The Kashmir Files in IFFI : 'काश्मीर फाइल्स'ला प्रपोगंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांची ट्विट करत नाराजी, सिनेकलाकारांकडून तीव्र प्रतिक्रिया
The Kashmir Files in IFFI : इफ्फी सोहळ्याच्या समारोप समारंभात स्पर्धेचे ज्युरी नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय
The Kashmir Files in IFFI : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (iffi) सोमवारी सांगता झाली. ज्युरीने 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं, त्यानंतर या समारंभात एकच गोंधळ उडाला. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी सांगितले की, महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी या चित्रपटाला 'प्रपोगंडा आणि वल्गर' म्हटलंय. नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटले...
अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' हा प्रपोगंडा आणि वल्गर असल्याच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, 'खोट्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते.' अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' मधील त्यांचा फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे. खेर यांच्या या ट्विटला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो..
— Anupam Kher (@AnupamPKher) November 28, 2022
सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है.. pic.twitter.com/OfOiFgkKtD
या वक्तव्यामुळे दर्शन कुमार दु:खी
चित्रपटातील अभिनेता दर्शन कुमारने एका खासगी वृत्तपत्रासोबत केलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'प्रत्येक जण जे पाहतात आणि ऐकतात, त्यावर त्यांचे स्व:ताचे एक मत असते, परंतु द काश्मीर फाइल्स हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या समुदायावर आधारित आहे. हे सत्य नाकारता येणार नाही. कुमार म्हणाला, 'हा चित्रपट सत्यावर आधारित आहे.'
चित्रपटाच्या समर्थनार्थ अशोक पंडित
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ज्युरींच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा विधानाला आपला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. ते लिहितात, 'नदाव लॅपिड यांनी 'काश्मीर फाइल्स' चित्रपटासाठी वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप आहे. 3 लाख काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड दाखवणे, प्रपोगंडा म्हणता येणार नाही. एक चित्रपट निर्माता आणि काश्मिरी पंडित या नात्याने मी दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांप्रती या लज्जास्पद कृत्याचा निषेध करतो.
A sensitive issue of justice for Kashmiri Pandits was sacrificed at the altar of propaganda. This is a must listen segment at the #IFFIGoa2022 : pic.twitter.com/zd1WgKoUNa
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) November 28, 2022
काय म्हणाले नदाव लॅपिड?
चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक गोव्यात पोहोचले होते. दरम्यान, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इफ्फीच्या ज्युरीचे अध्यक्ष इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड म्हणाले की, 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने आम्हा सर्वांना व्यथित केले आणि आम्हाला प्रचंड धक्का बसला. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक आणि स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अतिशय अयोग्य वाटला. माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय. कारण इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अशा प्रकारच्या कठोर टीका या व्हायलाच हव्यात..!' असंही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या