Sanjay Dutt Accident : संजय दत्तचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात; डोक्याला पडले टाके
Sanjay Dutt : संजय दत्तचा 'डबल आईस्मार्ट' (Double Ismart) शूटिंगदरम्यान मोठा अपघात झाला आहे.
![Sanjay Dutt Accident : संजय दत्तचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात; डोक्याला पडले टाके Sanjay Dutt Accident Accident on Double iSmart movie Set Sanjay Dutt Gets Injured bollywood actor entertainment Sanjay Dutt Accident : संजय दत्तचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात; डोक्याला पडले टाके](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/16/7893609175cbfc30342f0b583076c0bb1692178796440254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Dutt Accident : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अॅक्टिव्ह आहेत. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संजय दत्त सध्या 'डबल इस्मार्ट' (Double Ismart) या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा मोठा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्यालाही टाके पडले आहेत.
'डबल इस्मार्ट' या सिनेमात संजय दत्त तेलुगू अभिनेते राम पोथिनेनीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. बँकॉकमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. तलवारबाजीचा सीन शूट करताना संजय दत्त यांचा अपघात झाला आहे. अभिनेत्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. पण अभिनेत्याने उपचार घेतल्यानंतर शूटिंगदेखील पूर्ण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आता संजय दत्त पुर्णपणे बरा आहे.
संजय दत्त पहिल्यांदाच तेलुगू सिनेमात झळकणार
'डबल इस्मार्ट' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पुरी जगन्नाधने सांभाळली आहे. पुरी जगन्नाधने दिग्दर्शित केलेला 'लाइगर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला होता. या सिनेमात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. संजय दत्तचा हा पहिलाच तेलुगू सिनेमा आहे. 'केजीएफ चॅप्टर 2' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने कन्नड सिनेमात काम केलं होतं. संजयने काही दिवसांपूर्वी 'डबल इस्मार्ट' या सिनेमातील आपला पहिला लूक आऊट केला होता.
'लियो'च्या माध्यमातून तामिळमध्ये करणार पदार्पण
संजय दत्त 'लियो' या सिनेमामुळेही चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तो तामिळमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तो तामिळ सुपरस्टार थलापती विजय आणि तृषासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. लोकेश कनगराजने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधीदेखील 'द देविल' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तचा अपघात झाला होता.
संजय दत्तच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Sanjay Dutt Upcoming Project)
रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या सिनेमात संजय दत्त शेवटचे झळकले होते. 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून संजय दत्त लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्यांची झलक पाहायला मिळणार आहे. तसेच 'द गुड महाराजा','बाप' आणि 'लियो' हे संजय दत्तचे आगामी सिनेमे आहेत. तसेच 'शेरां दी कौम पंजाबी' या त्यांच्या पंजाबी सिनेमाचीही घोषणा झाली आहे. या सिनेमात ते गिप्पी ग्रेवालसोबत झळकणार आहेत.
संबंधित बातम्या
Sanjay Dutt : 'Leo' सिनेमातील संजय दत्तचा फर्स्ट लूक आऊट! संजू बाबाच्या बॉसी अंदाजाने वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)