Suraj Chavan: बिगबॉस विजेत्या सुरजच्या राजा-राणी चित्रपटाचा गुलीगत ट्रेलर आला समोर, छोटा पडदा गाजवून आता मोठ्या पडद्यावर एन्ट्री
सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या राजा राणी चित्रपटात दाखवली जाणाऱ्या प्रेमकथेत नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सुरजची भूमिका महत्वाची आहे.
suraj Chavan:बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सुरज चव्हाणची सध्या एकच चर्चा आहे. सर्व स्तरावरून सुरजच्या झापुक झुपूक स्टाईलला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून आता छोटा पडदा गाजवल्यानंतर मोठा पडदा गाजवण्यासाठी सुरज सज्ज झालाय. सुरज चव्हाणची महत्वाची भूमिका असणाऱ्या आगामी राजा राणी सिनेमाचा ट्रेलर लाँच झालाय. विशेष म्हणजे हा ट्रेलर सुरजच्या रामती तालुक्यात मोडवे गावात पार पडला. यावेळी बिगबॉस फेम वैभव चव्हाणही उपस्थित होता. सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या राजा राणी चित्रपटात दाखवली जाणाऱ्या प्रेमकथेत नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सुरजची भूमिका महत्वाची आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरजचा अनोखा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय का? हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
सुरजच्या आगामी राजा राणी चित्रपटाची चर्चा
चित्रपटाच्या २ मिनिटे ४३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये जिवापाड प्रेम करणारे दोन जिवलग कायम एकत्र पाहायला मिळाले. मात्र त्या दोघांमध्ये असं काय होतं ज्याने त्यांच्या नात्यात दुरावा येतो?. बरं हा दुरावा संपलेला पाहायला मिळणार की एकमेकांचा जीव घेणार हे सारं पाहणं रंजक ठरणार असल्याचे दिसत आहे. सूरजच्या या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
18 ऑक्टोबरला होणार राजा राणी रिलिज
सुरजचा गुलिगत पॅटर्न आता चित्रपटातही दिसणार आहे. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण हा नायकाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. 'राजा राणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
काय आहे स्टारकास्ट?
चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. बऱ्याच दिवसांपासून 'राजा राणी' या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत प्रवेश करत उत्तम यश मिळवले. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज येत्या १८ ऑक्टोबर पासून मोठा पडदा गाजवायलाही सज्ज होणार आहे.
हेही वाचा: