Dhurandhar Box Office Collection Day 18: 'धुरंधर'वर भगवान शंकर प्रसन्न, सोमवारी पाडलाय कमाईचा पाऊस, थेट 500 कोटींच्या सिनेमावर केलीय मात
Dhurandhar Box Office Collection Day 18: बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणाऱ्या 'धुरंधर'नं तिसऱ्या सोमवारीही त्याची प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Dhurandhar Box Office Collection Day 18: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) नवा सिनेमा 'धुरंधर'नं (Dhurandhar Movie) रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केलाय आणि चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून,'धुरंधर' नवनवे रेकॉर्ड मोडतोय. चोहीकडे फक्त आणि फक्त 'धुरंधर'चीच चर्चा आहे. सोशल मीडियावर तर 'धुरंधर' सिनेमातले सीन्स व्हायरल होत आहेत. तब्बल 17 दिवसांनंतरही, थिएटर्समध्ये 'धुरंधर'चाच बोलबाला आहे. अशातच आता, चित्रपटाच्या उठराव्या दिवसाच्या कमाईचे आकडे प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणाऱ्या 'धुरंधर'नं तिसऱ्या सोमवारीही त्याची प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
तिसऱ्या विकेंडलाही 'धुरंधर' सुस्साट (Dhurandhar Third Weekend Collection)
'धुरंधर'नं तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे आणि तिसऱ्या सोमवारची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालाय. तिसऱ्या सोमवारीही 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवरचा प्रभाव काही कमी झालेला नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रणवीर सिंहच्या सिनेमानं अठराव्या दिवशी 16 कोटींपेक्षा जास्त कमाई केली, जी तिसऱ्या आठवड्यासाठी खूपच प्रभावी ठरली आहे. या वर्षी प्रदर्शित झालेले अनेक मोठ्या बजेटचे सिनेमे त्यांच्या पहिल्या दिवशीही इतकं कलेक्शन करू शकले नाहीत, पण 'धुरंधर'नं या कलेक्शनसह इतिहास रचला आहे.
'धुरंधर'नं आतापर्यंत किती कमाई केली?
'धुरंधर'च्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता 600 कोटींच्या जवळ पोहोचला आहे आणि जगभरात 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रविवारपर्यंत सिनेमानं 579 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं आणि आता सोमवारच्या कलेक्शनसह हा आकडा 594 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, ज्यामुळे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 600 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, रणवीरचा 'धुरंधर' सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर येईल.
2025 ची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म
'धुरंधर'च्या वेगानं कमाई करतेय, त्यानुसार ही यंदाच्या वर्षातली सर्वाधिक कमाई करणारी फिल्म बनण्यापासून फक्त काही पावलं दूर आहे. सध्या, ही फिल्म विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमाच्या मागे आहे, या सिनेमानं 600.10 कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे. मंगळवारच्या कमाईसह, रणवीरचा चित्रपट विक्की कौशलच्या सिनेमाला मागे टाकेल, असं बोललं जातंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























