एक्स्प्लोर

The Sabarmati Report : महाराष्ट्रातील निवडणुकांच्या रणधुमाळीत सिनेमा होणार रिलीज; 'द साबरमती रिपोर्ट'बाबत एकता कपूरने काय म्हटलं?

The Sabarmati Report : एकता कपूरची निर्मिती असलेला द साबरमती रिपोर्ट या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. येत्या 15 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The Sabarmati Report :  गुजरातमध्ये 2002 मध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. गुजरातमधील त्या घटनेचे राजकीय त्याचप्रमाणे सामाजिक पडसाद संपूर्ण देशावर उमटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर या घटनेने अनेक वळणंही घेतली. याच सगळ्यावर भाष्य करणारा 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report ) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. एकता कपूरने (Ekta Kapoor) या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

दरम्यान गुजरातच्या शेजारीच असलेल्या महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तोंडावरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसेच पंतप्रधान मोदी हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. या घटनेने गुजरातच्या राजकीय वर्तुळातही तेव्हा बरीच खळबळ माजली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुका, पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद अशा अनेक मुद्द्यांवर एकता कपूरने नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आहे. 

पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं का?

द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा गुजरातमधील एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. त्यामुळे तत्कालीन गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही बोलणं झालं का? असा प्रश्न एकताला विचारण्यात आला. त्यावर एकताने म्हटलं की, या सिनेमासाठी पंतप्रधान मोदी किंवा केंद्र सरकारमधील कोणत्याही व्यक्तीची मदत घेतलेली नाही. याचा कोणत्याही गटाशी काहीही संबध नाही. हा फक्त सत्याचा गट आहे. 

सिनेमाचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही

दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच हा सिनेमा प्रदर्शित केला जातोय. त्यावरही एकता कपूरला या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकताने म्हटलं की, सिनेमाच्या रिलीजची तारीख बऱ्याच काळापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टीचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही. या सिनेमात कोणत्याही प्रकारच्या धर्माचं कनेक्शन नसल्याचं एकताने स्पष्ट केलं आहे. यावर एकताने म्हटलं की, मी हिंदू आहे, याचाच अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही कारण मी हिंदू आहे. 

अनेकांनी गमावले होते प्राण...

27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. हे कारसेवक अयोध्येवरून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या आगीच्या प्रकरणी दोन चौकशी आयोग नेमण्यात आले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

ही बातमी वाचा : 

Hrishikesh Joshi : ऋषिकेश जोशीच्या नव्या लूकची चर्चा, 'गोल्डमॅन'चं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget