Big Boss Marathi: वडिलांसोबत 38 वर्षांपासून असलेला अबोला बिगबॉसमुळं मिटला, डीपी दादानं 'त्या' क्षणाविषयी सांगितलं...
धनंजय पोवारनं वडील कधीही कौतुक करत नसल्याचं म्हटलं होते. या शोमध्ये त्याचे वडील भेटायला आल्यानंतर धनंजय हमसून हमसून रडला.
Big Boss Marathi: बिग बॉसमधील विविध टास्कमुळे स्पर्धकांच्या मानसिक आणि भावनिक ताकदीची कसोटी पाहिली जाते. कधी वाद होतात तर कधी मैत्रीचे संबंध होतात. तर कधी तुटलेले भावबंध पुन्हा जुळतात. स्पर्धकांच्या बिग बॉसमधील खेळावरून मनोरंजनाच्या कामगिरीवरून आणि वागण्यावरून त्याची लोकप्रियता ठरते. यंदाच्या बिग बॉस मराठी सीझनमध्ये असंच काहीसं झालं. स्पर्धकांची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. आता पाचवं पर्व संपलं आहे. बिगबॉसच्या घरात चौथ्या क्रमांकापर्यंत जाऊन आलेला स्पर्धक धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादानं त्याच्या वडिलांच्या भेटीनं बिगबॉसच्या घरात हमसून हमसून रडला होता. पितापुत्राचे नाते पाहून अनेकजण भावूक झाले हेाते. त्याक्षणी त्याला काय वाटलं होतं. हे त्यानं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलंय..
धनंजय पोवारनं वडील कधीही कौतुक करत नसल्याचं म्हटलं होते. या शोमध्ये त्याचे वडील भेटायला आल्यानंतर धनंजय हमसून हमसून रडला. त्याच्या खेळाचं वडिलांनी कौतुक केले. पिता-पुत्राचे हे नाते पाहून अनेकजण भावूक झाले.
गेली ३२ वर्ष वडिलांरोबरचा संवाद कामापुरता...
धनंजयनं सांगितलं की, माझ्या वडिलांनी गेल्या ३८ वर्षात मला मिठी मारली नव्हती. त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आलं नव्हतं. किंवा माझ्याही डोळ्यात कधी पाणी नव्हतं. खरं सांगायचं, तर गेली ३२ वर्षे माझा वडिलांबरोबर अबोला होता. कामापुरतं, जेवलास काय वगैरे इतकंच बोलायचो.
माझ्या मनात अपराधी भावना
मी कमवायला सुरुवात केली होती. त्यावेळी आमच्यात खटके उडत होते. पैसे मिळविण्याच्या नादात माझ्या हातून बऱ्याच चुकादेखील झाल्या होत्या. त्यामुळे वडील माझ्यावर खूप नाराज झाले होते. त्यांची नाराजी आर्थिक नुकसानीसाठी नव्हती, तर त्यांचे न ऐकल्याबद्दलची होती. माझ्या मनात अपराधी भावना होती. मला असं वाटायचं की, माझे वडील मला नाकर्ता मुलगा समजतात आणि मला त्यांच्यापुढे ताठ मानेनं उभं राहायचं होतं.
बिग बॉसमुळं वडिलांसोबतचा अबोला दूर झाला..
आपल्या खेळण्यावागण्यानं प्रेक्षकांची मने जिंकणारा डीपी दादा वडिलांच्या भेटीनं भावूक झाला होता. वडिलांशी अबोला बिगबॉसमुळं दूर झाल्याचं तो म्हणाला. 'आजही माझे वडील दुकानाचा जो काही व्यापार होतो, त्याचे पैसे संध्याकाळी वडील माझ्याकडून मोजून घेतात, त्यामुळे तो एक दबाव माझ्यावर होता; पण बिग बॉसमुळे ते आता शक्य झालं आहे.” जेव्हा बिग बॉसच्या घरात धनंजयचे वडील घरात आले होते, त्यावेळी ते दोघेही भावूक झाल्याचे दिसले होते.'