Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड
एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला.
Elvish Yadav Instagram Live : आजकाल सोशल मीडियाचे क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या डिजिटल जगात फॉलोअर्स, फॅन-फॉलोइंग, सबस्क्राइबर्स, लाईक्स, कमेंट्स इत्यादींना खूप महत्त्व आहे. Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव अजूनही चर्चेत आहे. शो जिंकल्यानंतर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.
एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. तब्बल 5 लाख 95 हजार यूजर्स एल्विशचं लाईव्ह पाहत होते. आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. Bigg Boss 16 जिंकल्यानंतर MC Satn ने इंस्टा लाईव्ह केलेलं, तेव्हा 5 लाख 41 हजार यूजर्स होते. एल्विश यादवने सलमान खानचा शो 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक एंट्री केली. तो एक प्रसिद्ध युट्युबर आहे. सर्वाधिक लाईव्ह पाहिलेल्या लोकांच्या यादीत एल्विश यादव दहाव्या क्रमांकावर आहे.
एल्विश यादव कोण आहे? (Who is Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav)
एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. 25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीतील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे. 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असण्यासोबत शॉर्ट फिल्म्सदेखील बनवतो. 'एल्विश यादव व्लॉग्स' असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची आवड आहे. बिग बॉस OTT 2 जिंकल्याबद्दल एल्विश यादवला ट्राॅफी आणि 25 लाखांचा चेक मिळाला आहे. आतापर्यंत एकही वाईल्ड कार्डने ट्राॅफी जिंकली नसल्याचा बिग बॉस शोचा रेकॉर्ड होता. पण शोमध्ये आल्यानंतर एल्विशने हा रेकॉर्ड बदलला आणि ओटीटी सीझन 2 जिंकला.
#ElvishYadav ne #mcstan ke insta live ka record break kia. 590k+ log live aaye. Systummm🔥🔥🔥🔥💯❤#ElvishIsTheEntertainer #ElvishYadav𓃵 #ElvishBBWinner #ElvishArmy #ElvishYadavArmy pic.twitter.com/B9pOSlLQ5N
— Saurabh🇮🇳 (@memes_ter_) August 19, 2023
बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व 17 जून 2023 रोजी सुरू झालं होतं. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये सहभागी झाली होते.
इतर महत्वाच्या बातम्या