एक्स्प्लोर

Dhanush Popular Song: अवघ्या 6 मिनिटांत लिहिलेल्या 'या' गाण्यानं इतिहास घडवलेला; अख्ख्या जगाला लावलेलं वेड; धनुषचं गाणं तुम्ही ऐकलंत?

तमिळ आणि इंग्रजीचा भन्नाट मिक्समुळे या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशनपर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर हे गाणं अनेकांच्या ऑल टाइम फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे.

Why This Kolaveri Di Song: कधीकधी सहज सहज म्हणून केलेली एखादी गोष्ट एवढी गाजते की, त्याची एकच हवा होते. असंच काहीसं झालं, 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका गाण्याचं. साउथ इंडस्ट्रीमध्ये 2011 साली एक असं गाणं रिलीज झालं ज्याने जगभरातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. स्टुडिओमध्ये अवघ्या 20 मिनिटात तयार झालेल्या या गाण्याने भारतातच नाही, तर जगभरात धुमाकूळ घातला. तमिळ आणि इंग्रजीचा भन्नाट मिक्समुळे या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशनपर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर हे गाणं अनेकांच्या ऑल टाइम फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे. पण तुम्हाला माहितीय, या कल्ट गाण्याचे शब्द अभिनेता धनुषने केवळ 6 मिनिटात लिहिले होते. आणि अवघ्या 20 मिनिटांत कंपोज केलेलं हे गाणं आहे. 15 वर्षे उलटून गेली तरी, आजही अनेकांना जशास तसे गाणं पाठ आहे. 

6 मिनिटात बोल लिहिले, 20 मिनिटात कंपोज

2012 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ सायकॉलॉजिकल थ्रिलर ' 3 ' चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केलेलं. विशेष म्हणजे 'व्हाय दिस कोलावरी डी' हे प्रचंड गाजलेलं गाणं  या फिल्ममधलं आहे. पण फिल्म प्रदर्शित होण्यापूर्वीच 16 नोव्हेंबर 2011 रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. अभिनेता धनुष आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील या गाण्याविषयी आज आपण बोलत आहोत.

या कल्ट सॉंगचे बोल स्वतः अभिनेता धनुषने लिहिले होते. आणि ते आपल्याच वेगळ्या आवाजात गायलं होतं.या गाण्याचा संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी केलेलं. संगीतकार म्हणून अनिरुद्ध यांचा तमिळ सिनेमातील हे पहिलंच काम होतं. त्यांनी हे गाणं केवळ 20 मिनिटात कंपोज केलंय. तर धनुषने अवघ्या सहा मिनिटात त्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 'टँग्लीश' स्टाईल. तमिळ आणि इंग्रजी शब्दाचा भन्नाट मिश्रण करत हे गाणं तयार करण्यात आलं. तमिळ लोक जे दैनंदिन बोलण्यातले इंग्रजी शब्द वापरतात तेच गुंफून हे गाणं एकत्र तयार झालं. आणि केवळ तमिळच नाही तर सर्व वयोगटातील श्रोत्यांना ते भावलं.

सोशल मीडियावर 'कोलावरी डी'चा धुमाकूळ

गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर मोठी खळबळ उडालेली. ट्विटरवर कोलावरी हा हॅशटॅग भारतात नंबर वन ट्रेंडवर होता. रिलीज च्या पहिल्याच आठवड्यात youtube वर या गाण्याने 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले होते.आज या गाण्याला youtube वर 60 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.या गाण्याची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही.तर अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवर ही गाणं वाजवला जाऊ लागलं.इतकच नाही तर रिलीज च्या पहिल्या 18 दिवसात तब्बल 41 लाख मोबाईल वरून हे गाणं डाऊनलोड झालं. तमिळ इंग्रजीच्या या मिश्रणामुळे कोलावरी डी आजही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget