्या शर्मा झळकणार 'बिग बॉस 16'मध्ये

Bigg Boss 16 : भोजपुरी अभिनेत्री सौंदर्या शर्मा 'बिग बॉस 16' मध्ये दिसून येणार आहे. भोजपुरी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालायला डॉ. सौंदर्या शर्मा सज्ज झाली आहे. 

Bigg Boss 16 : 'इमली' फेम सुंबुल तौकीर खान 'बिग बॉस 16' गाजवणार

Bigg Boss 16 : 'इमली' फेम सुंबुल तौकीर खान 'बिग बॉस 16' चं पर्व गाजवताना दिसणार आहे. सुंबुल तौकीर खानचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या मंचावर सुंबुल सलमानची नक्कल करताना दिसून आली आहे. 

Bigg Boss 16 : शालिन भनोटने हटके स्टाईल घेतली भाईजानच्या बिग बॉसमध्ये एन्ट्री

Bigg Boss 16 : शालिन भनोटने हटके स्टाईलमध्ये भाईजानच्या बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली आहे. 'बिग बॉस 16' हे पर्व जिंकण्याचं ध्येय ठरवून शालिनने एन्ट्री घेतली आहे. 

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील अभिनेता गौतम विगची 'बिग बॉस 16'मध्ये धमाकेदार एन्ट्री

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील अभिनेता गौतम विगची 'बिग बॉस 16'मध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. 





Bigg Boss 16 : राजकारणात नशीब आजमावल्यानंतर अचर्ना गौतम आता दिसणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये

Bigg Boss 16 : राजकारणात नशीब आजमावल्यानंतर अचर्ना गौतम आता 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होणार आहे. 

Bigg Boss 16 : पुण्याचा रॅपर 'एम सी स्टॅंन' आता झळकणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये

Bigg Boss 16 : मुळचा पुण्याचा असलेला रॅपर 'एम सी स्टॅंन' (MC Stan) म्हणजेच अल्ताफ शेख आता भाईजानच्या 'बिग बॉस'मध्ये झळकणार आहे. 

Bigg Boss 16 : 'नाच पंचाबन' वर थिरकत अंकित-प्रियंकाने घेतली धमाकेदार एन्ट्री

Bigg Boss 16 : अंकित गुप्ता आणि प्रियंका चाहर चौधरी 'बिग बॉस 16'मध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करतील. 

Bigg Boss 16 : सलमानचा लाडका गायक अब्दू राजिक 'बिग बॉस 16'चा दुसरा स्पर्धक

Bigg Boss 16 : सलमानचा लाडका गायक अब्दू राजिक (Abdu Rozik) 'बिग बॉस 16' या बहुप्रतिष्ठित कार्यक्रमाचा दुरसा स्पर्धक ठरला आहे. त्याला खायला खूप आवडतं. त्यामुळे आता अब्दू बिग बॉसच्या घरात कसा राहणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


 





Bigg Boss 16 : छोटी सरदारनी फेम निमरित कौर अलुवालिया 'बिग बॉस 16'ची पहिली स्पर्धक

Nimrit Kaur Ahluwalia : निमरित कौर अलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) 'बिग बॉस 16' या बहुचर्चित कार्यक्रमाची पहिली स्पर्धक ठरली आहे. छोटी सरदारनी म्हणून निमरितची ओळख आहे. 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या ग्रॅंड प्रीमियरला सुरुवात; भाईजानचा धुमाकूळ

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या ग्रॅंड प्रीमियरला सुरुवात झाली असून सलमान खानची एन्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

Bigg Boss 16 : भाईजानच्या 'बिग बॉस 16'चा थोड्याच वेळात होणार ग्रॅंड प्रीमियर

Bigg Boss 16 : भाईजानच्या 'बिग बॉस 16'चा थोड्याच वेळात ग्रॅंड प्रीमियर होणार आहे. 

Bigg Boss 16 : अब्दू सोजिकने व्यक्त केली कॅप्टन होण्याची इच्छा

Bigg Boss 16 : गायक अब्दू रोजिक 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होणार असून आता त्याने कॅप्टन होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 





Big Boss 16 : MC स्टॅन 'बिग बॉस 16' मध्ये धम्माल करणार 

Big Boss 16 : प्रसिद्ध रॅपर अल्ताफ शेख ऊर्फ ​​MC स्टॅन 'बिग बॉस 16' मध्ये धम्माल करण्यासाठी सज्ज झाला आहे. लेटेस्ट प्रोमो व्हिडीओमध्ये तो होस्ट सलमान खानला त्याच्या खास स्टाईलने प्रभावित करताना दिसला.


 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होणार 'हे' स्पर्धक

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'मध्ये साजिद खान, टीना दत्त, अब्दु रोजिक, शालिन भनोट, मान्या सिंह, गौतम विग, निम्रत कौर अहलूवालिया, सौंदर्य शर्मा, प्रियंका चाहर चौधरी, इमली फेम सुंबुल तौकीर खान, गौरी नागोरी, श्रीजिता डे आणि शिव ठाकरे हे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. 

Bigg Boss 16 : कधी आणि कुठे पाहता येणार ‘बिग बॉस 16’?

‘बिग बॉस 16’ आजपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. कलर्स वाहिनीवर आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी सलमान खानसोबत या शोचा प्रीमियर पार पडणार आहे. कलर्स टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रेक्षक ‘बिग बॉस 16’ पाहू शकतात. तर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता हा शो टीव्हीवर प्रसारित होईल. याशिवाय हा शो OTT प्लॅटफॉर्म Voot अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे. यासाठी प्रेक्षकांना Voot अॅपचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे कुठेही आणि कोणत्याही वेळी हा शो पाहता येणार आहे.

Bigg Boss 16 : उतरणच्या तपस्येनंतर आता इच्छादेखील होणार 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी

Bigg Boss 16 : सलमान खानच्या बहुप्रतिष्ठित 'बिग बॉस 16'कडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अवघ्या काही तासांत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमात उतरण फेम टीना दत्तादेखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?

Salman Khan : सलमान खानने बिग बॉसच्या 15व्या सिझनसाठी 350 कोटी रुपये फी आकारली होती. तर, आता त्याने नव्या सिझनसाठी तिप्पट फी मागितली आहे. म्हणजेच 'बिग बॉस 16'साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये आकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.  मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सलमान खानला बिग बॉससाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला , 'एवढे पैसे मला कधीच मिळणार नाहीत. मला जर एवढे पैसे मिळाले, तर मी आयुष्यभर काम करणार नाही. 

Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी;

Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. येत्या 1 ऑक्टोबरला भाईजानचा 'बिग बॉस' सुरू होणार आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. युट्यूबर अब्दु राजिक (Abdu Razik) या पर्वात सहभागी होणार आहे. 

Shiv Thakare : 'बिग बॉस मराठी'चा विजेता शिव ठाकरे आता गाजवणार भाईजानचा 'बिग बॉस'

'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. भाईजानचा बिग बॉस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. युट्यूबर अब्दु राजिकनंतर (Abdu Razik) आता आणखी एक नाव समोर आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अर्थात मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) 'बिग बॉस 16' या प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 

Bigg Boss Love stories : बिग बॉस मिलाई जोडी

Bigg Boss : ‘बिग बॉस सीझन 15’ मधील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा. ‘बिग बॉस 13’ दरम्यान असीम रियाझ आणि हिमांशी खुरानाही एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘बिग बॉस 14’मध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल देखील एकमेकांच्या खूप जवळ आले होते. ‘बिग बॉस सीझन 14’मधील आणखी एक चर्चित कपल म्हणजे पवित्रा पुनिया आणि एजाज खान. 

Bigg Boss 16 : कधी आणि कुठे पाहता येणार ‘बिग बॉस 16’?

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ आजपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. कलर्स वाहिनीवर आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी सलमान खानसोबत या शोचा प्रीमियर पार पडणार आहे. यानंतर हा शो पुढील 3 महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. शोचा प्रत्येक सीझन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तेव्हा हा नवा सीझन कोणता नवा धमाका घेऊन येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘बिग बॉस’च्या मागील सीझनप्रमाणे, शोच्या या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत.

Bigg Boss 16 Live Streaming : सलमानच्या ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान वेळ काढत सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करत आहे. सलमान पुन्हा एकदा 'बिग बॉस 16'चे (Bigg Boss 16) सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आज (1 ऑक्टोबर) या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी





‘थलायवा’ रजनीकांतसोबत काम करण्याची ऑफर, भामट्याने तरुणीला लावला लाखोंचा चुना!

सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत चित्रपटात काम मिळवून देतो सांगून एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीला गंडवले आहे. या व्यक्तीने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तरुणीकडून तब्बल 10 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी पियुष जैन आणि मंथन रुपारेल यांच्याविरुद्ध भादंवि कलम 419, 420, 465, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. यावेळी राहुलने देखील त्याला मराठी भाषेत काही ओळी शिकवल्या. यावेळी किलीने राहुल वैद्यची मदत घेत ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे. किलीच्या या व्हिडीओला सोशल मिडीयावर प्रचंड पसंती मिळत आहे.


 





जान्हवी कपूरने जागवल्या ‘धडक’च्या आठवणी, पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पोहोचलीये ‘त्याच’ ठिकाणी!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.


 





अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट!

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. 'शिवप्रताप गरुड झेप' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांची भेट घेत, त्यांना या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रण देखील दिले.


 





Johnny Depp-Amber Heard: जॉनी डेप-एम्बर हर्ड प्रकरण आता जगभरात पाहता येणार

‘हॉट टेक: द डेप/हर्ड ट्रायल’मध्ये जॉनी डेपच्या भूमिकेत अभिनेता मार्क हापका आणि अभिनेत्री एम्बर हर्डच्या भूमिकेत मेगन डेव्हिस झळकणार आहेत. दरम्यान, अभिनेत्री मेलिसा मार्टी, मार्क हापका आणि मेगन डेव्हिस यांच्यासोबत डेपची वकील कॅमिली वास्क्वेझ म्हणून झळकणार आहे. अभिनेत्री मेरी कॅरीग एम्बर हर्डची वकील एलेन ब्रीडहॉफ्टच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.


 


नागराज मंजुळेंचा ‘नाळ 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा!

दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘नाळ’ (Naal) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या चित्रपटातील चिमुकल्या ‘चैत्या’ने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांच्या ‘नाळ 2’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागराज मंजुळे यांनी ही माहिती दिली आहे.


 





नॅशनल क्रश रश्मिका मंदनाचा ‘देसी स्वॅग’, नव्या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय अभिनेत्री!

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना केवळ दक्षिण भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय आहे. तिचा प्रत्येक लूक, प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते. रश्मिकाने नुकतेच क्रॉप टॉप आणि केप जॅकेटसह प्लाझो पॅंटमधील फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांची मने जिंकत आहेत.


 





S. D. Burman Birth Anniversary : राजघराण्याची गादी सोडून संगीताचं क्षेत्र निवडणारे एस. डी. बर्मन!

एसडी बर्मन यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1906 रोजी त्रिपुरामध्ये झाला. त्यांचे वडील त्रिपुराचे राजे इशानचंद्र देव बर्मन यांचे दुसरे पुत्र होते. त्यांना नऊ भावंडे होती. त्यावेळच्या कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एस. डी. बर्मन यांनी संगीताच्या दुनियेत प्रवेश केला. मात्र, संगीताची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. एक राजा असण्यासोबतच बर्मन दा यांचे वडील सुप्रसिद्ध सितार वादक आणि धृपद गायक देखील होते. संगीतातील बारकावे एसडी बर्मन यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घेतले होते.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'बिग बॉस मराठी'चा विजेता शिव ठाकरे आता गाजवणार भाईजानचा 'बिग बॉस'


'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. भाईजानचा बिग बॉस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. युट्यूबर अब्दु राजिकनंतर आता आणखी एक नाव समोर आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अर्थात मराठमोळा शिव ठाकरे 'बिग बॉस 16' या प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.


बिग बींच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 1969 पासून 2022 पर्यंत बिग बींनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा 80 वा वाढदिवस नक्कीच खास असणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.


राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमागृहात होणार प्रदर्शित


'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा नुकताच पार पडला असून यात 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी सिनेमाने बाजी मारली आहे. 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.


आशा पारेख 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित


'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला.


रिचाच्या हातावर रंगली अलीच्या नावाची मेहंदी


बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नासोहळ्याला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रिचा आणि अलीचे प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.