Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Aug 2023 04:28 PM
Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'ने रचला इतिहास; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या...

Sunny Deol Ammesha Patel Gadar 2 Success Reasons : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) अभिनित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित या सिनेमाने इतिहास रचला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर (Independence Day)  प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मोठ्या वीकेंडचा चांगलाच फायला झाला आहे. 'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सनी देओलचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यामुळेच त्याचा 'गदर 2' हा सिनेमा एवढा का चालतोय?  असा प्रश्न उपस्थित होतो. तर 'गदर 2' हा सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय जाणून घ्या...


Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'ने रचला इतिहास; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या...

Akshay Kumar : अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती

Akshay Kumar Charge Fees OMG 2 : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे सनी देओल आणि अमिषा पटेलचा (Ameesha Patel) 'गदर 2' (Gadar 2) आणि रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. तरीही अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. दरम्यान खिलाडी कुमारने 'ओएमजी 2' या सिनेमासाठी मानधन घेतलं नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. 


Akshay Kumar : अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती

Ghoomer Review : अभिषेक बच्चनचा अभिनय पुन्हा एकदा जिंकणार मन, जाणून घ्या कसा आहे आर. बाल्की यांचा 'घूमर' सिनेमा...

Ghoomer Review : 'घूमर' (Ghoomer) या सिनेमात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळतोय.'पा', 'चुप', 'पॅडमॅन', 'चीनी कम' असे अनेक दमदार चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की (R. Balki) पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी 'घूमर' हा नवा चित्रपट घेऊन आले आहेत.


Ghoomer Review : अभिषेक बच्चनचा अभिनय पुन्हा एकदा जिंकणार मन, जाणून घ्या कसा आहे आर. बाल्की यांचा 'घूमर' सिनेमा...

Taali: सासूबाई आणि पत्नीकडून सुव्रतचं कौतुक; 'ताली' वेब सीरिज पाहिल्यानंतर सखी आणि शुभांगी गोखलेंनी शेअर केली पोस्ट

Taali:   'ताली'  (Taali)  ही वेब सीरिज 15 ऑगस्टला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.  या सीरिजचं अनेकजण कौतुक करत आहेत.  प्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशीनं (Suvrat Joshi) ताली या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. सुव्रतची पत्नी सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि त्याच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री  शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ताली वेब सीरिजमधील सुव्रतच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.



Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा; केदार शिंदे म्हणाले,"सिनेमाचं यश मराठी सिनेसृष्टीसाठी सुखावणारं आहे"

Kedar Shinde On Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आज या सिनेमाला सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांनंतरही या चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ कायम आहे. मोठा वीकेंडचा फायदा या सिनेमालाही झाला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

Srimad Ramayan: ‘श्रीमद् रामायण’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; प्रोमो पाहिलात?

Srimad Ramayan: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात.  रामायणावर आधारित अनेक शो टीव्हीवर प्रसारित झाले आहेत. आता ‘श्रीमद् रामायण’ (Srimad Ramayan) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 



Taali Review : शिवीपासून टाळीपर्यंतची कहाणी म्हणजे 'Taali'

Sushmita Sen Taali Web Series Review : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनित 'ताली'चा (Taali) ट्रेलर आऊट झाल्यापासून या सीरिजबद्दलची उत्सुकता वाढली होती. गौरी सावंत यांच्या आई होण्याच्या प्रवासाची गोष्ट म्हणजे 'ताली' ही सीरिज (Taali Web Series) आहे. तृतीयपंथी असणाऱ्या गौरी सावंत (Gauri Sawant) यांचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या अडचणींवर त्यांनी केलेली मात अशा अनेक गोष्टी या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहे. गणेश ते गौरीपर्यंतचा प्रवास पाहताना खरचं अंगावर शहारे येतात.


Taali Review : शिवीपासून टाळीपर्यंतची कहाणी म्हणजे 'Taali'

Ghoomer Movie Review : अभिषेक बच्चनचा 'घूमर' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Ghoomer Movie Review : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांची मुख्य भूमिका असलेला 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिषेकचा सिनेमा अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाल्याने या सिनेमाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. तर प्रेक्षकांवर छाप पाडण्यात अभिषेक यशस्वी झाला आहे. आयुष्यातले दरवाजे उघडत नसतील तर ते तोडणं गरजेचं आहे, असे संवाद अभिषेक म्हणतो आणि प्रेक्षक विचार करायला भाग पाडतात.


Ghoomer Movie Review : अभिषेक बच्चनचा 'घूमर' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Rohit Roy: हृतिकने 'या' कारणामुळे थांबवले होते काबिल चित्रपटाचे शूटिंग; रोहित रॉय सांगितला किस्सा

Rohit Roy: अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) काबिल (Kaabil) हा चित्रपट  2017 मध्ये रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक केलं.अभिनेता रोहित रॉयनं देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारली होती. नुकताच रोहित रॉयनं एका मुलाखतीमध्ये काबिल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगितला होता. त्यानं सांगितलं की,  हृतिक रोशननं काबिल चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. 



Box Office Collection : मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रजनीकांत, सनी देओल भारावले; 'Gadar 2' अन् 'Jailer'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

Sunny Deol Gadar 2 Rajinikanth Jailer Akshay Kumar OMG Box Office Collection : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत (Rajinikanth), बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेलचा (Ameesha Patel) 'गदर 2' (Gadar 2) तसेच बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे तीन सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहेत. 


Box Office Collection : मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रजनीकांत, सनी देओल भारावले; 'Gadar 2' अन् 'Jailer'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन अनवाणी भर पावसात सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

Amitabh Bachchan Visited Siddhivinayak Temple : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात (Siddhivinayak Temple) गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन अनवाणी भर पावसात सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Britney Spears and Sam Asghari : पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सचा तिसऱ्यांदा संसार मोडला!


मुंबई : अमेरिकन पॉप गायिका (Pop Singer) ब्रिटनी स्पीअर्स (Britney Spears) नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे. ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरी (Sam Asghari) पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ब्रिटनी स्पीअर्स आणि सॅम असगरी यांनी घटस्फोट घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, या संदर्भात दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटस्फोटानंतर सॅम असगरीने ब्रिटनी स्पीअर्सला धमकी दिल्याचीही चर्चा आहे. 


Sai Lokur: कुणीतरी येणार येणार गं! सई लोकूर होणार आई, पतीसोबतचे फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज


Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरच्या (Sai Lokur) घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. सईनं सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे (Tirthadeep Roy) खास फोटो शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. सईनं फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला आणि तीर्थदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. सईनं तीर्थदीपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये सईच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसत आहे.या फोटोला सईनं कॅप्शन दिलं, 'प्रेम आणि कृपेने आमचे कुटुंब वाढत आहे. आम्‍हाला तुम्‍हाला कळवण्‍यास अत्‍यंत आनंद होत आहे, आमच्या  आयुष्यात लवकरच खूप आनंद येणार आहे.'


Baipan Bhaari Deva: 'सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात...'; केदार शिंदे यांची खास पोस्ट


Baipan Bhaari Deva: केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात सहा महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटानं स्वातंत्र्य दिनाला देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. याबाबत केदार शिंदे यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.