एक्स्प्लोर

Devmanus | देवमाणूस संपणार कारण ती परत आलीये

झी मराठीवर देवमाणूस ही मालिका लवकरच बंद होणार आहे. कारण, तिच्या जागेवर आता नवीन मराठी मालिका सुरु होणार असल्याची माहिती आहे.

झी मराठीवर रात्री साडेदहा वाजले की प्रत्येकाला देवीसिंग आठवत होता. खरंतर जनसामान्यांसाठी देवाचा अवतार असतो तो डॉक्टर. पण या डॉक्टरच्या बनावट रुपात अवतरला होता देवीसिंग. हा देवीसिंग आणि त्याची कटकारस्थानं देवमाणूस या मालिकेतून दिसत होती. देवीसिंगच्या मागावर असणारी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी दिव्या सिंग आणि देवीसिंगची जुगलबंदी रसिकांना भावली. पण आता हा देवीसिंग निरोप घेणार आहे. 

रात्री साडेदहाच्या वेळेस देवमाणूसचा टायटल ट्रॅक ऐकणं नित्यनेमाचं झालं होतं. आता मी मालिका संपतेय. येत्या 14 ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यानंतर तिथे नवी मालिका येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ती परत आलीये. या मालिकेचे प्रोमोही आता टीव्हीवर दिसू लागले आहेत. या पहिल्या प्रोमोमध्ये अभिनेते विजय कदम दिसतात. ते रात्रीची गस्त घालताना दिसतायत. पण पुढे या मालिकेत काय असणार आहे ते मात्र दिलेलं नाही. विजय कदम बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसताहेत. बऱ्याच काळानंतर आलेल्या या अनुभवाबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, मी खूप काळानंतर मालिका करतो आहे. माझ्यासाठी हा अनुभव आनंददायी असेल. माझी एकंदर व्यक्तिरेखा काय आहे, ते मला आत्ता सांगता येणार नाही. पण माझ्या व्यक्तिरेखेवर महाराष्ट्र प्रेम करेल हे नक्की. 

ती परत आलीये ही गूढ मालिका असणार आहे हे या मालिकेच्या प्रोमोवरून लक्षात आलं आहे. मुळात देवमाणूस ही मालिकाही गूढ होती. त्याहीपेक्षा त्यामध्ये तपास आणि थरार होता. आता तोच धागा नव्या मालिकेत पकडायचा वाहिनीचा प्रयत्न दिसतो आहे. साडेदहाच्या स्लॉटमध्ये ती परत आलीये ही मालिका 16 ऑगस्टपासून सुरू होईल. तर लगेच 11 वाजता रात्रीस खेळ चाले 3 ही मालिकाही असणार आहे. अर्थात सध्या लॉकडाऊनमुळे या मालिकेच्या चित्रिकरणात खंड पडला आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत रात्रीस खेळ चाले या मालिकेचं  चित्रिकरण सुरू होईल. त्यानंतर ही मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहे. 

देवमाणूस ही मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. देवीसिंगचा कुटील हेतू आणि त्याच्या मागावर असणारी दिव्या सिंग ही केमिस्ट्री चालून गेली. म्हणूनच या मालिकेने आजवर जवळपास 280 भाग पूर्ण केले आहेत. आणखी साधारण 20 दिवसांनी ही मालिका निरोप घेणार आहे. त्यानंतर ती परत आलीये या मालिकेत कोण कोण असणार आहे, विजय कदम यांच्या सोबतीला नवे कलाकार असतील की आणखी जुने कोणी असतील, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण छोट्या पडद्यावर आणखी एक काहीतरी गूढ रंजक अवतरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget