Entertainment News Live Updates संजय दत्तचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 16 Aug 2023 03:36 PM
Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' मालिका रोमांचक वळणावर; पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य!

Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' (Pinkicha Vijay Aso) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीट आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. पिंकीला नवा चेहरा आणि नवं आयुष्य मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेचे आगामी भाग पाहण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.

Aishwarya Narkar: 'खरं नाव का नाही लावत?' ते 'तुमच्या कपाळावर काय झालंय?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या नारकरनं दिली उत्तरं

Aishwarya Narkar:  अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो आणि वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. ऐश्वर्यानं नुकतेच Ask Me A Question हे सेशन इन्स्टाग्रामवर केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची ऐश्वर्यानं उत्तरं दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sanjay Dutt Accident : संजय दत्तचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात; डोक्याला पडले टाके

Sanjay Dutt Accident : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अॅक्टिव्ह आहेत. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संजय दत्त सध्या 'डबल इस्मार्ट' (Double Ismart) या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा मोठा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्यालाही टाके पडले आहेत. 


Sanjay Dutt Accident : संजय दत्तचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात; डोक्याला पडले टाके

Taali Twitter Review: कशी आहे सुष्मिता सेनची 'ताली' वेब सीरिज? नेटकरी म्हणतात...

Taali Twitter Review: अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen)   'ताली'  (Taali)  ही वेब सीरिज काल (15 ऑगस्ट) जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.'ताली'ही वेब सीरिज पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या वेब सीरिजचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे.



Vivek Agnihotri : "मला प्रोपगंडा सिनेमे बनवायला आवडतं त्यामुळे पुण्य मिळतं"; अखेर विवेक अग्निहोत्रींनी केलं जाहीर

Vivek Agnihotri : बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या सिनेमांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा ते चर्चेत असतात. आता त्यांचं एक ट्वीट व्हायरल होत आहे. "मला प्रोपगंडा करायला आवडतं त्यामुळे पुण्य मिळतं"; असं विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत अखेर जाहीर केलं आहे.




Vivek Agnihotri : "मला प्रोपगंडा सिनेमे बनवायला आवडतं त्यामुळे पुण्य मिळतं"; अखेर विवेक अग्निहोत्रींनी केलं जाहीर

Happy Birthday Mahesh Manjrekar : अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अन् बरचं काही...मराठी मनोरंजनसृष्टीत दहशत असणाऱ्या महेश मांजरेकरांना पहिला ब्रेक कसा मिळाला? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे नाव घेतलं तरी मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींची दातखिळी बसते. मनोरंजन विश्वात 'महेश मांजरेकर' या नावाचा दरारा आहे. अभिनेते (Actor), दिग्दर्शक (Director), निर्माते (Producer) अशा वेगवेगळ्या भूमिका लिलया पार पाडणाऱ्या महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar Birthday) आज वाढदिवस आहे. 


Happy Birthday Mahesh Manjrekar : अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अन् बरचं काही...मराठी मनोरंजनसृष्टीत दहशत असणाऱ्या महेश मांजरेकरांना पहिला ब्रेक कसा मिळाला? जाणून घ्या...

Pooja Sawant: कसा जोडीदार पाहिजे? पूजा सावंत म्हणते, 'मला असा पार्टनर पाहिजे जो...'

Pooja Sawant:  अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. पूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. पूजानं नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पूजानं 'कसा जोडीदार पाहिजे?' या प्रश्नाचं उत्तर दिलं. पूजानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना सुबोध भावे देणार उत्तरं; ‘खुपते तिथे गुप्ते'चा प्रोमो व्हायरल

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये कलाकार, राजकीय नेते हजेरी लावतात. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)   यांनी हजेरी लावली होती.  आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना दिसणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत हा सुबोधला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.



Gauri Sawant ON Taali : "आपलीच 'टाळी' जेव्हा जोरात वाजते.."; 'ताली' पाहिल्यानंतर गौरी सावंतची पहिली प्रतिक्रिया

Gauri Sawant On Sushmita Sen Taali Web Series : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनित 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी लिहिलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केलं आहे. गौरी सावंत (Gauri Sawant) यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. आता ही सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 





Abhishek Malik : अभिनेता अभिषेक मलिकला मारहाण; तीन लोकांवर गुन्हा दाखल

Abhishek Malik : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिषेक मलिक (Abhishek Malik) सध्या चर्चेत आहे. अभिषेक आणि त्याच्या मित्रावर शुक्रवारी जोगेश्वरीमध्ये तीन अज्ञान व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक दुपारी विमानतळावरुन मालाडच्या दिशेने आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. 


Abhishek Malik : अभिनेता अभिषेक मलिकला मारहाण; तीन लोकांवर गुन्हा दाखल

Gadar 3 : 'गदर 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; दिग्दर्शक म्हणाले,"सब्र का फल मीठा होता हैं"

Gadar 3 : अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel), सिमरत कौर आणि मनीष वाधवा मुख्य भूमिकेत आहेत. 'गदर:एक प्रेम कथा' आणि 'गदर 2'च्या यशानंतर निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी 'गदर 3'च्या (Gadar 3) तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच 'गदर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Gadar 3 : 'गदर 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; दिग्दर्शक म्हणाले,"सब्र का फल मीठा होता हैं"

Box Office Collection : 15 ऑगस्टला सिनेमागृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी; थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्यांच्या जल्लोषात पाहिले गेले 'जेलर', 'गदर 2' आणि 'OMG 2'

Jailer Gadar 2 OMG 2 Movies Box Office Collection : 15 ऑगस्ट 2023 (Independence Day 2023) हा दिवस मनोरंजनसृष्टीसाठी खूपच चांगला होता. या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer), सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे प्रदर्शित झाले. या तिन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासोबत बॉक्स ऑफिसलाही सुगीचे दिवस दाखवले आहेत. 




Box Office Collection : 15 ऑगस्टला सिनेमागृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी; थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्यांच्या जल्लोषात पाहिले गेले 'जेलर', 'गदर 2' आणि 'OMG 2'

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Heart of Stone Review : आलिया भट्टचा पहिला हॉलिवूड सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन'कसा आहे? वाचा रिव्ह्यू...


Heart Of Stone Movie Review : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) हा हॉलिवूडपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा अभिनेत्रीचा पहिलाच हॉलिवूडपट असल्याने या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण पहिलाच हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.


The Great Indian Family Release Date: द ग्रेट इंडियन फॅमिली 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; विकी कौशल आणि मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत


The Great Indian Family Release Date: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'द ग्रेट इंडियन फॅमिली' (The Great Indian Family) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशलोबतच मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाच्या टीमनं नुकताच एक  मजेदार व्हिडिओ शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नुकताच विकी कौशलनं या चित्रपटाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या अतरंगी फॅमिलीबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिल, "एक से बढ़कर एक, इस परिवार के रंग है अनेक। इसीलिये तो हम हैं - द ग्रेट इंडियन फ़ैमिली. 22 सितंबर को मिलते हैं!"


Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार


Sharad Ponkshe On Me Nathuram Godse Boltoy Drama : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं. एकीकडे हे नाटक गाजत असताना दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.