Bigg Boss 18 : बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी अन् सलमान खानचा मोठा निर्णय, आता होणार तांडव
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे.
Bigg Boss 18: बिग बॉस हा वादग्रस्त शो आता सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. बिग बॉस शो होस्ट करणारा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला मिळालेल्या बिश्नाई गँगच्या धमक्यांमुळे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ केल्याचं साऱ्यांनाच माहित आहे. सिद्दकी आणि सलमानचे भावबंध खोल असल्यानं त्यानं बिगबॉसचे शुटिंगदेखील थांबवले होते. त्यानंतर बिश्नाई गँगचा या हत्येशी संबंध जोडण्यात आला आणि सारेच प्रकरण सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न बनला. आता सुरक्षेच्या कारणासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान शनिवार आणि रविवारच्या भागांसाठी बिगबॉसचे शूट करणार नसल्याची चर्चा सुरु होती. याबाबत आता एक मोठी अपडेट आहे. सलमान खान विकेंड का शो करणार असल्याचं समजतंय.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba siddique) यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, सलमान खान व बाबा सिद्दिकी यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते.
सुरक्षेच्या कारणास्तव बिगबॉसच्या वेकेंडवार चुकणार?
गेल्या आठवड्यात सलमान खानचा मित्र बाबा सिद्दकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. यामुळे सलमानला मोठाच धक्का बसला आहे. पण सलमानला लॉरेन्स बिश्नाईकडून धमक्याही येत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परिणामी सलमानला वैयक्तिक अंगरक्षकासह y प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. बिग बॉस १८ च्या सेटवर सलमान पूर्ण सुरक्षेसह सलमान पोहोचला तेंव्हा त्याच्या सुरक्षारक्षकांनी पूर्ण सेटची कसून तपासणी केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सलमान खान सुरक्षेच्या कारणास्तव विकेंड का वार शूट करणे टाळणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आज विकेंडचा वार चुकवणार नसल्याचंही सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने बिगबॉसच्या शूटपासून ब्रेक घेतलेला नाही. बिश्नाई गँगच्या चालू असलेल्या धमक्यांमध्येही त्यानं होस्टिंग सुरु ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. बिगबॉस तक च्या वृत्तानुसार येत्या आठवड्यात होणाऱ्या वेकेंड का वार मध्ये सलमान खान चाहत पांडेच्या बाजूने उभा राहणार असून बाकी स्पर्धक पूर्ण आठवड्यासाठी टार्गेट होणार आहेत. यावरून सलमाननं विकेंड का वारचं शूट बंद केलं नसल्याचंही स्पष्ट होत आहे.
शुटिंग थांबवल्याची केवळ अफवा
अलीकडेच अशी बातमी आली होती की सुरक्षेच्या कारणास्तव अभिनेता बिग बॉस 18 चे शूटिंग सोडू शकतो. मात्र या सर्व केवळ अफवा होत्या. वीकेंड का वारच्या आजच्या भागासाठी सलमान खान स्पर्धकांसोबत शूटिंग करणार आहे. शोच्या जवळच्या सूत्राने पोर्टलला सांगितले की अभिनेत्याने कोणताही ब्रेक घेतला नाही आणि नेहमीप्रमाणे शूटिंग सुरू ठेवेल.
बिगबॉसच्या घरात तांडव होणार!
बिगबॉसच्या घरात रेशनवरून झालेल्या गदारोळामुळे कुटुंबीयांना सलमाननं खडसावल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर रेशनवरून झालेल्या आक्रोशाबद्दल सलमानने कुटुंबीयांना फटकारलंय. सलमानने व्हिव्हियन डिसेनापासून अविनाश मिश्रा आणि सर्वांचीच शाळा घेतल्याचं दिसंलं. त्यानंतर सलमानने कुटुंबीयांना सांगितले की, घरासाठी मूलभूत रेशन आहे, त्याला फक्त आलिशान रेशन हवे आहे आणि त्यामुळेच त्याने उपोषणाचे हे नाटक केले.