एक्स्प्लोर

Elli AvrRam : बॉलिवूड अभिनेत्रीचं मराठीत दमदार पदार्पण, 'इलू इलू' म्हणत एलीची 'या' दिवशी होणार सिनेमागृहांत एन्ट्री

Elli AvrRam : बॉलिवूड अभिनेत्री एली ही लवकरच इलू इलू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Elli AvrRam :  एकीकडे  मराठी चित्रपट (Marathi Movie) देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत. तर दुसरीकडे बॅाक्स ऑफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 

फाळके फिल्म्स एन्टरटेमेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ मनोरंजक लव्हस्टोरी 31 जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली.

'या' सिनेमात झळकली होती एली

2013 मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल. 

भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली - एली

मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर 'इलू इलू' च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिल्याचंही एली म्हणाली’. 

सिनेमात 'हे' कलाकार झळकणार

एलीसोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. 

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Elli AvrRam (@elliavrram)

ही बातमी वाचा : 

Sharad Ponkshe : मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर शरद पोंक्षेंची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती, म्हणाले, नागपुरातलं अधिवेशन संपलं की नाटकाचा प्रयोग...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Embed widget